Sharad Pournima Detail information 2024 हा अत्यंत महत्वाचा असा दिवस आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि नऊ रंग असे छान पार पडल्यानंतर जी पौर्णिमा येते तिला शरद पौर्णिमा, शारदीय पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, कोजागरती पौर्णिमा, कौमुदी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ आलेला असतो. या चंद्राचे चांदणे हे या दिवशी अत्यंत शुभ मानले जाते. अनेक ठिकाणी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असली तरी चंद्राचे चांदणे आणि त्या प्रकाशाचा अधिकाधिक फायदा घेणे हे या दिवसाचे उद्दिष्ट्य आहे. हा दिवस माता लक्ष्मीचा आहे.तिचा वास आपल्याला सतत मिळावा अशी अपेक्षा सगळ्यांनाच असते. तिने सुखसमृद्धी आणि समाधान आणावे यासाठी या दिवशी तिची खास पद्धतीने पूजा केली जाते. आज आपण या लेखाच्या माध्यमातून Sharad Pournima Detail information तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत.
शरद पौर्णिमा म्हणजे काय?
हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या देवतांना आपण विविध पद्धतीने पूजतो. प्रत्येक देवासाठी आपल्याकडे खास दिवस असतो. शरद पौर्णिमा ही नवरात्र संपल्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी असते. या काळात अनेक भौगोलिकबदल होत असतात. जसे की, रात्र मोठी होत असते आणि दिवस लहान. शिवाय पाऊसही परतत असतो. त्यामुळे वातावरणात एक वेगळाच आल्हाद असतो. या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या इतक्या जवळ येतो की, चंद्राचे हे चांदणे शरीरावर पडणे अत्यंत शुभ मानले जाते. इतकेच नाही तर या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीतलावर येते असे देखील मानले जाते. Sharad Pournima Detail informationतिचा आशीर्वाद मिळण्यासाठी अनेक जण जागरण करतात. शिवाय तिला नैवेद्य दाखवण्यासाठी खीर किंवा दूधाचा गोड पदार्थ करण्याची पद्धत देखील अनेक ठिकाणी आङे. ही खीर किंवा तत्सम पदार्थ हा चंद्रप्रकाशात ठेवला जातो. चंद्राचे चांदणे त्यात पडले की तो पदार्थ ग्रहण केला जातो. त्यामुळे चंद्राची शीतलता, मातेची कृपा आपल्यावर राहते. या दिवशी पांढऱ्या रंगाचेही अनन्यसाधारण असे महत्व आहे. ब्रम्हपुराण, स्कंदपुराण, लिंगपुराण यांच्यामध्ये या दिवसाचा उल्लेख केलेला आढळून आला आहे.
शिवाय या दिवसासंदर्भात असे देखील सांगितले जाते की, माता लक्ष्मीचा जन्म हा समुद्रमंथनातून झाला आहे. तिचा जन्म दिवस हा देखील शरद पौर्णिमा मानला जातो. त्यामुळे देखील हा दिवस विविध पद्धतीने साजरा केला जातो.
Lord Rama Baby Names | रामनवमीच्या दिवशी ‘रामलला’साठी निवडा खास नावे, बाळांची अर्थासह नावांची यादी
माता लक्ष्मीची कृपा
नवरात्रीनंतर माता पार्वती ही पुन्हा आपल्या निवासस्थानी परतते. त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा / शरद पौर्णिमेला पृथ्वीतलावर लक्ष्मीमाता प्रकटते. ती ज्या ठिकाणी तिची पूजा यथायोग्य केली जाते त्या ठिकाणी तिचा वास असतो. लक्ष्मी ही सुख, समृद्धी, समाधान आणि संतती या सगळ्याचे सुख देत असते. त्यामुळेच तिची कृपा मिळवण्यासाठी तिच्या खास स्त्रोताचे पठण देखील केले जाते. यात माता लक्ष्मीच्या 12 नावांचा समावेश आहे.
