10 Kailash Parvat mysteries हा आपला आजचा विषय आहे. कलियुगानंतर कल्कीयुग येणार आहे. त्या कल्कीयुगाची सुरुवात ही या कैलासपर्वतापासूनच होणार आहे. हे अनेक पुराणांमध्ये लिहून ठेवलेले आहे. हल्ली अनेक चित्रपट या विषयांवर आल्यानंतर अनेकांना कैलास पर्वत आणि त्याच्या रहस्याविषयी अधिक उत्सुकता वाढू लागली. कैलास पर्वताविषयी अधिक वाचल्यानंतर तेथील 10 रहस्यांनी आमचेही लक्ष वेधून घेतले. पुराणातील गोष्टी या केवळ आपल्या कल्पना असतील असे अनेकांना आजही वाटत असेल. परंतु आतापर्यंत अनेकांनी कैलास पर्वत ( Kailash Parvat) सर करण्याचा प्रयत्न करुनही तो सर करता आला नाही. इतकेच काय ? तर अनेकांना कैलास पर्वताच्या परिसरात असेक काही अनुभव आले की त्यामुळे ‘रहस्यमयी कैलास पर्वत’ अशीच त्याची ओळख जगभरात झाली आहे. अशाच या रहस्यमयी कैलास पर्वताविषयी आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. या शिवाय नकारात्मकेपासून मिळेल सुटका दररोज वाचा विष्णु सहस्त्रनाम
12 Jyotirlinga Names, Information | ज्योर्तिलिंगाची नावे, कथा, महत्व
Mystery 1 | कैलास पर्वत होत नाही सर…पण
जगभरात गिर्यारोहक आहेत, त्यांनी एव्हरेस्टसारखे कठीण पर्वत सर केले आहेत. परंतु कैलास पर्वत सर करण्यात अद्याप कोणालाही यश आलेले नाही. कैलास पर्वत हा केवळ हिंदूधर्मातील लोकांसाठीच महत्वाचा नाही. तर बौद्ध आणि जैन धर्म यांच्यासाठीही तो तितकाच विशेष आहे. तिबेटीयन गुरु मिला रेपा (Milarepa) यांनी कैलास पर्वत सर केल्याचे अनेक पुरावे बौद्ध धर्मात आहेत. कैलास पर्वत सर करणारे ते एकमेव धर्मगुरु होते. पण असेही सांगितले जाते की, मिलारेपा यांचे आयुष्य हे पूर्वीपासून असे नव्हते. त्यांच्या तरुणपणात ते एक गुन्हेगार होते. त्यांनी या आधी बऱ्याच लोकांचे खून केले होते. परंतु ते अध्यात्माच्या मार्गी लागले. त्यांनी आपले पूर्वायुष्य सोडून अध्यात्माची कास धरली. त्यांनी कैलास पर्वत सर केला. कैलासाचे अनेक रहस्य त्यांना कळले होते. परंतु कैलास पर्वताचे हे रहस्य कुठेही बाहेर पडता कामा नये म्हणून त्यांनी कैलास पर्वतावर नेमके काय पाहिले याबद्दल काहीही माहिती दिली नाही. तिबेटमधून भारतात येऊन त्यांनी कैलास पर्वतावरील अनेक कविताही लिहिल्या. त्या आजही प्रसिद्ध आहेत. मिलारेपा यांच्यासोबत कैलास पर्वतावरील त्यांनी पाहिलेले काही रहस्य आपल्यापर्यंत पोहोचू शकले नसले तरी कैलास पर्वत खरंच अनोखा आहे यात कोणतीही शंका नाही.Kailash Parvat mysteries
