Kakad Aarti | काकड आरती संग्रह मराठी 2023

Kakad Aarti ही आपल्याकडे कित्येक हजारो वर्षांपासून सुरु असलेली पद्धत आहे. देवपूजा करताना आरती ही अगदी हमखास गायली जाते. आरती ही एक प्रकारे देवासाठी गायली जाणारी स्तुतिसुमने आहेत. जी आपण छान चाल लावून गातो. गणेशोत्सव, नवरात्र या काळात आरती ही अगदी हमखास गायली जाते. परंतु काकडी आरतीचे एक वेगळेच महत्व आहे. कारण पहाटे जी गायली जाते म्हणून त्याल काकड आरती म्हणतात. कोणत्याही देवस्थानाला भेट देताना लोक पहाटेची काकड आरती अजिबात चुकवत नाहीत.

काकड आरती म्हणजे काय? असा विचार करत असाल तर काकड आरती म्हणजे देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती होय. ही आरती करण्यासाठी खास काकड्याने म्हणजे एका विशिष्ट ज्योतीने देवाला ओवाळण्यात येते म्हणून याला ‘काकड आरती’ Kakad Aarti असे म्हणतात. आज आपण या लेखात विविध काकड आरती वाचणार आहोत. य काकड आरती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. सदर काकड आरती या श्रीमती. निर्मला केतकर यांच्या काकड आरती संग्रह या पुस्तकातून घेतल्या आहेत.

काकड आरती गणपतीची Kakad Aarti

कोणत्याही कार्याची सुरुवात ही आपण लाडक्या बाप्पाने करतो. लाडक्या बाप्पासाठी काकड आरती ही तु्म्ही नक्की गायला हवी.

काकड आरती माझ्या मंगलमूर्तीची | श्रीगुरु चिन्मय मूर्तीची|
ओवाळीती रिद्धी-सिद्धी वेळ पहाटेची, शुभ वेळ पहाटेची || 1 ||

अविद्येचा वळूनी काकडा स्नेहे भिजविला | भक्ती स्नेहे भिजविला ||
वैराग्याच्या ताटी ज्ञानदीप उजळला | तुजसी दिप उजळला || 2 ||

मुख प्रक्षालुनी देव चौरंगी बसले|
लोणीशर्करा वाटी भरुनी अर्पण तूज केले देवा || 3 ||

रुप साजिरे मोदक हाती, दुर्वांची प्रिती तुजला|
मोरयाचे नाम गर्जतो चौऱ्या ढाळिती भक्ता || 4 ||

अहंकार तो असूर मर्दूनी शेंदूर चर्चिला अंगी |
शिवकन्या ही लीन होऊनी शरणागत तुजला,
आली शरणागत तुजला || 5||

भूपाळी (पांडुरंगाची)

पांडुरंगाचे नाव घेता ओठी चित्त, समाधान ते लाभी. पांडुरंगाच्या भक्तित लीन होऊन जायचे असेल तर तुम्ही पांडुरंगाची ही सुंदर भुपाळी नक्की गायला हवी.

उठा उठा साधुसंत | साधा आपुलाले हित ||
गेला गेला हा नरदेह | मग कैचा भगवंत || धृ. ||

उठोनिया वेगेसी | चला जाऊ राऊळासी ||
जळती पातकांच्या राशी | काकडआरती देखिलिया || 1 ||

उठोनिया पहाटे | विठ्ठल पाहा उभा विटे ||
चरण तयाचे गोमटे | अमृत दृष्टी अवलोका || 2 ||

जागे करा रुक्मिणीवरा | देव आहे निजगृहा ||
वेगे निंबलोण करा | दृष्ट होईल तयारी || 3 ||

पुढे वाजंत्री वाजति | ढोल दुंदूभि गर्जती |
होते काकड आरती | पांडुरंग रायाची || 4 ||

सिंहनाद शंखभेरी | गजर होतो महाद्वारी |
कोशवराज विटेवरी | नामा चरण वंदिती || 5 ||

भूपाळी ( उठा पांडुरंगा)

पांडुरंगाला उठवण्यासाठी खास भूपाळी ही गायला हवी. त्याचसाठी आहे ही ‘उठा पांडुरंगा’ भूपाळी. ही भूपाळी पांडुरंगाला उठवण्यासाठी गायली जाते. ज्याचा समावेश काकड आरती या लेखात करत आहोत.

उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकला |
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ||

संतसाधु मुनी अवघे झालेती गोळा |
सोडा शेजसुख आता पाहु द्या मुखकमळा || 1 ||

रंगमंडपी महाद्वारी झालीसे दाटी
मन उतावळे रुप पाहावया दृष्टी || 2 ||

राईरखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया |
शेज हालवुनि जागे करा देवराया || 3 ||

गरुड हनुमंत पुढे पाहती वाट |
स्वर्गीचे सुस्वर घेऊनी आले बोभाट || 4 ||

झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा|
विष्णुदास नामा उभा घेऊनी कांकडा || 5 ||

दत्तात्रेयाची भूपाळी | आरती संग्रह

दत्तात्रय महाराज एक योगी होते. त्यांना हिंदू धर्मात देव मानले जाते. स्वधर्म आणि स्वसंस्कृती जोपासना करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट्य होते. दत्त संप्रदायमार्फत आजही कार्यक्रम होत असतात.

उठा उठा हो दत्तात्रेया
जागवी माता अनसूया || धृ. ||

मूर्त दत्तात्रेयाची बाळे शोभती अत्रींची तुम्ही हो राजे त्रिभुवनीचे
दर्शन भक्तांना द्याया जागवी माता अनसूया || 1 ||

झडकरी मुख प्रक्षाळुनी घाली ते तुजला मंगलस्नान लाविते भस्म
कपाळाला प्रदक्षिणा करीता मुखाने दत्त दत्त गाता भक्ता तुम्ही आता जागवा || 2 ||

तिन शिरे सहा कर शिरावरी जटा कार कंडी रुद्राक्षांच्या माळा
शंख, चक्र, गदा, पद्म हाती धरी कमंडलू शोभते शुभवस्त्र तनुला || 3 ||

काकडा घेऊनीया हाती तजला आरती ओवाळीतो गाऊनी मंगल हे गुणगान
नमितो तुझिया चरणाला दे नाम तुझे घ्याया || 4 ||

उठा हो उठा गुरुराया उठा हो उठा दत्तात्रेया उठा हो उठा दिगंबरा उठा हो
उठा औंदुबरा जागवा तुम्ही चराचरा || 5 ||

गायीची आरती

गाय ही कामधेनू म्हणून ओळखली जाते. अशा आपल्या कामधेनूला प्रसन्न करण्यासाठी गायची आरती गायला हवी. गायची आरती या आधी तुम्ही कधी ऐकली आहे का? नसेल तर ही नक्की पाठ करा. Kakad Aarti

धेनू माय जगतजननी, रक्षितो वत्स कृपाकरुनी |
गोमूत्रात वसे गंगा, कमला गोमयासी अंगा |

अखिल देवता जिचे अंगा सदा ही प्रियकर श्रीरंगा |
जियेचे नेत्र सूर्यचंद्र, पट्टा उपेन्द्र गोकुळी कृष्ण |

बाळ अवतार, नखाग्री गोवर्धन धरुनि
रक्षितो वत्स कृपा करुनी || 1 ||

अखिल जगतास मोक्षदानी, जियेचे सालंकृत अवनी
निगमागमेची ना ध्याती, वंदिती सुरवर,
मुनिजन प्रियकर, घेता दर्शन, प्रियकर शिवसांचा
पुरवि सौख्यचि जगदंबा || 2 ||

आरती नारायणाची Kakad Aarti

अनेकांना नारायणाचे पारायण करण्यास सांगितले जाते. ज्या ठिकाणी नारायण असतात तेथे लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. त्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि समाधान मिळण्यास मदत मिळते.

