Shani Dev Myth | शनिदेव नाही केवळ साडेसाती, देतो भरभराट

Shani Dev Myth | शनिची दशा सुरु झाली की आयुष्याची दशा होते असे आपण सगळेच मानतो. शनिसारखा देव जर कुंडलीत बसला तर आयुष्याचे काही खरे नाही असा आपल्या सगळ्यांचाच समज आहे. एखादे काम बिघडले किंवा सतत अपयश पदरी येऊ लागले की अनेक जण त्याचा दोष शनिदेवाला देतात. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की शनिदेव ही केवळ साडेसाती देणारी देवता नाही तर ती आयुष्यात भरभराट आणि चांगले बदल घडवून आणणारी असते. काळ्या कावळ्यावर बसणारी ही देवता खूप गंभीर वाटत असली तरी ती मानवजातीच्या कल्याणाचे काम करते. या देवाचा महिमा तुम्ही जाणलात तर तुम्हाला शनिचा त्रास कधीही होणार नाही, उलट तुमच्या आयुष्यात केवळ भरभराटच होईल.चला शनिदेवाविषयी जाणून घेऊयात अत्यंत महत्वाची अशी माहिती

शनिदेव ठेवते पाप-पुण्याचा हिशेब

शनि देवता ही पाप- पुण्याचा हिशेब ठेवत असते. तुम्ही जे कर्म करता त्या कर्माचे योग्य ते भोग तुमच्या वाटेला आणण्याचे काम शनि करते. त्यामुळेच अनेक जण शनि देवाला घाबरतात. शनिदेवामुळे जर तुम्हाला काही कटू अनुभव आले तरी देखील ते तुमच्या भविष्यासाठी उत्तम असतात. मनुष्यप्राण्याला सुधारण्याचे काम शनिदेव करत असते. शनिदेवाचे वाहन हे कावळा, पांढरा घोडा, मोर, हत्ती, गाढव, कुत्रा आहेत. तुमच्या राशीत शनिची दशा कशी असणार आहे हे शनि कोणत्या वाहनावर बसून आला आहे हे दाखवते.

जसे की, कावळा : न्याय, सतर्कता आणि कर्मफल दर्शवतो, दुःख दूर करतो. हंस:  मान-सन्मान आणि आर्थिक सुधारणा देतो, मोर: सौभाग्य, यश आणि यशाचे प्रतीक.,सिंह: शत्रूंवर विजय आणि समाजात मान मिळवून देतो, हत्ती:  संघर्ष आणि अस्थिरता दर्शवतो,घोडा: शक्ती आणि ऊर्जेचे प्रतीक, शत्रूंवर विजय मिळवण्यास मदत करतो, गाढव: कष्ट, मेहनत आणि यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात हे दर्शवतो, कोल्हा: बुद्धी भ्रष्ट होणे आणि धन व सन्मान गमावणे दर्शवतो. कुत्रा: धनलाभ होऊ शकतो,बैल : शक्ती आणि कठोर परिश्रमाचे प्रतीक, दीर्घकालीन यश देतो,गिधाड : विविध प्रकारच्या व्याधी आणि त्रासांचे कारण बनू शकतो. त्यामुळे शनि केवळ एखाद्याच्या आयुष्यात वाईट आणि कठीण प्रसंग घेऊन येतो असे नाही तर तो आनंद आणि यशही घेऊन येत असतो. (Shani Dev Myth )

शनिला जाऊ नका घाबरुन

शनिची महादशा सुरु होणार असे कळल्यावर अजिबात घाबरुन जाऊ नका याचे कारण असे की, शनिदेवाचे येणे हे तुमच्या आयुष्यातील अत्यंत चांगले असते. तुमच्या आयुष्यात त्याचे येणे हा तुमच्या एक अनुभव देणे आहे. (Shani Dev Myth )शनिची महादशा सुरु होणार म्हटल्यावर निराश होण्यापेक्षा त्यातून काय चांगले निष्पन्न काढता येईल ते आपण सगळ्यांनी बघायला हवे. आयुष्यातील सगळेच दिवस हे चांगले असतात असे नाही तर काही दिवस खडतर आणि कटू अनुभवांनी भरलेले असतात. पण त्यातून नक्कीच चांगले काहीतरी होणार आहे यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला ही शनिची दशा नाही तर आशीर्वाद वाटेल यात कोणतीही शंका नाही.

शांत निश्चिंत आणि शनिवर विश्वास Shani Dev Myth

Shani Dev Myth (सौजन्य: Social Media)

तुमच्या आयुष्यात अचानक काही गोष्टी चुकीच्या होत आहेत असे वाटत असेल, देवावरील विश्वास उडून जात असेल तर अशावेळी तुम्ही थोडेसे मनाला आवरा. शनिदेव तुम्हाला काय दाखवू पाहात आहे ते पाहा. कधीकधी वाईट होण्यात तुम्हाला सत्य दाखवण्याचाही प्रयत्न असतो. तुम्हाला घडवण्यासाठीही शनिने केलेला हा अनोखा प्रयत्न असतो. डोळे, कान आणि मन स्वच्छ ठेवून त्याकडे एक उत्तम संधी म्हणून तुम्ही पाहिले तर तुम्हाला त्यातून लाभच मिळेल यात कोणतीही शंका नाही. केवळ आलेल्या परिस्थितीला सामोरे कसे जायचे हे पाहा. बाकी शनिच्या कृपेवर विश्वास ठेवा.

