Numerology Mantras | तुमच्या मुलांकानुसार काही खास यशमंत्र

Numerology Mantras हा फारच वेगळा विषय आज आपण निवडला आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या जन्माचा दिनांक, वेळ आणि रास तुमचा स्वभाव ठरवत असते. तुम्ही ज्या राशीत जन्मला त्या राशीत कितीही अडथळे असले तरी देखील तुम्हाला यश प्राप्त करण्याची जिद्द असेल तर त्याला जोड म्हणून Numerology ची मदत घेतली जाते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात काही अडथळे येत असतील तर ते दूर होतात. आता Numerology म्हणजे काही आकडेमोड आहे. तुमच्या नावात, तुमच्या फोन नंबरमध्ये काही बदल करुन त्यातून तुम्हाला काही फायदा मिळून देण्याचे काम यात केले जाते. तुमच्या आहे त्या नावात थोडासा बदल करुन दिला जातो. त्यामुळे तुमचे मूळ न बदलता तुम्हाला थोडेसे अपडेट केले जाते, असे म्हणायला काहीच हरकत नाही. १,२,३,४,५,६,७,८,९ या मुलांकानुसार तुमची देवता असते. तुम्ही तुमचा मुलांक जाणून घेऊन जर त्यानुसार देवाची आराधना केली तर तुम्हाला यश मिळण्यास मदत मिळते. असे न्युमरोलॉजिस्ट सांगतात. आज आपण Numerology Mantras जाणून घेणार आहोत.

MakarSankrant Informantion 2026| मकरसंक्रात विस्तृत माहिती

Numerology म्हणजे काय?

ही असते तुमच्या जन्मतारखेची बेरीज. जर तुमचा जन्म 10 तारखेला झाला असे तर तुमचा मुलांक 1 आहे. जर 27 ला झाला आहे. तर तुमचा मुलांक हा 9 आहे. असेच 9,18,27 यांचा मुलांक 9 आहे. तुम्ही अशा पद्‌धतीने तुमचा मुलांक काढू शकता. तुमचा मुलांक तुमचा स्वभाव ठरवत असतो. तुम्ही कसे वागता,तुम्हाला काय आवडू शकतं हे मुलांकावरुन कळतं. तुमच्या जन्माची वेळ मागे-पुढे होऊ शकते. पण तुमचा मुलांक शक्यतो चुकू शकत नाही.

कसे असतात या क्रमांकाचे लोक

आता आपण न्युमरोलॉजी कशी काढायची ते पाहिले आता आपण या तारखेचे लोक साधारण कोणत्या स्वभावाचे असतात ते जाणून घेऊया.

क्रमांक 1 (1,10,19,28) हा स्वातंत्र्य, लीडरशीप आणि प्रचंड इच्छाशक्ती असलेला क्रमांक आहे. परंतु याच गोष्टी डोक्यात गेल्यामुळे त्यांचे नुकसान होते.

क्रमांक 2 (2,11,20, 29) – हा मुलांक भावनिक असून हे लोक नात्याला अधिक जास्त महत्व देतात. या लोकांचे सल्ले अनेकदा चांगले असतात.

क्रमांक 3 (2,12,21,30) – हा मुलांक सगळ्यांमध्ये मिसळणारा, आनंदी, हुशार, नावीण्यपूर्ण असा असतो.

क्रमांक 4 ( 4,13,22,31)- या मुलांकाच्या व्यक्ती या अत्यंत शिस्तबद्ध असतात. त्यांना सगळी कामे योग्यपद्धतीने झालेली आवडतात. हे तितकेच मेहनती असतात.

क्रमांक 5 (5,14,23)- या मुलांकाच्या व्यक्तींना आपले स्वातंत्र्य अधिक प्रिय असते. या सतत काही तरी नव्या गोष्टीच्या शोधात असतात.

क्रमांक 6 (6,15,24)- प्रेमळ, कर्तव्यदक्ष, कौटुंबिक, जबाबदारींची जाण असलेल्या अशा या व्यक्ती असतात.

क्रमांक 7 (7,16,25) – या मुलांकाच्या लोकांना देवावर अधिक विश्वास असतो. या व्यक्ती एखादी गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकतात.

क्रमांक 8 ( 8, 17,26) – सगळ्या मुलांकामधील पावरहाऊस म्हणून ही तारीख ओळखली जाते. या राशीला दिखावा आवडत असला तरी त्या मिळवण्यामागे त्यांची तेवढीच जिद्द असते. या क्रमांकाचे लोक त्यांच्या आयुष्यात आशीर्वाद ओढून आणतात.

क्रमांक 9 ( 9,18,27) – या क्रमांकाचे लोक यशस्वी असतात. पण या शिवाय त्यांच्या मनात प्रेमभावना अधिक असते. ते आपला विचार न करता दुसऱ्यांचा सतत विचार करतात. त्यामुळेच ते अनेकदा आपले नुकसान करुन घेतात. हे योग्य त्याची बाजू घेतात पण कधीकधी त्यात वाहत जातात.

मुलांकानुसार मंत्र Numerology Mantras

मुलांक ज्यानुसार तुम्हाला तुमचा स्वभाव तर सांगतो. पण त्या मुलांकाचा जो स्वामी आहे. तो त्यांच्या आयुष्याचा कारक असतो. जर तुम्ही तुमच्या मुलांकानुसार मंत्राचे पठण केले तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा मिळण्यास मदत मिळते. चला जाणून घेऊया मुलांकानुसार यश देणारे असे मंत्र

मुलांक 1( देवता सूर्य )

||ॐ घ्रिणी सूर्याय नम: ||

मुलांक 2 (देवता चंद्र)

||ॐ सोम सोमाय नम: ||

मुलांक 3 ( देवता बृहस्पति/ गुरु)

||ॐ गुरुवे नम: ||, ||ॐ बृहस्पतये नम: ||

मुलांक 4 ( देवता राहू)

||ॐ ब्रां ब्री ब्रौ स: बुधाय नम: ||

मुलांक 5 ( देवता बुध)

||ॐ गं गणपतये नम: ||

मुलांक 6 (देवता शुक्र)

||ॐ ह्री श्रीं शुक्राय नम: ||

मुलांक 7 (देवता केतू)

||ॐ गं गणपतये नम: ||
||ॐ केतवे नम: ||

मुलांक 8 ( शनि)

||ॐ शं शनिश्चराय नम: ||

मुलांक 9 (मंगळ)

||ॐ हं हनुमते नम: ||

या मंंत्रांचे पठण हे तुमच्यासाठी फारच लाभदायक ठरु शकते. तुमचे अडकलेले कोणतेही काम पूर्ण होऊ शकते. पण मेहनतीला पर्याय नसतो हे कायम लक्षात ठेवा. योग्य मेहनतीसोबत या गोष्टी केल्या तर तुम्हाला त्याचा लाभ होण्यास मदत मिळू शकते.

Leave a Comment