Putrada Ekadashi पौष महिना हा एरव्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी चांगला नसला तरी या काळात येणारी एकादशी ही अत्यंत शुभ मानली जाते. पौष महिन्यात येते म्हणून हिला पौष पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते. या शिवाय श्रावण महिन्यात देखील पुत्रदा एकादशी येते. हिंदू संस्कृतीत हा अत्यंत महत्वाचा असा दिवस आहे. आपण सारेच जाणतो की, पुराणात पुत्र व्हावा म्हणून अनेकांनी उपासना केल्या आहेत. पुत्राची प्राप्ती ही वंशविस्तारासाठी महत्वाची मानली जाते. ( आताचा काळ हा अजिबात तसा राहिलेला नाही. आम्ही या गोष्टीचे समर्थन करत नाही, जे काही पुराणात आहे त्याची माहिती इथे देत आहोत.) पुत्र असेल तर त्यामुळे आयुष्याच्या शेवटीचा आधार आणि श्राद्धाचे कार्य करण्यासाठी मुलगा हा महत्वाचा मानला जातो. प्रत्येक एकादशीची काही ना काही खासियत असते. ती करण्यामागे काही उद्देश्य असतो. तशीच ही एकादशी ज्यांना पुत्ररत्न हवा त्यासाठी महत्वाची आहे असे मानले जाते. ज्यांना पुत्र हवा असेल त्यांनी ही पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी करावी असा उल्लेख पुराणांमध्ये देखील करण्यात आलेला आहे. त्या संदर्भातील एक कथा आणि याचे व्रतवैकल्य काय आहे याची माहिती आता आपण या लेखातून घेऊयात.
Satyanarayan Katha 2023 | सत्यनारायण पूजा करा घरच्या घरी, पुजाविधी आणि कथा
भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिरला दिली माहिती Putrada Ekadashi
भविष्य पुराणात पुत्रदा एकादशीसंदर्भातील कथा आणि त्याचे महत्व भगवान कृष्णाच्या तोंडून सांगितल्याची माहिती आहे. श्रीकृष्णाने ती युधिष्ठिरला या एकादशीचे महत्व पटवून दिले.त्या संदर्भातील ती कथा पुढीलप्रमाणे, Putrada Ekadashi
भद्रावतीचा राजा सुकेतुमन हा अत्यंत चांगला राजा होता. प्रजेवर त्याचे नितांत प्रेम आणि निष्ठा होती. प्रजेच्या सुखासाठी तो काहीही करत होता. त्यामुळे प्रजाही त्यावर तितकेच प्रेम करत होती. पण त्या राजाला पुत्र नव्हता. त्यामुळे तो कायम चिंताकुल आणि व्याकुळ असे. माझ्या मृत्यूनंतर मला यातून मुक्ती कशी मिळेल. माझे पिंडदान करण्यास माझ्याकडे पुत्र नाही. यामुळे राजा- राणी कायम चिंतेत असे. एक दिवस व्याकुळ झालेल्या राजाने जंगलाकडे प्रस्थान केले. तो काही दिवस जंगलात फिरल्यानंतर एका आश्रमाकडे येऊन पुत्रदा एकादशीच्या दिवशी पोहोचला. हे आश्रम मानसरोवराच्या जवळ होते. येथे असलेले 10 महर्षि हे सर्वसामान्य नाही तर ते विश्वदेव होते. त्यांना राजाची अडचण कळली. पुत्र नसल्यामुळे तो चिंतेत होता हे पाहून त्यांनी राजाला पुत्रदा एकादशी करण्यास सांगितले. महर्षिंच्या उपस्थितीत राजाने पुत्रदा एकादशीचे व्रत घेतले. भगवान विष्णुची मनोभावे पूजा केली. त्यानंतर तो आपल्या राज्यात परतला. त्यानंतर त्याला काही काळात पुत्रप्राप्ती झाली.म्हणूनच ज्याला पुत्ररत्न हवा असेल त्याने हे व्रत स्विकारावे अशी माहिती या व्रतासंदर्भात देण्यात आलेली आहे.
