12 Jyotirlinga Names, Information | ज्योर्तिलिंगाची नावे, कथा, महत्व

12 Jyotirlinga Names, Information यासंदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. आपण आतापर्यंत या संदर्भात कायम ऐकत आलो आहोत. परंतु या 12 ज्योर्तिलिंगाची तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. कारण आज आपण या सगळ्या लिंगाची माहिती त्यामागील पौराणिक कथा आणि महत्व जाणून घेणार आहोत. 2024 या वर्षात तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला याचे प्लॅनिंग करणे अगदी सोपे जाईल. 12 ज्योर्तिलिंगाची कथा ही तितकीच वेगळी आहे आणि प्रत्येक ठिकाणाचे एक महत्व आहे. त्यावरुनच त्याची खासियत आहे. या ठिकाणी तुम्ही एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

NAVDURGA NAMES & STORY | नवरात्रीच्या 9 देवींची नावे आणि कथा

सोमनाथ | Somnath | गुजरात

12 Jyotirlinga Names

12 ज्योर्तिलिंगाची माहिती घेताना पहिले जे शिवलिंग आहे ते सोमनाथ आहे. गुजरातमधील सौराष्टमध्ये असणारे सोमनाथाचे मंदिर हे अनेक शिवभक्तांसाठी कायमच आकर्षणाचा बिंदू असते. वर्षाचे 12 महिने या ठिकाणी विविध भक्तांची रेलचेल असते. सोमनाथाचे मंदिर जितके सुंदर आहे. तितकीच त्यामागील कथा ही रंजक आणि रहस्यमयी असल्याचे मानले जाते. सोमनाथ मंदिराची निर्मिती ही विशिष्ट अशा दगडांपासून केलेली आहे. या मंदिराच्या आत अनेक रहस्यमयी गुंफा आहेत यामध्ये चंदनाची झाडे देखील आहे. असे म्हणतात की, वास्तुविशारदांकडून याची निर्मिती करण्यात आली आहे. (12 Jyotirlinga Names)येथील गुहा या तपस्वी आणि साधूंनी तपश्चर्या करण्यासाठी वापरल्या आहेत असे काही दाखले आहेत. ज्योर्तिलिंगापैकी हे एक महत्वाचे असे ठिकाण आहे. सोमनाथ मंदिरावर अनेक वेळा आक्रमणदेखील झाली आहेत. यामंदिरावर अल्लाऊदिन खिल्जीने देखील आक्रमण केले होते. या मंदिराला लुटण्यात देखील आले आहे. परंतु आजही याची कोणतीही श्रद्धा कमी होताना दिसत नाही. 12 Jyotirlinga Names
हे मंदिर गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप या तीन भागात विभागलेले आहे. या मंदिराचा शिखर 150 फूट इतका आहे.

सोमनाथ मंदिराची कथा 2 Jyotirlinga Names

सोमनाथ मंदिरामागेही एक पौराणिक कथा सांगितली जाते. जी आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल. जर पुराणाची आवड असेल तर तुम्हाला याची माहिती असायला हवी. (12 Jyotirlinga Names)

