Marathi Badbadgeet | मराठी बडबडगीते जुनी पण ओळखीची 2026

Marathi Badbadgeet ही आजही आपल्या सगळ्यांच्याच मनात एक कोपरा करुन बसली आहेत. कितीही इंग्रजी गाणी आली आणि ट्रेंड झाली तरी आपल्या लहानपणी ऐकलेली काही बडबडगीते ही कधीच जुनी होऊ शकत नाहीत. उलट आताच्या या नव्या पिढीला ही गाणी शिकवण्याची इच्छा सगळ्याच नव्या पालकांना होते. या आधीही आपण काही मराठी कविता जाणून घेतल्या आहेत. आता आपण अजूनन काही बडबडगीते या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
तुमच्या मुलानेही मराठी उत्तम बोलावे. मातृभाषा आधी शिकावी असे वाटत असेल तर मग तुम्ही ही गाणी तुमच्या लहानग्यांना हमखास शिकवायला हवी. आजही ही गाणी तितकीच प्रसन्न करणारी, अर्थपूर्ण अशी आहेत. चला जाणून घेऊयात अशी काही सुंदर बडबडगीते.

अडगुलं मडगुलं

अनेकांनी हे गाणं नक्कीच आठवत असेल. लहानसं पण छान असं गाणं तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की गायला हवं

अडगुलं मडगुंल
सोन्याचं कडगुलं
रुप्याचा वाळा
तान्ह्या बाळा
तीट तिळा

सांग सांग भोलानाथ

भोलानाथसोबतच्या अनेक आठवणी तुमच्याही असतील. मग हे गाणं नक्की वाचा

भोलानाथ, शकुन सांग, पाऊस पडेल काय?
कोणी पैसा देईल का? सांग सांग

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय
शाळेभोतवती तळे साचून सुट्टी मिळेल काय
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय
भोलानाथ दुपारी आई झोपेल काय
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय
भोलानाथ भोलानाथ

भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
आठवड्यातून रविवार येतील का रे तीनदा
भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
आठवड्यातून रविवार येतील का रे तीनदा
भोलानाथ भोलानाथ

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय

भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन
दुखेल का रे ढोपर
भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन
दुखेल का रे ढोपर

ससा रे ससा

निजला तो थांबला….. याची शिकवण देणारे हे गाणे मजेशीर आहे.

ससा रे ससा रे कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लावली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे आपुली
ससा….

चुरुचुरु बोले, तो तुरुतुरु चाले
नी कासवाने अगं हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
हे कासवाने हळू पाहिले
वाटेत थांबले ना कोणाशी बोलले ना
चालले लुटूलुटू पायी
ससा…..

ससा रे ससा रे कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लावली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे आपुली….

हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा घे फांदीचा निवारा
तो हळुहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे
ससा…..

झाली सांजवेळ तो केला किती काळ
नि शाहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळा मनी होई
निजला तो संपला सांगे
ससा….

ससा रे ससा रे कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लावली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे आपुली….

मामाच्या गावाला जाऊया

सुट्टीत मामाच्या गावी अर्थात मामाकडे गेल्यावप जी धम्माल येते. ती धम्माल सांगणारे हे गाणे तुम्ही आवर्जून ऐकायला हवे.Marathi Badbadgeet

झुकू झुकू झुकू आगीनगाडी
धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
जाऊया मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव मोठा
सोन्या चांदीच्या पेठा
शोभा पाहूनी घेऊया
मामाच्या गावाला जाऊया
जाऊया मामाच्या गावाला जाऊया

मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया
मामाच्या गावाला जाऊया

मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया
मामाच्या गावाला जाऊया
जाऊया मामाच्या गावाला जाऊया

मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया
मामाच्या गावाला जाऊया
जाऊया मामाच्या गावाला जाऊया

किलबिल किलबिल पक्षी बोलती Marathi Badbadgeet

असे गाव जिथे सगळे लहान मुलांच्या मनासारखे असेल तर कित्ती मज्जा येईल ना? असेच स्वप्नवत गाव तुम्हाला नक्कीच आवडेल.

किलबिल किलबिल पक्षी बोलती
झुळझुळ झुळझुळ झरे वाहती
पानोपानी फुले बहरती
फुलपाखरे वर भिरभिरती
स्वप्नी आले काही स्वप्नी आले काही
एक मी गाव पाहिला बाई!

