Sudha Murthy Stroies आतापर्यंत अनेकांनी वाचल्या असतील अशी अपेक्षा आहे. ज्यांनी त्यांची पुस्तके वाचली नसतील अशांसाठी आजचा लेख म्हणजे पर्वणी असणार आहे याचे कारण असे की, आम्ही तुमच्यासाठी अशा काही कथा निवडल्या आहेत ज्या तुम्हाला वाचल्यानंतर पुराणातील काही कथांवर नक्कीच विश्वास बसेल. शिवाय त्यामागील काही संबंध लक्षात आल्यानंतर तर तुम्हाला त्या अधिक रोचक वाटतील. जसे की, पांडव म्हणजे कोण? महाभारताच्या युद्धाची सुरुवात नक्की कोणी केली वगैरे वगैरे. सूधा मूर्ती (Sudha Murthy) यांच्या विविध पुस्तकातून त्या मांडण्यात आल्या आहेत. त्यातील काही निवडक कथा आज आपण येथे जाणून घेऊया. यासोबत तुम्ही Navdurga Names & Story | नवरात्रीच्या 9 देवींची नावे आणि कथा
इंद्र हेच पाच पांडव Sudha Murthy Stories
खूप खूप वर्षांपूर्वी देव-देवता आणि ऋषी मुनी यांनी एकत्र येऊन नैमिषारण्यात एका महायज्ञाला सुरुवात केली. हे नैमिषारण्य म्हणजेच आताचा उत्तरप्रदेश या महायज्ञाच्या व्यवस्थापनाचं काम त्यांनी मृत्यूची देवता यमराज यांच्याकडे सोपवल्यामुळे या कामात यमराजांना त्यांचे काम करणे कठीण होऊन गेले. या यज्ञाच्या काळात त्यांना पृथ्वीतलावरील जबाबदारी पार पाडता आली नाही. त्यामुळे या काळात कोणतेही मृत्यू झाले नाहीत. Sudha Murthy Stories
देवाधिराज इंद्र हा आधीच उतावीळ, उद्धट आणि अपरिपक्व अशा स्वभावाचा होता. आपलं स्थान कोणी हिरावून घेईल याची भीती त्याला मनातून सतत वाटत असे. त्याने असा विचार केला की, पृथ्वीवरील माणसं मृत्यूमुखी पडत नसतील तर देवता आणि माणसांमध्ये काहीही फरक राहणार नाही. त्यामुळे देवांचं महत्व कालांतराने कमी होऊन जाईन. कोणीच देवांची आराधना करणार नाही. यमराजांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव नसेल तर त्यांना ती करुन देण्याची आता वेळ आलेली आहे. ही तक्रार त्याने जाऊन ब्रम्हदेवाकडे केली,’ हे भगवान मनुष्यप्राणी जन्मल्यानंतर काही काळाने मृत्यू पावतो. हा निसर्गाचा नियम आहे ; पण यमराजांना त्याचा विसर पडला आहे. सध्या जे सुरु आहे, ते घालून दिलेल्या नियमांच्या विरुद्ध नाही का? त्यावर ब्रम्हदेव हसून म्हणाले, हे बघ इंद्रा, सध्या तू त्याची काळजी करु नकोस. हा महायज्ञ संपला की, त्यानंतर यमराजदेखील आपली जबाबदारी पार पाडतील. तू जरा धीर धर. इथला प्रत्येकजण हा आपल्या कामाचं महत्व जाणून आहे. Sudha Murthy Stories
परंतु इंद्राचे काही केल्या समाधान होईना. त्याने स्वत:च यमराजांना बोलून त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देण्याचे ठरवले. तो अरण्यामध्ये त्यांच्या शोधात निघाला. तो गंगा नदीच्या पात्रातून पलीकडे चालत निघाला. तेव्हा त्याला पाण्यात एक सुंदर असे सुवर्णकमळ दिसले. ते पाहून इंद्राला आश्चर्य आणि आनंद झाला. हे इतके सुंदर सुवर्णकमळ कुठून आले हे पाहण्यासाठी तो ज्यावेळी शोध घेऊ लागला त्यावेळी तो एका टेकड्यांच्या जवळ येऊन पोहोचला. तिथे एक सुंदर तरुणी मूक रुदन करताना पाठमोरी पाहिली. तिच्या डोळ्यातून जे टपटप अश्रू गळत होते. त्यापासूनच या सुवर्णकमळांची निर्मिती होताना इंद्राने पाहिले. तिच्या जवळ जाऊन त्यांनी तिला तिच्या मूक रुदनाचे कारण विचारले. परंतु ती काहीच न बोलता टेकडीच्या दिशेने चालू लागली. तिच्या सौदर्यांने इंद्रदेव इतके मोहीत होऊन गेले की, त्यांनी तिच्या पाठी पाठी जाणे पसंत केले. चालता चालतो ते टेकडीच्या माथ्यावर येऊन पोहोचले. Sudha Murthy Stories
केवळ केसांसाठीच नाही तर या कारणासाठीही फायदेशीर आहे नारळ
