Maharashtrachi Gani| मंगल देशा पवित्र देशा दगडांच्या देशा…… अशा आपल्या महाराष्ट्राचा हेवा गाणारी अनेक गाणी खूप मोठ्या गायकांनी गायली आहेत. महाराष्ट्राच्या गौरवाची हीच काही गाणी आम्ही या लेखातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणतीही गाणी गाताना त्यातील प्रत्येक शब्द हा योग्य आणि अचूक माहीत हवा. असे झाले तरच तुम्हाला त्याचा अर्थ नीट कळू शकेल. ही माहिती तुम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी अशी आमची अपेक्षा आहे.
50+ देवीवरुन मुलींची नावे | BABY GIRL HINDU GODDESS NAME
महाराष्ट्र गीत | Jai Jai Maharashtra Maza Lyrics

शाहीर कृष्णराव साबळेंच्या आवाजात रेकॉर्ड झालेले महाराष्ट्र गीत हे अजरामर आहे. नुकत्यात आलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात हे गाणं पुन्हा एकदा ऐकू आले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणं आणि त्याच्या ओळी खास तुमच्यासाठी (Maharashtrachi Gani)
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांंना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा….
भीति न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळ्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
गीत : राजा बढे
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : शाहीर साबळे
मंगल देशा पवित्र देशा

महाराष्ट्राचे वर्णन करणारे असे आणखी एक गीत म्हणजे ‘मंगल देशा पवित्र देशा’ या गीताबद्दल सांगायचे तर महाराष्ट्र कसा हे नेमके तुम्हाला कळते. आपल्या महाराष्ट्राचा महिमा जाणून घ्या या गीतातून
मंगल देशा,पवित्र देशा,महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा, माझा हा श्री महाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजूक देशा, कोमल देशा,फुलांच्याही देशा
अंचन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणि बुद्धिच्या देशा
शाहीराच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी,निशाणावरी, नाचते करी
जोडी इह पर लोकांसी व्यवहारा, परमार्थासी
वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंडाच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा || 1 ||
अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा,महाराष्ट्र देशा
पाषणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्री रघुनाथांची
ध्येय तुझ्या अंतरी…. || 2 ||
गीत : गोविंदराज
संगीत : वसंत देसाई
स्वर : जयवंत कुलकर्णी
महाराष्ट्र गीत

गदिमा म्हणजेच माडगुळकर यांच्याही कविता अनेकांच्या आवडीच्या आहेत. खास गदिमांनी लिहिलेले महाराष्ट्र गीत हे आपण सगळ्यांनी अगदी हमखास लक्षात ठेवावे असे आहे.
शिवनिष्ठा येथ असे सतत जागती
अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती
भीमकाय सह्यगिरी पाठीशी उभा
बलशाली आकांक्षा भेदती नभा
सरितांसह इथे प्रगती नित्य वाहती
पैठणचे प्रेम अमित देश कोकणा
पंढरीस ये विदर्भ देवदर्शना
अजरामर ऐक्यभाव येथे दृढमती
इतिहासा ज्ञात असे शौर्य एथले
यज्ञाग्नि सर्वप्रथम येथे चेतले
देशास्वव प्रथम दिल्या इथुनि आहुती
परदास्ये होते जधि राष्ट्र घेरले
संतानी सद्विचार येथे पेरले
ज्ञानाचे अमरदिप अजुन तेवती
समतेचा बोध करी क्षेत्र पंढरी
वेरुळची एक एक अतुल ओवरी
अजुन अजिंठ्यात उभी चित्र-संस्कृती
शिवराजा, टिळक, भीम, गोखले,फुले
अभ्यासित आदर्शा वाढती मुले
साहित्यिक नव विचार येथे सांगती
वाढतसे ज्ञान येथे खडक फोडुनी
साकळ्या रुढींचे बंद तोडुनी
विद्यार्थ्या येथे नसे वाण कोणती
देवदत्त जो निसर्ग,आम्हा पुरे
उद्योगे उद्याने उभवे गोपुरे
सहकारा धुरिण इथे पूर्ण जागती
सुस्थिरल्या पंचायती,भागपरिषदा
वाढविती श्रमिक कृषिक खपुन संपदा
भवितव्य कोटी कसुन कोरिती
पूर्णत्वा जाती गृहित योजना
सार्थकता लाभतसे नव- नियोजना
प्रांत न हा, प्रगतीची सधन आकृती
चंक्राकित तीन- रंगी राष्ट्रीय ध्वजा
देवदूत मानी तिला येथची प्रजा
वाढविते आप्तभाव हा सभोवती
कवी : ग. दि. माडगुळकर
महाराष्ट्रावरील ही गाणी तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा.
अधिक वाचा
CHAN CHAN KAVITA | छान छान कविता मराठी
KAKAD AARTI | काकड आरती संग्रह मराठी 2023