त्या गावाची गंमत न्यारी
तिथे नांदती मुलेच सारी
कुणी ना मोठे, कुणी ना छोटे
कुणी ना बसते एकटे तिथे
सारे हसती गाती गाणी
कुणी रडके नाही
स्वप्नी आले काही स्वप्नी आले काही
एक मी गाव पाहिला बाई!

किलबिल किलबिल पक्षी बोलती

नाही पुस्तक नाही शाळा
हवे तेवढे खुशाल खेळा
उडो बागडो पडो धडपडो
लागत कोणा नाही
स्वप्नी आले काही स्वप्नी आले काही
एक मी गाव पाहिला बाई!

तिथल्या वेली गाणी गाती,
पऱ्या हासऱ्या येती -जाती
झाडावरती चेंडु लटकती
शेतामधूनी बॅटी
म्हणाल ते ते सारे होते उणे न कोठे काही

स्वप्नी आले काही स्वप्नी आले काही
एक मी गाव पाहिला बाई!

शेपटीवाल्या प्राण्यांची

शेपूट ही उगीचच नसते. तर तिचा उपयोग प्राण्यांना किती असतो हे सांगणारे हे गाणं तुम्ही नक्की वाचा.

शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा
पोपट होता सभापती मधोमध उभा

पोपट म्हणाला, पोपट म्हणाला
देवाघरची लूट, देवाघरची लूट
तुम्हा आम्हा सर्वांना एकच शेपूट
या शेपटाचे कराल काय?
या शेपटाचे कराल काय?

गाय म्हणाली, ‘अशा अशा शेपटीने मी मारीन माशा’

घोडा म्हणाला, ‘ ध्यानात धरीन ध्यानात धरीन,
मीही माझ्या शेपटीने असचं करीन,असंच करीन

कुत्रा म्हणाला, ‘ खुशीत येईन तेव्हा, शेपूट हलवीत राहीन

मांजर म्हणाली,’ कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही
खूप खूप चिडीन तेव्हा शेपूट फुगवीन, शेपूट फुगवीन!

खार म्हणाली, ‘पडेल थंडी जेव्हा, माझ्या शेपटाची मलाच बंडी
मलाच बंडी

माकड म्हणाले,’ कधी वर कधी खाली शेपटीनवर मी मारीन उडी

मासा म्हणाला, ‘शेपूट म्हणजे दोन हात, दोन हात
पोहत राहीन प्रवाहात, पोहत राहीन प्रवाहात

कांगारु म्हणाले, ‘ माझे काय?
तुझे काय ?
शेपूट म्हणजे पाचवा पाय
हा हा हा हा

माेर म्हणाला, ‘ पीस फुलवून धरीन फुलवून धऱीन
पावसाळ्यात नाच मी करीन…. नाच करीन

पोपट म्हणाला, ‘ छान छान छान छान
देवाच्या देणगीचा ठेवा मान
आपल्या शेपटीचा उपयोग करा,
नाहीतर होईल काय?
नाहीतर काय होईल?

दोन पायांच्या माणसासारखे

आपले शेपूट झडून जाईल
आपले शेपूट झडून जाईल
हा हा हा हा

कोणास ठाऊक कसा?

अरे देवा हा ससा आता पु्न्हा कुठेतरी गेला आहे. तो जिथे जातो तिथे काय धम्माल करतो हे सांगणारे हे गाणे.

कोणास ठाऊक कसा? पण सिनेमात गेला ससा
ससाने हलविले कान, घेतली सुंदर तान
दिग्दर्शक म्हणाला, वा वा!
ससा म्हणाला, ‘चहा हवा

कोणास ठाऊक कसा? पण सर्कशीत गेला ससा
सशाने मारली उडी, भरभर चढला शिडी
विदुषक म्हणाले, छान छान!
ससा म्हणाला, काढ पान

कोणास ठाऊक कसा? पण शाळेत गेला ससा
सशाने म्हटले पाठे भरभर वाचले धडे
गुरुजी म्हणाले, शाब्बास!
ससा म्हणाला, करा पास

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीच दार
शेपटीच्या झुपक्याने झाडून नेईल खार

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
हॅलो हॅलो करायला छोटासा फोन

बिस्किटांच्या गच्चीवर मोर शानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुले लाल- लाल

चांदीच्या झाडामागे चांदोबा राहतो
मोत्यांच्या फुलांमधुनी लपाछपी खेळतो

उंच उंच झोक्यांचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला

किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

मग आवडली की नाही तुम्हालाही मराठी बडबडगीते? आवडली असल्यास चालीसहीत म्हणा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअऱ करा.





Leave a Comment