(Sudha Murthy Stories ) तिथे पोहोचल्यानंतर इंद्राला एक अत्यंत सुंदर जोडपे चतुरंगाचा डाव खेळताना दिसले. इंद्र हा त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिला परंतु तरीही त्या जोडप्याला तो दिसला नाही. हा इंद्राला त्याचा अपमान वाटला.मला पाहून एखाद्याने माझा सन्मान ठेवायलाच हवा. परंतु हे जोडपं आपल्यात इतकं रममाण आहे की त्यांना कसलंही भान नाही. त्यामुळे हा अपमान वाटून इंद्राने आपल्या वज्राने त्यांच्यावर घात करण्याचे ठरवले. त्याने आपले आयुध काढून त्यांच्यावर रोखले. पण त्याचवेळी त्या जोडप्यामधील तरुणाने मान वर करुन त्यांच्याकडे रोखून पाहिले. त्या तरुणाच्या त्या कटाक्षाने इंद्रदेव तसेच्या तसे थिजून राहिले. त्यांना कोणतीही हालचाल करताा येईना. आपल्याबाबतीत हे असे का झाले हे काही इंद्राला कळेना. पुन्हा तो तरुण खेळू लागला. त्यांचा तो खेळ संपेपर्यंत इंद्रदेव तसेच खिळून होते. अखेर डाव संपला आणि त्या तरुणाने इंद्राला हाक मारली. त्यानंतरच इंद्राला हालचाल करणे शक्य झाले. Sudha Murthy Stories
तो तरुण पुढे म्हणाला,’ हे इंद्रा तू देवांचा राजा आहेस खरा. पण हे पद भूषविण्याची तुझी अजिबात लायकी नाही. तू धनाढ्य आणि बलशाली असल्याचा तुला फारच गर्व आहे. पण एक खरी गोष्ट सांगतो माझ्याकडे जो येतो त्याचे सामर्थ्य माझ्यापुढे काहीही नाही. Sudha Murthy Stories तुला तुझ्या सामर्थ्याचा इतका गर्व झाला असेल तर एक काम कर तुला समोरच्या बाजूला जो पर्वत दिसतो आहे ना, तो सर्वशक्तीनिशी तू मला पालथा करुन दाखव.
हे ऐकल्यावर इंद्राने त्या पर्वताजवळ जाऊन तो पर्वत उलटा करुन टाकण्याचा प्रयत्न केला. पण तो पर्वत रेसभरसुद्धा हलला नाही. हे पाहून तो तरुण उठला आणि अत्यंत लीलया तो पर्वत पालथा केला आणि तो इंद्राजवळ येऊन उभा राहिला. त्याने जो पर्वत पालथा केला त्याला चार पुरुष दीर्घकाळापासून चिकटून असलेले दिसते. तो तरुण म्हणाला, हे बघ इंद्रा, तू सुद्धा यांच्यासारखाच आहे. तू असं कर त्यांच्याजवळ जा आणि त्यांच्या शेजारी पडू राहा. तू तर याचौघांमधला आणि एक पाचवा झाला आहे.
त्याबरोबर इंद्राला आपली चूक कळली. त्याने लगेचच त्या तरुणापुढे हात जोडले आणि विचारले, तुम्ही कोण आहात? माझी चूक मला कळली आहे. तुम्ही कोण आहात? इतके मला सांगा.
त्याक्षणीच ते तरुण जोडपे आपल्या मूळ रुपात आले म्हणजेच ते साक्षात शंकर-पार्वती झाले. भगवान शंकर म्हणाले,’ ही टेकडी तू पाहात आहेस हे माझे ठिकाण अर्थात कैलास पर्वत आहे. तू माझ्याच निवासस्थानी आलेली आहे. हे लक्षात घे की, तुला आज जे काही प्राप्त झाले आहे ते केवळ आणि केवळ तुझ्या पदामुळे प्राप्त झाले आहे. पण जर तुझा उद्धटपणा असाच सुरु राहिला, इतरांचा मत्सर करत राहिलास तर तू या सिंहासमावर फार काळ टिकून राहणार नाही. पृथ्वीतलावर मृत्यू झाला नाही याचा तुला इतका मत्सर वाटू लागला आहे. तुला ब्रम्हदेवांनी थोडी वाट पाहण्यासाठी सांगितले परंतु त्यांचंसुद्धा तू ऐकलेलं नाहीस आणि स्वत:च या बाबतीत ढवळाढवळ करायला गेलास. हे करताना तुला अचानक एक तरुणी दिसली तिच्या मागे मागे तू इथे आलास. तू कशाचाही विचार न करता जोडप्यांना पाहून मान मिळण्याची अपेक्षा केली. पण तू मात्र कोणाचाही आदर करत नाही. म्हणूनच तुझा अनेकदा युद्धातसुद्धा पराभव झालेला आहे. तू एकदा पराभूत झालास की, तुझी जागा घेण्यासाठी एक नवीन इंद्र निर्माण करुन तो तुझ्या स्थानी देवाधिराज होऊन बसतो. तुला जे समोर चार पुरुष दिसत आहेत ते आधी होऊन गेलेले इंद्रच आहेत. त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना इथे असे पडून राहण्याची शिक्षा मिळाली आणि तुलासुद्धा त्यांच्यातच स्थान मिळणार आहे.
