Navratri 2024 Improtance Of 9 Colors या विषयावर आपण आज अधिक माहिती घेणार आहोत. कारण नवरात्र आली की, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करणे, पदार्थ बनवणे अशा काही गोष्टी सर्रास दिसू लागतात. पण त्यात जरी एक मजा असली तरी या 9 रंगाचे आपल्या आयुष्यात काही महत्व आहे आणि ते मानण्याची एक पद्धत आहे. प्रत्येक रंग हा त्याचे एक विशेष सांगत असतो. त्या रंगाचे काही फायदे आपल्याला होत असतात. म्हणूनच या दिवसात 9 रंग पाळले जातात. वेगवेगळे रंग नेमके काय फायदे देतात यासंदर्भातील माहिती आज आपण घेणार आहोत. त्या आधी जर तुम्ही Navdurga Names & Story | नवरात्रीच्या 9 देवींची नावे आणि कथा Navratri 2024 हा लेख वाचला नसेल तर तो आवर्जून वाचा, ही माहिती देखील तुम्हाला नक्की आवडेल.
यंदा शारदीय नवरात्रोत्सव 3 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होत आहे. पहिला दिवस गुरुवारी आला असून या दिवशी पिवळा रंग परिधान करायचा आहे. आता या रंगानुसार त्याचे काय महत्व ते पाहूयात
Walnut For Hair | अक्रोडची सालं ठरतात अनेक केसांच्या समस्येवर गुणकारी, कसा करावा वापर
पिवळा रंग
हिंदू धर्मात पिवळा रंग हा अत्यंत शुभ असा रंग मानला जातो. हा रंग अगदी दुरुनही उठून दिसतो. हा रंग भगवान विष्णूचा आवडीचा रंग मानला जातो. हा रंग आनंद, शुद्धता, विजय याचे प्रतीक असून हा रंग आपल्याला अनिष्ट शक्तीपासून दूर ठेवतो असे मानले जाते.Navratri 2024 म्हणूनच यंदा गुरुवारी पहिला रंग हा पिवळा रंग आला आहे. पिवळा रंग हा दत्त यांचा देखील आवडीचा रंग आहे. त्यामुळे नवरात्री वगळता इतर दिवशीही गुरुवारी पिवळा रंग अनेक जण परिधान करतात. जर तुम्हाला आत्मविश्वास कमी वाटत असेल. तर अशावेळी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे हे तुमच्या आत्मविश्वासात अधिक भर घालू शकते.
हिरवा रंग
यंदा नवरात्रीतील दुसरा रंग हा हिरवा रंग आहे. हिरवा रंग हा देवीचा अत्यंत प्रिय असा रंग आहे असे मानले जाते. हिरवा रंग अनेक महिलांचा आवडीचा रंग देखील आहे. हिरवा रंग हा निसर्गाचे दर्शन आपणास घडवतो. निसर्ग जसा समतोल, नावीन्यता याचे प्रतीक आहे. त्यामुळेच या रंगाच अनन्यसाधारण असे महत्व आहे. हिरव्या रंगातील विविध छटा या देखील आपणास विविध फायदे देत असतो. हिरवा रंग हा अगदी कोणालाही उठून दिसतो. या नवरात्रीत हा रंग तुम्हीही आवर्जून परिधान करा.
करडा रंग
यंदा नवरात्रीतील तिसरा रंग हा शनिवारी आल्यामुळे करडा हा रंग आहे. करडा रंग तसा सगळ्यांच्याच आवडीचा आहे असे सांगता येत नाही. या रंगाचे कपडेही महिलांकडे असतातच असे नाही. परंतु या रंगाला नवरात्रीत महत्व देण्यात आले आहे. हा रंग जरी फार उठून दिसत नसला तरी देखील या रंगाचे आपले असे महत्व आहे जे आपण सगळ्यांनीच जाणून घ्यायला हवे. करडा रंग हा समतोल दर्शवतो. कारण हा रंग ना काळा ना पांढरा आहे. करडा रंग स्थिरपणा दर्शवतो. शिवाय हा रंग शांतता देखील दर्शवतो. (Navratri 2024 )
केशरी रंग
यंदा नवरात्रीचा चौथा रंग हा केशरी रंग आहे. केशरी रंग हा चांगलाच उठून दिसतो. अगदी चारचौघात उठून दिसणारा असा हा रंग आहे. त्यामुळे हा रंग अनेकांच्या कपाटात असतो. आपल्या देशाच्या झेंड्यावर देखील पहिला रंग हा केशरी आहे. केशरी रंग हा आनंद, सकारात्मक उर्जा दर्शवतो. हा रंग तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवतो. इतकेच नाही तर तुमचे मानसिक आरोग्यदेखील चांगले ठेवण्यास मदत करतो. त्यामुळेच हा रंग अत्यंत महत्वाचा असा रंग आहे. Navratri 2024
पांढरा रंग
नवरात्रीतील पाचवी माळ यंदा सोमवारी येत आहे. त्यामुळे या दिवसाचा रंग आहे पांढरा. पांढरा हा कशामध्येही मिसळू शकतो. एखाद्या रंगाची प्रखरता कमी करायची असेल तर पांढरा रंग ते काम करतो. हा रंग अनेक ठिकाणी वापरला जातो. पांढरा रंग हा शांतता दर्शवतो. हा रंग परिधान केल्यानंतर लोकांची एकदा तरी नजर आपल्यावर जातेच. अगदी कोणालाही हा रंग शोभून दिसतो. Navratri 2024 या शिवाय पांढरा रंग हा शुद्धता, सात्विकता, नाविण्याचे प्रतीक आहे. म्हणूनच हा रंग परिधान करणे फार फायद्याचे ठरते.