मिलारेपानंतरही जैन धर्मगुरु यांनी कैलास पर्वत सर केला अशी माहिती आहे. त्यानंतर चीनने देखील कैलासपर्वताची रहस्य जाणून घेण्यासाठी अनेक गिर्यारोहकांना पाठवले होते. पण त्यांनाही कैलास पर्वत सर करता आला नाही. परंतु त्यांना आलेले अनुभव त्यांनी संपूर्ण जगाला सांगितले. त्यांनी सांगितले की, कैलास पर्वत फारच अनोखा आहे. कैलास पर्वत फार उंच नाही. त्याला सर करणे कठीण नही असे वाटते. परंतु तेथे गेल्यानंतर त्यांना जास्तीचा थकवा, अचानक केस आणि नख वाढणे असे बदल दिसून आले इतकेच नाही तर कैलास पर्वताच्या परिसरात मानवनिर्मित असे छोटे छोटे पिरॅमिड दिसून येतात. त्यातून काही बोलण्याचा आवाज ऐकू येतो. इतकेच नाही तर नासालाही यामागचे रहस्य कळू शकलेले नाही. नासाचे असे म्हणणे आङे की, कैलासपर्वत आणि आकाश यांच्यामध्ये काहीतरी असा मार्ग आहे त्यामुळे तेथे एका वेगळ्या प्रकारची कंपने जाणवतात. म्हणूनच पुराणात कदाचित याचा उल्लेख ‘स्वर्गाचे दार’ असा केलेला आहे.
Mystery 2 | कैलास पर्वताजवळ आहे ‘शम्बाला’ हे गाव
शम्बालाविषयी अनेक ठिकाणी लिहिले आहे. याला शांंग्रीला या नावाने देखील ओळखले जाते. पुराणात दिलेल्या माहितीनुसार शम्बाला हे साधेसुधे गाव नाही. हे गाव चक्क कुबेर देवाने निर्माण केले असून याच ठिकाणी कल्कीचा जन्म होणार आहे. शम्बाला हे गाव आहे याचेही अनेक पुरावे आहेत. पण हे गावही कोणाच्या नजरेत पडणारे नाही. कारण असा कोणीही नाही ज्याला यापर्यंत पोहोचता येईल. पुराणात उल्लेख केल्यानुसार हे गाव थंडीत, बर्फात असूनही येथे काहीही कमतरता नव्हती. अशा राज्याचा ताबा मिळवण्यासाठी खूप जणांनी प्रयत्न केला. पण तेथे त्यांना एकही व्यक्ती दिसून आला नाही. शम्बाला हे आताच्या अराजक अशा दुनियेपासून दूर आहे. विशेषत: कलिपासून कारण कल्कीचा जन्म होण्यासाठी आणि पुन्हा कलियुग येईपर्यंत शम्बालाची रक्षा करणे हेच सगळ्यात महत्वाचे आहे. असे म्हणतात की, कैलासपर्वताच्या याच परिसरात असेलेले यति (हिममानव) हे या शम्बालाची रक्षा करतात. इतकेच नाही तर शम्बाला आपल्याहून टेक्नॉलॉजीनेही आपल्यापेक्षा खूप जास्त पुढे आहे. त्यांच्याकडे आधुनिक अशी यंत्रणा आहे.
Mystery 3 | राक्षसताल आणि मानसरोवर | Kailash Parvat mysteries | रहस्यमयी कैलास पर्वत
कैलासपर्वंताच्या पायथ्याशी दोन तलाव दिसून येतात. जे लोक येथे यात्रेला जातात त्यांना या दोन्ही तलावाकंडून कैलास पर्वताचे दर्शन होते. राक्षसताल आणि मानसरोवर हे दोन्हीही एकाच भौगोलिक क्षेत्रात आहेत. परंतु तरी देखील हे दोन्ही तलाव हे वेगळे आहेत. राक्षसताल जे रावणाने तयार केले असा उल्लेख आहे त्याचे पाणी खारे आहे असे सांगितले जाते. येथील वायब्रेशन हे फार वेगळे आहेत. येथे आल्यानंतर एक वेगळीच उर्जा जाणवते. तर मानसरोवर हे अत्यंत पवित्र असे तलाव असून हे गोड्यापाण्याचे तलाव आहे. येथे सकारात्मक उर्जा जाणवते. या तलावाचे आणखी एक विशेष म्हणजे हे तलाव इतक्या थंड ठिकाणी असून ही तलाव कधीच गोठत नाहीत.