ओवाळू आरति माझ्या पंढरीनाथा | माझ्या द्वारकानाथा |
दोन्ही कर जोडुनि चरणि | ठेविला माथा || धृ ||

भक्तीचिये पोटी बोध कांकडा ज्योति |
पंचप्राण जीवेभावे ओवाळू आरति || 1 ||

माया अविद्या पीळ घालुनि काकडा केला |
अनुसंधाने स्नेहामाजी सगळा भिजविला || 2

ओवाळू आरति माझ्या पंढरीनाथा | माझ्या द्वारकानाथा |
दोन्ही कर जोडुनि चरणि | ठेविला माथा || धृ ||

भक्तीचिये पोटी बोध कांकडा ज्योति |
पंचप्राण जीवेभावे ओवाळू आरति || 1 ||

माया अविद्या पीळ घालुनि काकडा केला |
अनुसंधाने स्नेहामाजी सगळा भिजविला || 2

ओवाळू आरति माझ्या पंढरीनाथा | माझ्या द्वारकानाथा |
दोन्ही कर जोडुनि चरणि | ठेविला माथा || धृ ||

भक्तीचिये पोटी बोध कांकडा ज्योति |
पंचप्राण जीवेभावे ओवाळू आरति || 1 ||

माया अविद्या पीळ घालुनि काकडा केला |
अनुसंधाने स्नेहामाजी सगळा भिजविला || 2

ओवाळू आरति माझ्या पंढरीनाथा | माझ्या द्वारकानाथा |
दोन्ही कर जोडुनि चरणि | ठेविला माथा || धृ ||

भक्तीचिये पोटी बोध कांकडा ज्योति |
पंचप्राण जीवेभावे ओवाळू आरति || 1 ||

माया अविद्या पीळ घालुनि काकडा केला |
अनुसंधाने स्नेहामाजी सगळा भिजविला || 2

ओवाळू आरति माझ्या पंढरीनाथा | माझ्या द्वारकानाथा |
दोन्ही कर जोडुनि चरणि | ठेविला माथा || धृ ||

भक्तीचिये पोटी बोध कांकडा ज्योति |
पंचप्राण जीवेभावे ओवाळू आरति || 1 ||

माया अविद्या पीळ घालुनि काकडा केला |
अनुसंधाने स्नेहामाजी सगळा भिजविला || 2 ||

काय महिमा वर्णू आता सांगणे किती |
कोटीब्रम्हहत्या मुख पाहता जाती || 3 ||

विटेसहित पाऊले जीवेभावे ओवाळू |
कोटी राशी जैसे उगवले भानू || 4 ||

मयूरपिच्छ चामरे ढाळिती ठाईच्या ठाई |
एकीकडे राई दुसरे बाजू रखुमाबाई || 5 ||

तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनीत शोभा |
विटेवरी उभा जैसा लावण्यगाभा || 6 ||

असो नसो भाव आलो तुझीया पाया |
कृपादृष्टि पाहे मजकडे पंढरीराया || 7 ||

जेवण

देवासाठी केलेला नैवेद्य हा नेहमी खास असतो. देवाला नैवेद्य अर्पण करताना त्याची स्तुती करणारे जेवणाची ही आरती तुम्ही वाचा तुम्हाला ती नक्की आवडेल. आरती संग्रह यातील ही आरती तुम्हाला नक्की आवडेल.

सांगा प्रभुला स्वंयपाक सगळा झाला, जेवाया विठू चला
रांगोळ्या घालूनीया मांडी समया | उदबत्त्या लावूनीया सुंगधी
चंदनी मांडुनी पाट | कनकाचे शोभे ताट

पेला हा पाचूचा लोटा पाहा घडवोनी सुंदर केला |
केळीचे शोभे पान, लिंबू लवणी | डाळीची, नारळाची वाटी चटणी
कोशिंबीर पेरु, केळी, रायती ही चिरली सगळी ||

वांग्याचे, दोडक्याचे, भोपळ्याचे | भरित मी केले तुजला |
आंब्याची वाटलेली डाळ केली | सर्व तऱ्हेची लोणची ही वाढियेली |
चिंचेचा ठेचा केला, पापड, पापड्याची तळियल्या ||

अळुवड्या, पाटवड्या, फुलवड्या | वडा, घारगा ही तळियेल्या
कुरड्या, सांडगे ही केले | वाढीयल्या विठूराया तुम्हा खाण्या
शिकरण, आंबरस, भजी खमंग झाली सुरुस |

