Hanuman Jayanti 2025 हनुमान जन्मोत्सव हा भगवान राम आणि देवी सीतेचे परम भक्त भगवान हनुमानाच्या जन्माचे प्रतीक आहे. हिंदू धर्मातील हनुमान जयंती उत्सव हा यावर्षी 12 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. बजरंगबली हे भक्ती, शक्ती आणि निस्वार्थतेचे प्रतीक मानले जाते. या दिवशी भगवान हनुमानाची भक्तीभावाने पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. अशा परिस्थितीत, राशीनुसार रामभक्ताला प्रसन्न करण्यासाठी काय अर्पण करावे ते जाणून घेऊया. ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. तुम्हीही हनुमानभक्त असाल तर हा लेख नक्की वाचा.
धार्मिक श्रद्धेनुसार, हनुमानजीची पूजा केल्याने व्यवसाय वाढतो आणि बजरंगबलीचा आशीर्वाद मिळतो. हनुमान जयंतीच्या दिवशी काही खास वस्तू घरी आणल्याने भक्ताला भगवान हनुमानाचा आशीर्वाद मिळतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच, घरात सकारात्मक ऊर्जा राहते. अशा परिस्थितीत, हनुमान जयंतीच्या दिवशी घरी कोणत्या गोष्टी आणणे शुभ राहील ते जाणून घेऊया
Ram Navami 2025 | रामाला करा प्रसन्न, ‘या’ मंत्राचा करा जप, विधीवत पूजेने मिळवा पुण्य
राशीनुसार या वस्तू करा बजरंगबलीला अर्पण | Hanuman Jayanti 2025
मेष: मेष राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला हनुमानजींना लाल ओढणी अथवा लाल रंगाचे कापड अर्पण करावे
वृषभ: वृषभ राशीच्या व्यक्तींनी भगवान हनुमानाला दुधापासून बनवलेल्या वस्तू अर्पण कराव्यात.
मिथुन राशी: मिथुन राशीत जन्मलेल्या व्यक्तीने बजरंगबलीला गोड पान (खाण्याचे पान) अर्पण करावे.
कर्क राशी: कर्क राशीत जन्मलेल्या व्यक्तीने वीर हनुमानाला तुळशीची माळ अर्पण करावी यामुळे त्यांना फायदा मिळू शकतो
सिंह: सिंह राशीत जन्मलेल्या व्यक्तीने भगवान हनुमानाला नारंगी रंगाचे कापड अथवा शाल, ओढणी अर्पण करावी
कन्या राशी: कन्या राशीच्या लोकांनी गंगाजलाने पवनपुत्राचा अभिषेक करावा असे ज्योतिषाचार्यांनी सांगितले
तूळ राशी: तूळ राशीच्या लोकांनी हनुमानजींना पंचामृत अर्पण करावे.
वृश्चिक राशी: वृश्चिक राशीच्या व्यक्तीने वीर हनुमानाला लाडू अर्पण करावेत अर्थात त्यांनी हनुमानाच्या मंदिरात जाऊन लाडूचा प्रसाद दाखवावा
धनु: धनु राशीत जन्मलेल्या व्यक्तीने हनुमान जयंतीला भगवान हनुमानाला तुळशीची पाने अर्पण करावीत.
मकर: मकर राशीच्या लोकांनी हनुमानजींना शमीची पाने अर्पण करावीत.
कुंभ: कुंभ राशीच्या व्यक्तीने भगवान हनुमानाला केळी अर्पण करावी.
मीन: मीन राशीत जन्मलेल्या व्यक्तीने वीर बजरंग बलीला बेसनाचे लाडू अर्पण करावेत
Navdurga Names & Story | नवरात्रीच्या 9 देवींची नावे आणि कथा
घरात आणा शेंदूर | Hanuman Jayanti 2025
जर तुम्हाला तुमच्या घरात सुख आणि शांती हवी असेल तर हनुमान जयंतीच्या शुभ प्रसंगी घरी शेंदूर आणा. यानंतर, बजरंगबलीची पूजा करा आणि भगवानाला सिंदूर अर्थात शेंदूर अर्पण करा. धार्मिक श्रद्धेनुसार, हा उपाय केल्याने बजरंगबली प्रसन्न होतील आणि घरात सुख-शांती येईल.
हनुमानाची कृपा होण्यासाठी
याशिवाय, हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही हनुमानजींचे शस्त्र, गदादेखील आणू शकता. गदा शक्ती आणि विजयाचे प्रतीक मानली जाते. याचा उपयोग हनुमानजींनी अनेक राक्षसांना मारण्यासाठी केला. असे मानले जाते की गदा घरी आणल्याने कुटुंबातील सदस्यांवर हनुमानाचा आशीर्वाद राहतो.
याशिवाय घरात निर्माण होणाऱ्या नकारात्मक उर्जेपासून मुक्तता मिळविण्यासाठी, हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान ध्वज आणा आणि घराच्या छतावर लावा. मान्यतेनुसार, घरी हनुमानाचा ध्वज फडकवल्याने वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाहीत. तसेच, कुटुंबातील सदस्यांना जीवनात कोणत्याही संकटाचा सामना करावा लागणार नाही.
टीप – या लेखात नमूद केलेले उपाय/फायदे/सल्ला आणि विधाने केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. Storyus.in या लेखातील वैशिष्ट्यांमध्ये लिहिलेल्या गोष्टींना समर्थन देत नाहीत. या लेखात असलेली माहिती विविध स्रोत/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/श्रद्धा/धार्मिक ग्रंथ/दंतकथा यातून गोळा केली आहे. वाचकांना विनंती आहे की त्यांनी लेखाला अंतिम सत्य किंवा दावा मानू नये आणि त्यांचा विवेक वापरावा. Storyus.in हे अंधश्रद्धेच्या विरोधात आहेत.
You explained this so clearly. I finally get it.