हे ऐकून इंद्र घाबरला आणि माफी मागू लागला. दयायाचना करु लागला. त्याबरोबर तेथे असलेल्या सगळ्या इंद्रांनी भगवान शंकराकडे दयायाचना करायला सुरुवात केली. भगवान शंकारांना त्यांची दया आली. ते म्हणाले, तुम्हाला तुमच्या अपराधाची शिक्षा म्हणून पृथ्वीतलावर माणसाचा जन्म घ्यावा लागेल. पण अर्थात तिथे तुम्ही चांगले आणि सज्जन माणसं म्हणून जन्म घ्याल. तुम्ही अत्यंत साहसी आणि धैर्यशील असे योद्धे व्हाल. तुमच्या हातून पुण्यकर्मे घडतील. त्याबद्दल तुमचा सगळीकडे उदोउदो होईल. तुमच्या पराक्रमामुळे आणि सत्कर्मामुळे तुम्ही लोकांच्या स्मरणात राहा.पृथ्वीतलावर असताना भगवान विष्णूंच्या मदतीने तुम्ही धर्माचे रक्षण कराल. जी स्त्री तुम्हाला इथे घेऊन आळी, ती तुमच्या मानव अवतारामध्ये तुमची पत्नी म्हणून तुमच्यासोबत राहील. तुमचे पृथ्वीवरील कार्य संपुष्टात आले की, तुम्ही सगळे परत स्वर्गलोकात याल.
त्यांनतर त्या पाचही इंद्रांनी आपली मान हलवून होकार देत भगवान शंकरांची आज्ञा मानली. पण त्यासोबत त्यांनी विष्णू, यमराज आणि वासूदेव तसेच देवांचे वैद्य अश्विनकुमार यांनी या आधी पृथ्वीवर मानव जन्म घेतला आहे. त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करावे अशी आमची विनंती आहे असे देखील सांगितले. त्याला मान्यता देऊन भगवान शंकरांनी त्या तरुणीकडे वळून सांगितले की, या पाचही पुरुषांच्या आयुष्यात तुझं स्थान हे फार महत्वाचे आहे. सध्या पृथ्वीवर सगळीकडे अराजकता माजली आहे. तो स्थिरस्थावर होण्यासाठी पृथ्वीतलावर एक युद्ध घडून येणार आहे त्यासाठी तू कारणीभूत ठरणार आहे.
एवढं बोलून शंकर आणि पार्वती अंतर्धान पावले. तिथून ते भगवान विष्णूंकडे गेले. विष्णू त्यांना म्हणाले, ‘ हे शिवा तू काळजी करु नकोस. मी स्वत: या काळात पृथ्वीवर कृष्णावतारात जन्म घेणार आहे. माझा सर्व आदिशेष बलराम म्हणून जन्माला येणार आहे. द्रौपदी ही माझी भगिनी असेल आणि महायुद्ध घडून येण्यास तीच कारणीभूत होईल. पण सर्व पांडवांच्या मदतीने अधर्माचे निर्दालन मीच करेन हे पाच इंद्र पाच बंधुंच्या रुपात अर्थात पांडवाच्या रुपात जन्माला येतील. त्यांना उपदेश आणि मार्गदर्शन मीच करेन. त्यामुळे पृथ्वीवर पुन्हा एकदा धर्माची पुनर्स्थापना होईल.
पृथ्वीवर गेल्यावर जो यमराजाची मदत घेईल तो धर्मराज म्हणून जन्माला येईल. जो वायूदेवाची मदत घेईल तो भीम नावाचा पांडव असेल. आत्ताचा इंद्र हा अर्जुन म्हणून जन्माला येईल. दोन्ही अश्विनीकुमारांची मदत घेणारे दोन पांडव म्हणजे नकुल आणि सहदेव असतील.
अशा रितीने संपूर्ण महाभारत हे भगवान शंकराच्या संकल्पनेतून तयार झाले आणि त्याला मूर्त रुपात आणण्याचे काम हे भगवान विष्णूंनी कृष्णरुपात केले.