साटोऱ्या, कचोऱ्या, चिरोटे, मांडे, कानवले |
बटाटे, फ्लॉवर, कोबी, वांगी, भोपळा, नवलकोल यांची भाजी
डबल बी, डाळिंबी, मटक्या, मटार, कणसे चवळ्या |

या उसळी रसाळी श्रीपळी | आंगरस त्या राखियला |
गुळपोळी, पुरणपोळी,साखरपोळी | श्रीखंड, बासुंदीही, घीवर, जिलबी |
आंब्याचा काढुनी रस मिरपुडीचाा त्याला वास |

गवल्याचा, नारळाचा, साखरेचा | मटार भात केला |
कटाच्या आमटीने वाटी भरली | सांबार, कढी, सार,वाढियेली
गवल्या, शेवयांची खीर घातले तया केशर |

लाडूदळ्या, बुंदीकळ्या, मुगदळ्या | मोतीचूर, बेसन केला |
दही, दूध, ताक, लोणी, अदमोर | वरण वाढी लिंबू पिळले भातावर
घेऊनी आचमन हाती | निघाली प्रभुला प्रीती |
स्वस्थ जेवा विठूदेवा | तुम्ही जेवा | शंकरसुत करी विनंती |

मुखप्रक्षालन (Kakad Aarti )

काकड आरती झाल्यानंतर मुखप्रक्षालन केले जाते.देवाची साग्रसंगीत पूजा करत असाल तर तुम्हाला मुखप्रक्षालन माहीत असायला हवे. काकड आरती चा हा एक भाग आहे. त्यामुळे मुखप्रक्षालन हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

काकडा झाला आता मुख प्रक्षाळा |
दोन्ही कर जोडुनि चरणी ठेविला माथा ||

मधुनवनीत शर्करा घेऊनि आली वैदर्भीबाळा |
उठले श्रीहरी बसले नवरत्न, चौरंगी ||

भाळी रेखिला कस्तुरी टिळा, चंदन सर्वांगी |
सुवासिक तुळशीची माळ, शिरी मुकुट नवरंगी ||

रत्नखचित तबकी भरल्या नवरंगी शर्करा |
आपआपुल्या जागि बैसली भक्तसभा दाट |
आनंदे गर्जती, पदी ठेवूनि लल्लाट ||

गुरुसनकादिक, वसिष्ठ, नारद भेदू आले निलकंठा |
उद्धव, अक्रूर उभे राहिले कर जोडोनिया ||

याचक आले दान मागण्या द्यावे सर्वेश्वरा |
तुकयादास भजन दे उचित निरंतरा ||

श्री तुळशीची आरती

तुळस हे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र असे रोप आहे. सगळ्या झाडांमध्ये तुळशीला अधिक मान्यता दिली जाते. या तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो. तुळशीचे महत्व पाहता तिची आरती माहीत असायला हवी.

जय देवी जय देवी जय माये तुलसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवनी हे तुलसी || धृ ||

ब्रम्हा केवळ मुळामध्ये तो गौरी |
अग्नी शंकर तेथे शाखापरिवारी |
सेवा करिती भावे सकळही नरनारी |
दर्शनमात्रे पापे हरती निर्धारी || 1 ||

शीतल छाया भूतळव्यापक तूं कैसी |
मंजिरीची आवड कमलारमणासी |
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी |
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी || 2 ||

अच्युत माधव केशव पीतांबरधारी |
तुझिया पूजनकाळी जो हे उच्चारी |
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी |
गोसावीसुत विनवी मजला तू तारी

जय देवी जय देवी जय माये तुलसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवनी हे तुलसी || धृ ||

ब्रम्हा केवळ मुळामध्ये तो गौरी |
अग्नी शंकर तेथे शाखापरिवारी |
सेवा करिती भावे सकळही नरनारी |
दर्शनमात्रे पापे हरती निर्धारी || 1 ||

शीतल छाया भूतळव्यापक तूं कैसी |
मंजिरीची आवड कमलारमणासी |
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी |
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी || 2 ||