शनिदेवाला असे करा प्रसन्न

शनिदेवाची आपल्यावर कृपा राहावी यासाठी आयुष्यात सत्कर्म आणि चांगले विचार असणे गरजेचे आहे. तुम्ही इतरांसोबत चुकीचे करुन तुमच्या आयुष्यात भले होईल असा विचार करत असाल तर असे कधीही होणार नाही. कारण तुमच्या पाप-पुण्याचा हिशेब ठेवण्याचे कामच शनिदेवाचे आहे. तुमच्या आयुष्यातील चुकाच तुम्हाला पुढे जाऊन महाग पडत असतात. त्यामुळेच या चुका करणे टाळा या शिवाय काही सोप्या गोष्टींनी देखील तुम्हाला शनि देवाला प्रसन्न करता येऊ शकते.

  1. शनिदेवाची आराधना : शनिवारी शनि मंदिरात जाऊन मनोभावे पूजा करा. तिळाचे तेल, काळे तिळ अर्पण करा. ते शक्य नसेल तर शनिची मनापासून आऱाधना करा.
  2. चांगले कर्म : शनिदेवता तुमच्या कर्मावर विश्वास ठेवते. तुम्ही मनापासून एखाद्याची मदत करता की देखावा हे त्याला चांगलेच कळते. शिवाय एखाद्याशी छळ, कपट करणे शनिला अजिबात आवडत नाही. असे केल्यास शनि दंड देऊनच राहतो. एका बाजूला पूजापाठ आणि दुसरीकडे कुकर्म असतील तर शनि कधीही प्रसन्न होत नाही.
  3. गरिबांची सेवा : तुम्ही आयुष्यात इतरांची जितकी मदत कराल शनि तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला मोबदला आयुष्यात देतो. तुमची चांगली कामे त्याला आकर्षित करतात. त्यामुळे तुमच्याकडून शक्य तितकी सेवा होऊ द्या. सेवाभाव हा शनिला भावणारा गुण आहे

शनि बीजमंत्र

आयुष्यात तुम्ही कुठेही अडकले असाल तुम्हाला अडथळे येत असलीत अशावेळी शनि बीजमंत्राचे पठण करा. तुम्हाला त्यामुळे मानसिक शांती मिळेल. हा बीजमंत्र आहे

 ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः

या बीजमंत्राचे पठण केल्याने अडथळे दूर होण्यास मदत मिळते. पण हा मंत्रोच्चार करताना तुमच्या मनातील भावना या खऱ्या असायला हव्यात

शनिजन्माची रंजक कथा

शनि देव हे सूर्यदेव आणि छाया याचे पूत्र आहेत. पण तुम्हाला त्यांची कथा माहीत आहे का? नसेल तर चला आपण ती जाणून घेऊयात

पूत्रप्राप्तीची इच्छा मनी बाळगून ज्यावेळी सूर्यदेव छायायांच्याकडे गेले त्यावेळी छाया मातेला त्यांचा प्रखरपणा सहन झाला नाही. त्यांनी आपले डोळे बंद गेले. त्यांना गर्भधारणा झाली. त्यांची प्रसूती झाली. त्यांना पूत्ररत्न झाले याचा आनंद तर झाला. परंतु तो सावळा असल्यामुळे ते निराश झाले. त्यांनी शनिदेवाला आपला मुलगा म्हणण्यास नाकारले. शनिदेवांना पित्याचे प्रेम म्हणावे तसे मिळाले नाही. त्यामुळे त्यांना फार दु:ख झाले. आपल्याला आपल्या जन्मकर्त्यानेच नाकारले हे त्यांना सहन झाले नाही. म्हणून कित्येक काळ त्यांनी काहीही न खाता, न पिता शिवाची आराधना केली. भगवान शिव प्रसन्न झाल्यावर त्यांनी त्यांच्याकडे वरदान मागितला की, माझ्या रंगाचा अवमान आणि मला न स्वीकारणे हा मातेचा अपमान आहे. हा अपमान माझ्या मातेच्या वाटेला आला. ज्याने हा अवमान केला त्या सूर्यदेवांपेक्षा माझे स्थान हे वर असावे असे माझ्या आईला वाटते. त्यामुळे मला सूर्यदेवांपेक्षा अधिक ताकद मिळावी. Shani Dev Myth

भगवान शंकरांनी त्यांना नवग्रहांमध्ये अत्यंत महत्वाचे असे स्थान दिले आणि सांगितले की, आजपासून पृथ्वीलोकाचा न्यायाधीश म्हणून तुमचे स्थान असेल. पाप-पुण्यानुसार लोकांना दंड-न्याय देण्याचे काम तुम्ही कराल. तुमचे कुंडलीत येणेच अनेक जणांना घाबरवणारे असेल. तुम्हाला भयभीत होऊनच लोकं आयुष्यात वागतील. देव, असूर, विधूर कोणीही असो तुमची भिती सगळ्यांनाच असेल. Shani Dev Myth

म्हणूनच शनिदेवाला सगळेच घाबरतात. त्याची अवकृपा ही आयुष्यात अडथळे निर्माण करते याचा अनुभव सगळ्यांनाच आला. त्यामुळे साहजिकच शनिदेवाला सगळेच घाबरतात.

त्यामुळे शनि केवळ कष्ट देतो हे MYTH डोक्यातून काढून टाका आणि चांगले कर्म करण्याकडे अधिक भर द्या. शनिची पीडा ही तुम्हाला कधीही जाणवणार नाही. उलट ती आयुष्यात कायमच भरभराट घडवून आणेल. (Shani Dev Myth )

Leave a Comment