सोम अर्थात चंद्र. ही कथा चंद्रदेवाची आहे. चंद्रदेवांसोबत दक्षच्या मुलींचे लग्न करण्यात आले होते. त्यांच्या 27 मुलींचे लग्न चंद्रदेवांसोबत झाले. परंतु त्यातील रोहिणीवर त्यांचे नितांत प्रेम होते. ही गोष्ट दक्ष राजाच्या मुलींना अजिबात पसंत नव्हती. त्या दक्ष राजाकडे याची तक्रार देखील करत असे. एक दिवस क्रृद्ध होऊन दक्ष राजांनी चंद्रदेवाला शाप दिला. ‘तुला क्षय रोग होईल’ तुझा प्रकाश दिवसेंदिवस कमी होईल. चंद्राचे चांदणे कमी झाले तर रात्री अंध:कार होऊ लागला. त्यावेळी सगळ्या देवांनी दक्ष राजाला आपला श्राप परत घेण्यासाठी विनवणी केली. त्यावेळी त्यांनी शापमुक्त होण्यासाठी चंद्रदेवाला सरस्वतीच्या मुखाशी असलेल्या अरबी समुद्राजवळ उपासना करण्यासाठी सांगितली. त्यावेळी चंद्रदेवांनी भगवान शंकराची आराधना केली. (12 Jyotirlinga Names)महामृत्यूंजय मंत्राचे जाप केले आणि भगवान शंकारांना प्रसिद्ध केले. त्यांनी चंद्रदेवाला त्या पापातून मुक्त केले. चंद्राचा प्रकाश हा पृथ्वीतलावर 15 दिवस असेल आणि 15 दिवस नसेल यालाच आपण ‘पौर्णिमा’ व ‘अमावस्या’ म्हणतो. त्यानंतर सोमनाथाचे रुप घेऊन ते त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. तेच हे सोमनाथ मंदिर म्हणून पुढे प्रसिद्धीस आले.

मल्लिकार्जुन | Mallikarjun | आंध्रप्रदेश

12 ज्योर्तिलिंगामधील दुसरे ज्योर्तिलिंग आहे ते म्हणजे मल्लिकार्जुन. आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यामध्ये हे देवस्थान येते. कृष्णा नदीच्या श्रीपर्वतावर हे ठिकाण आहे. येथेही अनेक जण नक्कीच जातात. या देवस्थानाही मान्यता आहे. शंकर भक्त या ठिकाणी जाणार नाहीत असे अजिबात होत नाही. असे म्हणतात या ज्योर्तिलिंगाची जो भेट घेईल त्याला अश्वमेध यज्ञ करुन जे पुण्य प्राप्त होते ते पुण्य मिळते. या मंदिराला दक्षिण कैलास असेही मानले जाते. मल्लिकार्जुन मंदिराच्या परिसरात पिंपळ आणि अन्य मोठी वृक्ष आहेत. या ठिकाणी माता पार्वतीचे देखील मंदिर आहे. मंदिरातील लिंगाला स्पर्श करण्याची परवानगी दिली जाते. या मंदिराच्या सभा मंडपात नंदीची खूप मोठी अशी मूर्ती आहे. मल्लिका अर्थात देवी पार्वती आणि अर्जुन हे भगवान शंकराला म्हटले जाते. म्हणून या स्थानाचे नाव मल्लिकार्जुन असे पडले आहे.

मल्लिकार्जुन मंदिराची कथा

पुराणात या मंदिराच्या अनेक कथा सांगितल्या जातात. त्यापैकी आज आपण दोन कथा जाणून घेऊयात.

आपल्या सगळ्यांना कार्तिकेय आणि गणपती बाप्पाच्या प्रदक्षिणेची गोष्ट माहीतच असेल. असे म्हणतात की, ती स्पर्धा जिंकल्यानंतर गणपती बाप्पाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यात आल्या. त्यांचे लग्न रिद्धी आणि सिद्धी यांच्यासोबत करण्यात आले. त्यामुळे दु:खी झालेले कार्तिकेय घर सोडून निघून गेले. ते एकटे क्रोंच पर्वतावर राहू लागले. कार्तिकेयची समजूत काढून त्याला घरी आणण्यासाठी नारदमुनींना देखील पाठवण्यात आले परंतु कार्तिकेय काही केल्या घरी येण्यास तयार नव्हते. माता पार्वतीचे मन आपल्या लाडक्या पुत्रासाठी झुरत होते. त्याला पाहण्यासाठी माता पार्वती आणि शिवजी क्रौंच पर्वतावर आले. ते आल्याची सूचना मिळताच कार्तिकेय त्यांच्यापासून अजून दूर निघून गेला. त्यावेळी भगवान शंकर आणि माता पार्वती त्या ठिकाणी लिंग रुप धारण करुन राहिली. त्यालाच मल्लिकार्जुन असे नाव पडले. (12 Jyotirlinga Names)