उत्तर प्रदेश किंवा त्या आसपासच्या भागात या पौष पुत्रदा एकादशीचे फार महत्व आहे. ही एकादशी तेथे हमखास केली जाते. इतर राज्यांमध्ये पौष पुत्रदा एकादशीच्या तुलनेत श्रावणातील एकादशी पाळली जाते.
पुत्रदा एकादशी व्रत | Putrada Ekadashi
पुत्रदा एकादशी करण्याचा विचार असेल तर तुम्हाला त्याचा पूजाविधी देखील माहीत असायला हवे. आपल्या महाराष्ट्रात हे फारच कमी प्रमाणात साजरे करत असल्यामुळे आपल्याला त्याची माहिती नाही. परंतु जर तुम्हाला हे व्रत करण्याची इच्छा असेल तर हे व्रत करणे तसे सोपे आहे. याचा पूजाविधी नेमका काय आहे तो आज आपण जाणून घेऊया (Putrada Ekadashi )
अशी करा पूजा
- पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीची माळ घेऊन ती माळ जपा. माळ जपताना ‘ओम् देवकीसुत गोविन्द वासुदेव जगत्पते, देहि मे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गतः या मंत्राचे उच्चारण करा. अपत्यप्राप्तीसाठी हा लाभदायक असा उपाय आहे.
- पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची मनोभावे पूजा केली जाते. यादिवशी तुम्ही विष्णु सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करा. त्यामुळे जर तुमच्या आजुबाजूला असलेली नकारात्मक उर्जा कमी होते. त्यामुळे कुटुंबातील कलह कमी होण्यास मदत मिळते.
- भगवान विष्णुचा प्रिय रंग हा पिवळा आहे. या दिवशी विष्णुच्या प्रतिमेला पिवळ्या रंगाच्या फुलांची माळा घालावी. त्याला चंदनाचा टिळा लावावा. हा टिळा तुम्ही स्वत:लावावा. त्यामुळे तुम्हाला मानसिक तणावातून मुक्ति मिळते.
- यंदाच्या वर्षी याचे अनेक संयोग बनत असल्याचे पाहायला मिळते. तुम्हाला याची सुरुवात यंदाच्या वर्षी आदल्या दिवसापासून करता येईल. असे म्हणतात या दिवशी मंगळ, बुध, शुक्र यांचा धनु राशीत होणारा प्रवेश हा लक्ष्मी प्राप्तीसाठीही फारच फायद्याचा ठरतो. त्यामुळे विष्णुची साधना करणे म्हणजे साक्षात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासारखे आहे. Putrada Ekadashi
- पुत्रदा एकादशीला पती-पत्नी दोघांनीही उपवास करणे गरजेचे असते. असे म्हणतात की, एखादी पूजा ही जर पुरुषाने केली तर त्याचा लाभ त्याला लवकर होतो. या दिवशी पती-पत्नी दोघांनी उपवास पकडावा. सात्विक अशा पदार्थांचे सेवन करावे. मांस-मासे, लसूण, कांदा अशा पदार्थांचे सेवन करु नये. फलाहार स्विरावा. देवापुढे दिवा लावून त्याची मनोभावे पूजा करावी. दीप दान करावे. त्यामुळेही तुम्हाला लाभ होतो.
- पुत्रदा एकादशीच्या दुसऱ्या दिवशीही या व्रताचे पारायण केले तर त्याचा फायदाच होतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही यातील नियम पाळण्यास काहीच हरकत नाही.
अशा प्रकारे यंदा षौष पुत्रदा एकादशी Putrada Ekadashi आपण करण्यास काहीच हरकत नाही. ज्यांना भगवान विष्णुंचा आशीर्वाद हवा असेल त्यांनी हे नक्की करावे.