Ghodyachi Naal | घोड्याची नाळ असते अत्यंत शुभ, जाणून घ्या महत्व

Ghodyachi Naal घोड्याची नाळ अर्थात Horse Shoe हे अत्यंत शुभ मानले जाते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात याला फारच महत्व आहे. जर तुम्हाला घोड्याची नाळ मिळाली असेल किंवा तुम्हाला घोड्याची नाळ ठेवायची असेल तर यासंदर्भातील अधिक माहिती तुम्हाला मिळायला हवी. ही माहिती आमची एक्सक्लुझिव्ह अशी माहिती आहे असा आम्ही दावा करत नाही. पण अनेक ज्योतिषशास्त्रकार आणि वास्तुशास्त्रकार यांच्याशी बोलून हा लेख आम्ही लिहीत आहोत. यात घोड्याची नाळ कशी मिळते?, ती घरात कोठे ठेवावी आणि याचे फायदे यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात. यात काही जणांनी विचारलेल्या प्रश्नांचा देखील समावेश केला आहे. हे प्रश्न कदाचित तुम्हाला देखील पडले असतील

माहीत आहे का? अयोध्या नाही तर ‘या’ राज्याची राजकुमारी होती रामाची मोठी बहीण, वाचा पौराणिक कथा  

घोड्याची नाळ मिळाली Ghodyachi Naal

घोड्याची नाळ तुम्हाला अचानक मिळणे हे अत्यंत शुभ मानले जाते, असे म्हणतात की घोड्याची नाळ (Ghodyachi Naal) ही तेव्हाच मिळते ज्यावेळी तुमच्या आयुष्यात काही चांगले बदल घडणार असतात. हे बदल तुमच्या करिअर किंवा तुमच्या खासगी आयुष्यासंदर्भात असू शकतात. तुमच्या पुढे घोडा चालत असेल आणि त्याच्या पायात ठोकलेली नाळ जर अचानक पडली आणि ती तुम्हाला मिळाली तर ‘सोन्याहून पिवळे’ असेच याबाबतीत बोलले जाते.

प्रश्न: एकदा गाडीतून जाताना आमच्या गाडीच्या पुढे जाणाऱ्या घोड्याच्या पायातून नाळ पडली. घोड्याच्या चालकाने आम्हाला घोड्याची नाळ हवी का? असे विचारले. त्याचे पैसे देखील त्याने घेतले. अशावेळी घोड्याची नाळ घेणे योग्य आहे का?Ghodyachi Naal
उत्तर : घोड्याची नाळ कोणत्याही कारणाने तुमच्या जवळ आली असेल तरी देखील चालेल. कारण जरी तुम्ही त्याची किंमत मोजली असेल तरी ती मिळणे हे तुमच्या नशिबातच होते. म्हणूनच तुम्हाला ती नाळ मिळाली. त्यामुळे मनात कोणतीही शंका नसावी. घोड्याची नाळ ही प्रगती घेऊन येते. पुढील काळात तुमच्या आयुष्यात नक्कीच काही चांगले बदल होणार आहेत यात काही शंका नाही. (Ghodyachi Naal)
मकरसंक्रात सणाची संपूर्ण माहिती खास तुमच्यासाठी

घोड्याची नाळ आहे शुभ

घोड्याची नाळ ही अत्यंत शुभ आहे हे आपण सगळेच जाणतो. परंतु त्याचा नेमका उपयोग कसा करायचा हे आता आपण जाणून घेऊया.

  1. नकारात्मकता ठेवते दूर : कोणत्याही अनिष्ट नजरेपासून वाचवण्याचे काम घोड्याची नाळ करते. विशेषत: घराच्या दरवाज्यावर जर तुम्ही U आकारामध्ये नाळ लावली तर घराला किंवा घरातील कोणालाही नजर लागत नाही.
  2. पैसा करते आकर्षित : तुमचे काम अडत नसेल आणि तुम्हाला कशातही यश मिळत नसेल तर अशावेळी तुम्ही ही नाळ व्यवस्थित जपून ठेवावी. ती पैशांच्या ठिकाणी ठेवले तरी चालेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच लक्ष्मीची चणचण भासणार नाही.
  3. शनिदोषावर उपाय : शनिचा प्रकोप हा राजाला ही रंक बनवण्यासाठी पुरेसा असतो. या शनिची अवकृपा टाळण्यासाठी घोड्याची नाळ फायद्याची ठरते. विशेषत: काळ्या घोड्याची नाळ जर तुम्ही घरात आणून ठेवली तर शनिदोषाचा प्रभाव कमी होण्यास मदत मिळते.
  4. वास्तुदोष निवारण : आपण घेतलेली वास्तु ही सगळ्याच बाबतीत योग्य असते असे नाही. काही कारणास्तव तुम्हाला वास्तुमध्ये काही योग्य नाही अशी शंका असेल तर अशावेळी तुम्ही घराबाहेर घोड्याची नाळ लावली तरी देखील चालू शकते.

घोड्याची नाळ कशी लावावी, त्याचा तुम्ही कसा उपयोग करायला हवा हे तुम्ही योग्य व्यक्तीकडून जाणून घ्यायला हवे. तसे केल्यास त्याचा अधिक लाभ मिळण्यास फायदा होईल

Leave a Comment