कथा क्रमांक 2

पुराणात अशी एक अन्य कथा सांगितली जाते की, क्रौंच पर्वताच्या शेजारी चंद्रगुप्त नावाच्या राजाचे राज्य होते. त्याची कन्या कोणत्यातरी संकटात सापडली होती. त्यावेळी तिने या पर्वताला शरण जाण्याचे ठरवले. ती त्या पर्वतावर राहू लागली. तेथील कंदमुळे आणि आपल्या आणलेल्या गायीचे दूध पिऊन ती राहू लागली. पण एकदा तिच्या लक्षात आले की, आपल्या पश्चात या गायीचे दूध कोणीतरी काढून नेत आहे. त्या व्यक्तिला पकडण्यासाठी तिने गायीचा पाठलाग गेला. त्यावेळी तिला कोणी व्यक्ती दिसली नाही तर गाय जिथे दूध वाहत होती ते ज्योर्तिलिंग दिसले. ते पाहून तिला फार आनंद झाला. तिने त्या ठिकाणी मंदिर उभारले त्यालाच नाव ठेवले ‘मल्लिकार्जुन’ 12 Jyotirlinga Names

महाकाल| Mahakal | उज्जैन | 12 Jyotirlinga Names

12 ज्योर्तिलिंगापैकी तिसरे आणि प्रसिद्ध असे ज्योर्तिलिंग म्हणजे महाकाल. मध्यप्रदेशातील उज्जैन येथे महाकालचे मंदिर वसलेले आहेत. यालाच महाकालेश्वर मंदिर असे म्हणतात. पुराण, महाभारत यामध्ये या मंदिराचे रसभरीत वर्णन केलेले आढळते. भव्य, स्वयंभू आणि दक्षिणमुखी असल्यामुळे महाकालेश्वराचे हे मंदिर अत्यंत लाभदायी असे मानले जाते. या ठिकाणी पहाटेच्यावेळी जी भस्मारती केली जाते त्यासाठी आधीच बुकींग करावे लागते. भस्म हे शंकराला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे ही आरती चुकवून चालत नाही.

महाकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहामध्ये ओंकारेश्वर रुपातील शिवमूर्ती आहे. गर्भगृहात गणेश, पार्वती आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती आहेत. दक्षिणेला नंदी आहे. तिसऱ्या मजल्यावर नागचंद्रेश्वराची मूर्ती आहे ती वर्षातून एकदा नागपंचमीच्या दिवशीच खुली केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी तर इथे खूप मोठा कार्यक्रम असतो. त्यावेळीही भक्तांची अलोट अशी गर्दी असते.

महाकालेश्वर कथा

महाकालेश्वर संदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात. पण एक कथा अशी आहे की, चंद्रसेन नावाचा एक राजा होता. तो शिवाचा खूप मोठा भक्त होता. त्याची संपूर्ण प्रजा ही देखील शिवाची खूप मोठे भक्त होते. त्यामुळे या राज्यात शिवाचा वास होता. एकदा चंद्रसेन राजाच्या राज्याशेजारी असलेल्या रिपुदमन नावाच्या राजाने चंद्रसेनच्या राज्यावर आक्रमण केले. याच दरम्यान दूषण नावाच्या राजाने देखील या राज्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे सारे राज्य उद्धवस्त झाले. राक्षसाच्या उत्पादाने कंटाळलेल्या शिवभक्तांनी त्यावेळी शिवाकडे वाचवण्याचे आवाहन केले. त्यानुसार आपल्या प्रिय भक्तांना वाचवण्यासाठी धरा फाडून त्या राक्षसाचा वध करण्यासाठी शिव अवतरले. त्यावेळी त्यांनी महाकालाचे रुप धारण केले होते. त्यांनी त्या राक्षसाचा वध केला आणि जनतेचा त्याच्या जाचातून मुक्त केले. तेथील लोकांची भक्ति पाहून महाकाल तिथेच विराजित झाले. तेच हे उज्जैन येथील क्षिप्रा नदीवर असलेले महकालेश्वर मंदिर होय.