ईश्वरीकमला लक्ष्मीश्चलाभूतिर्हरि |
पद्मा पद्मालया सम्पद रमा श्री: पद्मधारिणी ||
द्वादशैतानि नामानि लक्ष्मी संपूज्य य: पठेत|
स्थिरा लक्ष्मीर्भवेत्तस्य पुत्रदारादिभिस्सह ||
या मंत्राचे पठण करावे. ज्यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील
कोजागिरी पौर्णिमेची कथा | Sharad Pournima Detail information
कोजागिरी पौर्णिमेसंदर्भात अनेक कथा प्रचलित आहे. पण त्यातील एक कथा अगदी आवर्जून सांगितली जाते. ती म्हणजे भगवान कृष्णाची. ती अशी की, या दिवशी कृष्णांनी गोपिंकासोबत या दिवशी कृष्णाने रासलीला खेळली होती. त्यामुळे ही रात्र प्रेमाची रात्र म्हणून ओळखली जाते. म्हणून अनेक जण या दिवशी गरबा खेळतात. Sharad Pournima Detail information
तर दुसरीकडे एका सावकाराची कथा सांगितली जाते. एका गावी एका सावकाराला दोन मुली होत्या. त्या दोन्ही मुली पौर्णिमेचे व्रत करत असे. पण त्यातील मोठी मुलगी हे व्रत मनोभावे पूर्ण करायची तर लहान मुलगी हे व्रत पूर्ण करायची नाही. तिच्याकडून अनावधनाने ही चूक होत होती. परंतु काही काळानंतर तिला याचे दुष्परिणाम जाणवू लागले. तिच्या पोटी जन्माला येणारे प्रत्येक मुल हे कालांतराने मृत्यूमुखी पडत होते. लक्ष्मीच्या अवकृपेने हे सगळे काही घडत होते याची तिला अजिबात कल्पना नव्हती. एका मागून एक अशा सतत घटना घडू लागल्यानंतर तिने या संदर्भात ऋषींना विचारणा केली असता त्यांना भूतकाळातील काही गोष्टी लक्षात आल्या. त्यांनी तिला लक्ष्मीची मनोभावे पूजा करण्यास सांगितले. Sharad Pournima Detail informationतिने लक्ष्मीची मनोभावे पूजा केली. तिला बाळही झाले. परंतु कालांतराने ते ही मरण पावले. ती दु:खाने व्याकुळ झाली. तिने त्याचा मृतदेह हा झाकून ठेवला आणि आपल्या मोठ्या बहिणीला घरी बोलावले. तिला बसण्यासाठी जागा दिली. त्याखाली तिचे मेलेले बाळ होते. पण तिच्या स्पर्शाने ते बाळ जिवंत झाले. हा चमत्कार छोट्या बहिणीने पाहिला ती आनंदीत झाली. परंतु आपली बहीण आपल्यावर नको ते दुषणे लावत असल्याचे समजून मोठ्या बहिणीला राग अनावर झाला. तिने त्याबद्दल विचारणा केल्यावर छोट्या बहिणीने खरं काय ते सांगितले. त्यानंतर राज्यात प्रत्येक कोजागिरी पौर्णिमेला उपवास करुन तो दिवस आनंदाने साजरा करण्याची दवंडी पिटवण्यात आली.
गर्भवती महिलांसाठी फायद्याचा दिवस
शरद पौर्णिेमेचे महत्व Sharad Pournima Detail information जाणून घेतल्यानंतर आता आपण गर्भवती महिलांसाठी हा दिवस किती महत्वाचा आहे ते जाणून घेऊया. चंद्राचे तेजस्वी असे हे चांदणे प्रत्येक गर्भवती महिलांसाठी खूपच जास्त फायद्याचे ठरते. यंदाही ज्या महिला गर्भवती आहेत. त्यांनी जास्तीत जास्त चंद्राच्या चांदण्यात राहावे. त्याचा गर्भावर खूप चांगला परिणाम होतो. असे म्हणतात की गर्भवती महिला या काळात नाजूक असतात. त्यांना उर्जा देण्याचे काम चंद्राचे चांदणे करते. बाळाच्या आणि आईच्या उत्तम आरोग्यासाठी महिलांनी जास्तीत जास्त चंद्रप्रकाशात आपला वेळ घालवावा. चंद्राचे चांदणे हे एक प्रकारे अमृताचे काम करते. चंद्राच्या चांदण्यात तुम्ही जे काही बनवाल त्यात त्याचे गुणधर्म उतरतात. जे शरीरासाठी खूप फायद्याचे ठरते. Sharad Pournima Detail information