Mystery 4 | कैलास पर्वतावर दिसतात सप्तरंग
कैलास पर्वताच्या पायथ्याशी जाणाऱ्या गिर्यारोहकांना अनेक गोष्टी दिसून आलेल्या आहेत. येथील बेसजवळ राहिलेल्यांनी रात्रीच्या वेळी येथे होणाऱ्या अनेक घटनांचा उल्लेख केला आहे. त्यापैकीच एक म्हणजे कैलास पर्वत परिसरात रात्रीच्या वेळी सप्तरंग दिसून येतात. हे सप्तरंग दिसून येण्यामागे काही वैज्ञानिक कारणे देखील सांगितली जातात त्यापैकी एक म्हणजे कैलास पर्वताला पृथ्वीचा केंद्र मानले जाते. येथून अवकाश हे खूप जवळ असल्यामुळे येथे मॅग्नेटिक फिल्ड तयार झाले असावे ज्यामुळे येथे हे सप्तरंग दिसून येतात असे मानले जाते. तर दुसरीकडे पुराणानुसार हे स्वर्गाचे दार असल्यामुळे येथे सात चक्रांचा एक अनोखा प्रकाश आपल्याला जाणवतो.
Mystery 5 | कैलास पर्वत हे मानवनिर्मित
कैलास पर्वत हे भगवान शंकराचे स्थान आहे. या पर्वतावर ते माता पार्वतीसोबत वास्तव्यास होते हे आपण सगळेच जाणतो. परंतु वैज्ञानिकांच्या माहितीनुसार हे ठिकाण नैसर्गिक नसून ते मानवनिर्मित आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार कैलासपर्वत हा एकमेव पिरॅमिड नसून या ठिकाणी अनेक लहान लहान पिरॅमिड आहेत. जे नक्कीच नैसर्गिक नसून ते बनवलेले आहेत. असे दिसून येतात. कैलास पर्वताची रचनाच अशी करण्यात आली आहे की, त्यामुळे तो लांबून पाहिल्यानंतर तो एकच पर्वत असल्यासारखा दिसतो. पण त्यात अनेक पिरॅमिड वसलेले आहेत. आता कैलास खरंच मानवनिर्मित आहे का? हे एक रहस्यच आहे.
Mystery 6 | कैलास पर्वतावरुन विमान जाणेही अशक्य
कैलास पर्वतावरील रहस्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न आतापर्यंत अनेकांनी घेतला आहे. चंद्रावर जाणे जसे अनेक देशांसाठी फार अभिमानाचे आहे अगदी त्याचप्रमाणे कैलास पर्वतावर जाऊन तेथील रहस्यांचा उलगडा करणे हे अनेकांचे ध्येय आहे. पण येथील भौगोलिक अशा रचनेमुळे ते शक्य होत नाही. चीनने या ठिकाणी जाण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे. त्यांनी ज्यावेळी हेलिकॉप्टरने येथे जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सुरुवातीला हे अगदी सहज शक्य आहे असे वाटले. ते कैलास पर्वताच्या अगदी जवळ येऊन पोहोचले. पण अचानक त्या ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटला, बर्फाचा पाऊस पडू लागला इतकेच काय तर ढग कैलास पर्वत झाकून घेत आहे असा भास होऊ लागला. या ठिकाणी आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे होकायंत्र काम करत नाहीत. आता आपण क्रॅश होऊ या भीतीने कॅप्टने हेलिकॉप्टर लगेच वळवण्याचा निर्णय घेतला. ते सगळे सुखरुप परतले ही गोष्ट जरी खरी असली तरी देखील त्यांनाही या ठिकाणी काहीतरी शक्ती असल्याचे जाणवले.