ओमकारेश्वर | Omkareshwar | मध्यप्रदेश

मध्यप्रदेशमध्ये येणारे आणखी एक ज्योर्तिलिंगमध्ये ओमकारेश्वर होय. मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील नर्मदा नदीच्यामध्ये असलेल्या द्विपवर हे मंदिर वसलेले आहे. भील्ल जमातीच्या लोकांनी या मंदिराची स्थापना केली अशी माहिती आहे. हे द्विप हिंदू धर्मातील ऊँ या कारामध्ये बसलेले आहे. नर्मदा ही पवित्र नद्यांपैकी एक पवित्र अशी नदी आहे. सृष्टीची निर्मिती करणाऱ्या ब्रम्हदेव यांच्या तोंडून ओमकाराची निर्मिती झाली. या ओमकारात 33 कोटी देव, 108 शक्तिशाली ज्योर्तिलिंग सामावलेली आहेत. मध्यप्रदेशात 2 महत्वाची अशी ज्योर्तिलिंग आहेत. एक उज्जैन आणि दुसरे ओमकारेश्वर- मामलेश्वरच्या रुपात.असे म्हणतात खूप काळ या मंदिरावर भील्ल जमातीतील लोकांचाच अधिकार होता.ओमकारेश्वर हे अत्यंत महत्वाचे असे तीर्थक्षेत्र आहे.यासंदर्भात असे सांगितले जाते की, तुम्ही जरी सगळी तीर्थक्षेत्र केलीत परंतु जर तुम्ही येथे येऊन इतर ठिकाणांहून आणलेले पाणी जर अर्पित केले नाही तर तुमची यात्रा अधुरी मानली जाते. मंदिराच्या सुरुवातीला तुम्हाला पंचमुखी गणेशाची मूर्ती दिसते.या लिंगाच्या भोवती पाणी भरलेले आहे.

ओमकारेश्वर कथा

ओमकारेश्वर मंदिरासंदर्भात एक कथा सांगितली जाते ती कथा अशी की, राजा मान्धाताने नर्मदा नदीच्याकाठी घोर अशी तपश्चर्या करत भगवान शंकाराला प्रसन्न केले. भगवान शंकराला येथे राहण्याची विनंती देखील केली. त्यावेळी या नगराला ओंकार-मान्धाता अशी मान्यता मिळाली. तर असेही सांगितले जाते की धनसंपत्तीचा राजा कुबेर याने देखील शिवाची तपस्या करत शिवलिंगाची स्थापना केली.ज्याला शिवाने देवांचा धनपति बनवले. ही देवता धनाची देवता म्हणून ओळखली जाऊ लागली. या ठिकाणी नर्मदा आणि कावेरीचा सुंदर संगम पाहायला मिळतो. कुबेराला स्नान घालण्यासाठी भगवान शिवाने आपल्या जटेने कावेरी नदी येथील आणली होती. त्याचा प्रत्यक्ष अनुभव या नदीचा संगम पाहिल्यावर अनुभवता येतो.