लाल रंग
नवरात्रीतील सहावा रंग हा लाल रंग आहे. लाल रंग हा ताकदीचे प्रतीक आहे. हा रंग जिद्द, प्रेम याचे दर्शन घडवतो. लाल रंग हा आनंदाचे प्रतीक आहे. हा रंग पाहिल्यानंतर नक्कीच आनंद होतो. लाल रंग हा अनेकांच्या आवडीचा रंग असतो. प्रेम दाखवताना लाल रंगाचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे राग दाखवतानाही लाल रंगाचा उपयोग केला जातो. हा लाल रंग जितका जास्त तितके आपण त्यावर नियंत्रण ठेवायला हवे.
निळा रंग
नवरात्रीतील सातवा रंग हा निळा रंग आहे. निळा रंग शांतता, विशालता दर्शवतो. हा रंग अनेकांच्या आवडीच्या आहे. हा रंग अनेकांना आत्मविश्वास देण्याचे काम करतो. त्यामुळे खूप जण हा रंग अगदी आवर्जून वापरतात. हा रंग उत्तम आरोग्य, सकारात्मक देण्यासाठी खूप चांगला असा रंग आहे. या शिवाय विशालता हा यातील गुण आपल्या आयुष्यातही नक्की कामी येतो.
गुलाबी रंग
गुलाबी रंग हा देखील प्रेमाचे प्रतीक असलेला असा हा रंग आहे. हा रंग यंदा नवरात्रीच्या आठव्या माळेच्या दिवशी आलेला आहे. गुलाबी रंग हा स्त्री आणि पुरुष तसा दोघांच्या आवडीचा रंग आहे. या रंगाचे कपडे परिधान केल्यानंतर एक कमालीचा आनंद, नवचैतन्य आणि तारुण्याची जाणीव झाल्यावाचून राहात नाही. एखाद्यावरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी हा रंग अगदी आवर्जून घातला जातो.
जांभळा रंग
यंदा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमीच्या दिवशी आलेला रंग आहे. जांभळा रंग हा अध्यात्म आणि आत्मबळ दर्शवते. हा रंग तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करते. म्हणूनच हा रंग तुमच्या इतरवेळीही घालायला हवा. जांभळ्या रंगाच्या अनेक छटा आहेत. त्यापैकी गडद रंग हा तुम्ही वापरु शकता.
नकारात्मकेपासून मिळेल सुटका दररोज वाचा विष्णु सहस्त्रनाम
प्रश्न
नवरात्रीशिवायही रंग वापरणे चांगले का?
आपल्या हिंदू धर्मात शुभ-अशुभ रंगाची मान्यता आहे. प्रत्येक रंग हा आपआपली उर्जा देण्याचे काम करत असतो. नवरात्रीत आपण 9 रंग या निमित्ताने वापरतो. पण इतर दिवशीही आपण हे रंग नक्कीच वापरायला हवेत.
प्रत्येक वाराचा रंग ठरलेला असतो का?
हो, प्रत्येक वाराचा असा एक रंग आहे. जसे की, सोमवार हा शंकाराचा मानला जातो. त्यामुळे त्या दिवशी पांढरा रंग शुभ मानला जातो. मंगळवारचा रंग हा लाल आहे. बुधवारचा रंग हा पिवळा आहे. त्यामुळे प्रत्येक वाराचा रंग असतो. त्यानुसार रंग वापरला तर त्या दिवशाची सकारात्मक उर्जा आपल्याला मिळते.