BramhaMuhurta| काय आहेत ब्रम्हमुहूर्तावर उठण्याचे फायदे
Mystery 7 | कैलास पर्वतावर राहतात यति
यति अर्थात हिममानव हे आजही कैलासपर्वतावर आहेत असे मानले जाते. हिमालयाचे रक्षण करणे हे त्यांचे काम आहे असे सगळेच मानतात. यति हे उंच हिममानव असून त्यांना खूप जणांनी पाहिले आहे असे दावे करण्यात आले आहेत. कैलास पर्वत हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. त्यातील कोणतेही रहस्य बाहेर जाता कामा नये यासाठीच ते हिमालयात राहतात असे देखील अनेक ठिकाणी म्हटले जाते. इतकेच नाही तर अनेकांनी आपल्या अनुभवांमध्ये यतिची पाऊले पाहिले असल्याचे देखील म्हटले आहे तर काही जणांनी त्यांना पाहिल्याचा दावा देखील केला आहे. यतिने आतापर्यंत कोणाला मारले किंवा इजा पोहोचवले असे देखील पुरावे कोठे आढळत नाहीत.
Mystery 8 | कैलास पर्वतावर ऐकू येतो ओमकार
हिंदू धर्मात ओम (AUM) हा प्रणव मंत्र सगळ्यात शक्तिशाली आहे. त्यामुळे मन शांत होण्यास मदत मिळते. कोणत्याही मंत्राची सुरुवात ओमनेच होते. हा ओमकार कैलास पर्वताच्या आसपासच्या परिसरात ऐकू येतो असे अनेकांचे म्हणणे आहे. तिथे हा प्रणव मंत्र ऐकू येतो. तिथे ओमकाराची एक वेगळीच उर्जा जाणवते. तिथे ओमकाराचा नाद ऐकू येतो. त्यामुळेच या परिसरात एक वेगळीच उर्जा जाणवते. ज्याचा अनुभव हा सगळ्यांनीच घ्यायला हवा.
Mystery 9 | कैलास पर्वतावर वाढते वय
कैलास पर्वत आतापर्यंत अगदी एक ते दोन जणांनीच सर केला आहे, असे अनेक पुरावे आहेत. परंतु कैलास पर्वतावरील अनुभव सांगताना त्यांनी ही गोष्ट प्रकर्षाने सांगितली आहे ती म्हणजे कैलास पर्वत अनेक रहस्यमयी असून आतापर्यंत ज्यांनी हा पर्वत सर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना विचित्र असे अनुभव आले आहेत. असे सांगितले जाते की, कैलास पर्वताजवळ वास्तव्य करु पाहणाऱ्यांना त्यांची नख, केस जलद गतीने वाढत असल्याचे दिसून आले आहे. इतकेच नाही तर त्यांच्या चेहऱ्यात ,वयातही गतीने वाढत असल्याचे दिसून आले आहे.
Mystery 10 | कैलास पर्वत बदलते आपली जागा
कैलास पर्वताबाबत अशी एक गोष्ट सांगितली जाते की, कैलास पर्वत हा एका जागेवर स्थिर नाही. आता याचा अर्थ तो आपली भौगोलिक जागा बदलते असा याचा अर्थ होत नाही तर कैलास पर्वतावर जाण्यासाठी आज जो मार्ग असेल तो दुसऱ्या दिवशी असेल असे सांगता येत नाही. रहस्यमयी असलेल्या कैलास पर्वताच्या वर जाण्याचे मार्ग हे कायम बदलत राहतात. कैलास पर्वत कोणालाही आपल्या वर जाण्याची परवानगी देत नाही. त्यामुळेच की काय कैलास पर्वतावरील रस्ते बदलत राहतात.
Kailash Parvat mysteries जाणून घेतल्यानंतर तुम्हाला कैलास पर्वत किती रहरस्यमयी आहे ते तुम्हाला लक्षात आलेच असेल. कैलास पर्वताविषयी तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की कळवा.