केदारनाथ | Kedarnath | Uttarakhand

हिमालयातील केदारनाथ हे अत्यंत प्रसिद्ध असे ठिकाण आहे. केदारनाथवर आलेल्या प्रलयानंतर तर या ठिकाणाकडे अनेकांचे लक्ष आहे. जगभरातून विविध पर्यटक हे ठिकाण पाहायला येतात. 12 ज्योर्तिलिंगापैकी केदारनाथ हे पाचवे महत्वाचे असे ज्योर्तिलिंग आहे. केदारनाथची यात्रा कठीण तितकीच मनाला समाधान देणारी आहे. उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये केदारनाथ येते. हिमालयाच्या कुशीत बसलेल्या या मंदिराची सुंदरता वर्णावी तितकी कमी आहे. केवळ ज्योर्तिलिंगच नाही तर चारधाम यात्रा आणि पंचकेदार यात्रेमध्येही याचा समावेश केला जातो. कत्थुरी शैलीतील हे मंदिर पांडवकालीन असल्याचे अनेक दाखले आहे. त्यामुळे साधारण 1200 वर्षांहून अधिक असा याचा इतिहास आहे. या मंदिराच्या तिन्ही बाजूला केदारनाथ, कराचकुंड,भरतकुंड नावाचे तीन भलेमोठे पर्वत आहेत. यातून 5 मोठ्या नद्या वाहतात त्या म्हणजे मंदाकिनी, मधुगंगा, चिरगंगा,सरस्वती आणि स्वरंदरी.

जितके जुने आणि सुंदर हे मंदिर आहे तितकेच ते अनेक रहस्यांनी भरलेले आहे. 2013 जून रोजी या ठिकाणी इतका मोठा पूर आला होता की, हे मंदिर आणि त्या आजुबाजूचा परिसर पाण्याखाली गेला होता. येेथे भुस्खलन देखील झाले. परंतु याने मंदिराला कोणतेही नुकसान झाले नाही. काही काळासाठी हे मंदिर बंद ठेवण्यात आले. परंतु त्यानंतर तितक्याच जोमाने येथे लोकांची गर्दी दिसून आली. असे म्हणतात येथे असलेले बद्रीनाथ मंदिराची यात्रा ही केदारनाथ केल्याशिवाय असफल ठरते. हे मंदिर 6 फूटाच्या उचं अशा प्लॅटफॉर्मवर उभारण्यात आले आहे. मंदिराचा मुख्यभाग हा गर्भगृह आणि सभामंडप आहे . चारी बाजूला प्रदक्षिणा मारता येईल अशी जागा आहे. मंदिराच्या बाहेर पाहारा देण्यासाठी नंदी देखील आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये केदारनाथचे स्वयंभू लिंग आहे.

केदारनाथची कथा

पंचकेदार या संदर्भातील एक उल्लेख वर आला होता. त्यावरुनच एक कथा केदारनाथ संदर्भात सांगितली जाते. जी महाभारताशी निगडीत आहे. महाभारतात पांडवांनी युद्ध जरी जिंकले तरी देखील त्यांच्यावर भ्रातृहत्येचे पाप होते. त्या पापातून त्यांना मुक्त व्हायचे होते. यासाठी ते शंकाराचा आशीर्वाद मिळवू इच्छित होते. परंतु भगवान शंकर त्यांच्यावर क्रृद्ध झाले होते. त्यांना दर्शन देण्यासाठी भगवान शंकर तयार नव्हते. त्यांना शोधत पांडव काशीत गेले त्यांना काही शिवाचे दर्शन झाले नाही. त्यांना शोधत शोधत ते हिमालयात पोहोचले. पण शंकराला त्यांना मुळीच दर्शन द्यायचे नव्हते म्हणून भगवान शिव अंर्तध्यान करुन केदारनाथमध्ये जाऊन बसले. शंकर आपल्याला टाळत आहेत हे माहीत असूनही त्यांनी शंकराचा शोध काही सोडला नाही. त्यांनी त्यांना शोधण्याचा दृढ निश्चय केला होता. एकदा भगवान शंकरांनी पांडवांना टाळण्यासाठी बैलाचे रुप धारण केले आणि ते बैलांच्या कळपात जाऊन मिसळले. बैलांना पाहून पांडवांना संशय आला. त्यातील भीमने विशाल असे रुप धारण करुन दोन पर्वत अडवले. त्यावेळी त्याच्या विशाल पायाखालून इतर पशू गेले. परंतु एक पैल काही जायला तयार नाही. त्यावेळी त्या बैलावर सगळी ताकद पणाला लावून भीमाने उडी घेतली. परंतु तौ बैल जमिनीत जाऊ लागला. त्याच्या पाठीचा त्रिकोणी भाग भीमाने पकडून धरला. पांडवाचा तो दृढ संकल्प पाहून भगवान शंकर प्रसिद्ध झाले. त्यांनी पांडवांना तात्काळ दर्शन दिले आणि त्यांना सगळ्या पापांतून मुक्त केले. केदारनाथमध्ये पाठीचा हाच भाग पिंड रुपाने पूजला जातो. ज्यावेळी भगवान शंकर रुपी बैलाने अंतर्ध्यान करण्यास सुरुवात केले. त्यावेळी त्याचा धडाचा बरचा भाग काठमांडूमधून बाहेर आला तेथे पशुपतिनाथाचे मंदिर आहे. शिवाचे हात तुंगनाथमधून आले, मुख रुद्रनाथमधून आले. बेंबी मद्यहेश्वर आणि जटा कल्पेश्वरमधून आले. त्यामुळे केदारनाथसोबत पंचकेदार म्हणून प्रसिद्ध झाले.