अच्युत माधव केशव पीतांबरधारी |
तुझिया पूजनकाळी जो हे उच्चारी |
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी |
गोसावीसुत विनवी मजला तू तारी

जय देवी जय देवी जय माये तुलसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवनी हे तुलसी || धृ ||

ब्रम्हा केवळ मुळामध्ये तो गौरी |
अग्नी शंकर तेथे शाखापरिवारी |
सेवा करिती भावे सकळही नरनारी |
दर्शनमात्रे पापे हरती निर्धारी || 1 ||

शीतल छाया भूतळव्यापक तूं कैसी |
मंजिरीची आवड कमलारमणासी |
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी |
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी || 2 ||

अच्युत माधव केशव पीतांबरधारी |
तुझिया पूजनकाळी जो हे उच्चारी |
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी |
गोसावीसुत विनवी मजला तू तारी || 3 ||

आवळीची आरती

तुम्हा कोणाला आवळीची आरती माहीत आहे का? जर नसेल तर तुम्ही ही आवळीची आरती वाचायला हवी.

जयदेवी जयदेवी जयमाये आवळी |
कार्तिकमासी श्रीहरि अखंड तुजजवळी || धृ ||

अगाध महिमा तुझा वर्णू मी किती |
कार्तिकमासी तुझ्या जवळी श्रीपती || 1 ||

वृक्षरुप असुनि महिमा तव मोठा |
म्हणूनि तुजला झाला वश जगजेठी || 2 ||

पूजन करण्या तुझे उत्तम अष्टमी |
श्रीपती तुजकडे येतो टाकूनी लक्ष्मी || 3 ||

तुझ्या छायेखाली भोजन जे करिती |
अंती तयालागी वैकुंठ प्राप्ती || 4 ||

वारी म्हणे आवळी तुझ्या प्रेमाने |
श्रीहरि सत्वर भेटी देईल येऊनी || 5 ||

कर्पूरारती (आरती संग्रह)

देवासमोर धूप आणि कापूर जाळून त्याची आरती केली जाते. सगळ्यात शेवटी कर्पूरारती केली जाते. जाणून घेऊया ही कर्पूर आरती

धूप दीप झाला आता कर्पूर आरती
आता कर्पूर आरती
छत्र सिंहासनी बैसले ज्ञानकीपती
जानकीपती झाले अयोध्यानृपती
झाले अयोध्यानृपती

धूप दीप झाला आता कर्पूर आरती || धृ ||
कर्पूर वडिसम मानस माझे निर्मळ राहू दे
देवा निर्मळ राहू दे

कर्पूर वडिसम भावभक्तीचा सुगंध राहू दे
कापूराची लावून ज्योती पाहिन तव मूर्ती
देवा पाहिन तव मूर्ती

धूप दीप झाला आता कर्पूर आरती || 1 ||
ध्यान कळेना ज्ञान कळेना ना कळे काही
मजला ना कळे काही

शब्दरुपी गुंफुनी माला वाहते पायी
ह्रदयी नाम नेत्री ध्यान पाहिन तव मूर्ती
देवा पाहिन तव मूर्ती || 2 ||

प्रश्न (FAQ’S)

आरती म्हणजे काय ? (What is Aarti )
आरती ही देवासाठी गायली जाणारी स्तुतिवचने असतात. देवासमोर ती गायली जातात. आरतीतील प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. त्यामुळे त्याचा अर्थ जाणून घेऊन ही आरती गायला हवी.

काकड आरती म्हणजे काय ? ( Kakad Aarti mhanje kai ?)

काकड आरती ही पहाटेची पहिली आरती असते. देवाला जागे करण्यासाठी ही काकड आरती गायली जाते. काकड आरती करताना एक विशिष्ट ज्योत वापरली जाते. त्यामुळेच याला काकड आरती असे म्हणतात.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर करायला अजिबात विसरु नका.

अधिक वाचा

SAVITRICHI KATHA | वटसावित्री कथा (2023)




3 thoughts on “Kakad Aarti | काकड आरती संग्रह मराठी 2023”

Leave a Comment