Chandoba Kavita आपल्या लहानपणी आपण सगळ्यांनीच ऐकल्या असतील. पण आता पूर्वीसारख्या छान छान कविता या फार कमीच ऐकू किंवा वाचायला मिळतात. म्हणूनच आम्ही खास तुमच्या तान्हुल्यासाठी काही खास चांदोबाच्या कविता, चांदोमामा कविता शोधून काढल्या आहेत. या कविता तुम्ही कधीतरी नक्कीच ऐकल्या असतील. तुमच्याकडे लहान नातवंडं असतील आणि त्यांना cocomelon ची सवय लावायची नसेल तर तुम्हीच तुमच्या मुलांसाठी, नातवंडांसाठी या कविता पाठ करुन घेऊ शकता. मराठी भाषा आधीच संकटात आहेत. त्यामुळे आपण या माध्यमातून त्याचे संवंर्धन नक्कीच करायला हवे.
Chandoba Kavita चांदोबा चांदोबा भागलास का | Chandoba Chandoba Bhaglas ka
अनेकांचे बालपण या बालकवितेच्या आठवणीने नक्कीच भरलेले असेल. झोपण्याआधी हे गाणं आपल्या आईने- आजीने नक्कीच गायले असेल. Chandoba Kavita
चांदोबा चांदोबा भागलास का?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का?
निंबोणीचं झाडं करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी!
आई-बाबांवर रुसलास का?
असाच एकटा बसलास का?
आता तरी परतुनी जाशील का?
दूध आणि शेवया खाशील का?
आई बिचारी रडत बसेल
बाबांचा पारा चढत असेल
असाच बसून राहशील का?
बाबांची बोलणी खाशील का?
चांदोबा चांदोबा कुठे रे गेलास?
दिसता दिसता गडप झालास
हाकेला माझ्या ‘ओ’ देशील का?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का?
चहा-कॉफीमध्ये दूध घालून पिणे हानिकारक
निंबोणीच्या झाडामागे | Nimbonichya Jhadamage
मराठी चित्रपटातील हे प्रसिद्ध गीत बाळांना रात्री झोपवण्यासाठी एक उत्तम असे काव्य आहे. हे आपण सगळेच जाणतो. तुम्ही देखील हे गाणे नक्कीच आपल्या लहानग्याला ऐकून दाखवायला हवे
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही
गाय झोपली गोठ्यात
घरट्यात चिऊताई
परसात वेलीवर झोपल्या गं जाईजुई
मिट पापण्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई
देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दु:ख घेण्यासाठी केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई
तोच चंद्रमा नभात

चित्रपटातील हे मराठी गाणं देखील तितकंच सुंदर आणि मनाला शांती देणारं आहे. शांता शेळके यांनी गायलेले हे गीत अनेकांच्या आवडीचे असेल(Chandoba Kavita)
तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी
एकान्ती मज समीप तीच तूही कामिनी
नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी
सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे ?
मीही तोच, तीच तूही, प्रीति आज ती कुठे ?
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी
त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी
या काही कविता तुम्हाला नक्कीच आवडतील या शिवाय तुम्हााल काही कविता माहीत असतील तर आम्हाला नक्की कळवा