भीमाशंकर | Bhimashankar | Maharashtra

महाराष्ट्रात 12 ज्योर्तिलिंगापैकी 6 वे ज्योर्तिलिंग आहे. पुण्यातील खेडमध्ये भीमाशंकर आहे. सह्याद्री पर्वतावर भीमाशंकर बसलेले असून तेथून भीमा नावाची नदी वाहते. त्यावरुन त्याला भीमाशंकर असे नाव पडले आहे. भीमाशंकर ज्योर्तिलिंगाचे वर्णन हे शिवपुराणातही आहे. साधारण 3,250फूट उंचीच्या पर्वतावर हे मंदिर आहे. या मंदिरात असणारे शिवाचे लिंग हे मोठे आणि जाड आहे म्हणून याला मोटेश्वर असे देखील म्हणतात. भीमाशंकरचे मंदिर हे नागर शैलीत बनलेले आहे. या शिवलिंगाचा आकार इतर शिवलिंगांपेक्षा मोठा असल्यामुळे त्याला मोटेश्वर शिवलिंग असे देखील म्हणतात. येथे जर जाणार असाल तर या ठिकाणी राहण्याची देखील सोय तुम्हाला मिळते. महाशिवरात्रीच्या काळात येथे फार मोठी जत्रा भरते.

भीमाशंकरची कथा

पुराणात अशी कथा सांगितली जाते की,कुंभकर्णाला भीम नावाचा एक राक्षस पुत्र होता.त्याचा जन्म त्याच्या पिताच्या मृत्यूनंतर झाला . कुंभकर्णाचा मृत्यू हा रामाच्या हातून झाला हे त्याला काही माहीत नव्हते. ज्यावेळी त्याला ही गोष्ट कळली त्यावेळी रामाचा वध करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. आपले उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी हजारो वर्षे कठीण अशी तपश्चर्चा केली आणि ब्रम्हदेवाला प्रसन्न केले. त्यांंच्याकडून सदाविजयी होण्याचा वरदान मागितला. जो ब्रम्हदेवांनी त्याला दिला. त्या आशीर्वादानंतर त्याने उत्पात करायला सुरुवात केली.

मनुष्य, देव-देवी या सगळ्यांना तो भयभीत करु लागला. त्याच्या जाचाला सगळे कंटाळून गेले. त्या सगळ्यांनी भगवान शिवाला शरण जाण्याचे ठरवले. आता भगवान शिवच आपल्याला यातून तारु शकेल हे त्यांना माहीत होते. भगवान शिवांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याची राख करुन टाकली. त्याच्या अत्याचारातून लोकांना मुक्ती मिळाली. त्यावेळी भगवान शिवांना लोकांनी त्याच ठिकाणी शिवलिंग रुपात विराजमान होण्याची विनंती केली. तेच हे भीमाशंकर मंदिर होय. 12 Jyotirlinga Names

Leave a Comment