Adhik Maas | अधिक मास संपूर्ण माहिती | मलमास | धोंडा जेवण 2023

Adhik Maas | अधिक मास याला हिंदू पंचांगात खूप जास्त महत्व आहे. मराठी महिन्यातील एखादा महिना अधिक आला की, त्याला अधिक मास असे म्हटले जाते. 2023 मध्ये अधिक मास हा श्रावण महिन्यात आला आहे. अर्थात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र असा महिना आहे. त्यामुळे या काळात आलेला अधिक मास हा फारच मोठा साजरा केला जातो. अधिक मासात अनेक गोष्टी केल्या जातात. जावयाचा मान, धोंडा जेवण असे काही शब्द तुम्ही नक्तीच ऐकले असतील. अधिक मास संपूर्ण माहिती देण्यासाठीच हा लेख शेअर करत आहोत.म्हणजे तुम्हाला अधिक मास संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहोत. त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. (Adhik Maas)

Ramayan Katha | रावण जन्माची कथा | रामायण कथासार कथा 2, प्रत्येकाने वाचावी अशी सत्यकथा

अधिक मास म्हणजे काय? (Adhik Maas)

अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो (मलमास )

अधिक मास हा ‘पुरुषोत्तम मास’, ‘मलमास’ ,’धोंड्याचा मास’ म्हणून ओळखला जातो. अधिक मास हा काळ पुण्यकामे, व्रतवैकल्ये, विशेष व्रत करण्याचा कालावधी असतो. अधिक मास हा विष्णूदेवाला समर्पित केलेला असल्यामुळेच याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. प्रत्येक मासात अर्थात महिन्यात सूर्य हा एकेका राशीत संक्रमण करत असतो. परंतु अधिक मासात सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करत नाही. त्यामुळे अधिक मासात सूर्य संक्रात नसते. त्याचा परिणाम हा सूर्य-चंद्राच्या गतीवर होतो. त्यामुळे वातावरणाचाही कायापालट होते. वातावरणातील या बदलामुळे आरोग्यावर कोणतेही विपरित परिणाम होऊ नये यामुळेच या काळात व्रतवैकल्ये केली जातात.

अधिक मास शुभ नाही

अधिक मास हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात असला तरी देखील या काळात कोणतीही शुभ कार्ये करु नये असे सांगितले जाते. हा महिना ‘खरमास’ खराब महिना म्हणूनही ओळखला जातो. या काळात सूर्य संक्रमण होत नसल्यामुळे ‘सूर्यसंक्रात’ नसते. त्यामुळे वातावरण हे मलिन असते. अधिक महिन्यात सूर्य प्रतिकूल असल्यामुळे या कालावधीत कोणतीही नवी कामे न केलेली चांगली. कारण ही कामे पूर्णत्वास जात नाही असा समज आहे. त्यामुळे या काळात नवीन कामे घेतली जात नाही. इतकेच नाही तर अधिक मासात लग्न,मुंज, श्राद्ध, कान टोचणे, गृह प्रवेश अशी कोणतीही चांगली कामे केली जात नाही. या काळात काही मोठी वस्तू खऱेदी करायची असेल तर ज्योतिषाकडून सल्ला घेणे केव्हाही चांगले असते. (मलमास माहिती)

अधिक मास व्रत-वैकल्ये (Adhik Maas)

अधिक मासात व्रत-वैकल्यांना खूप जास्त महत्व आहे. अधिक मासात करण्यासारखी अनेक व्रत-वैकल्ये आहेत. या मासात प्रतिदिन श्री पुरुषोत्तम कृष्णाची पूजा आणि नामजप करावा. या काळात वेगवेगळे दान करण्यासाठीही सांगितले जाते. त्यापैकी एक म्हणजे दीपदान. या काळात जावयाला घरी बोलावून त्याला दीपदान करण्याची पद्धत आहे. चांदी किंवा तांबे असे कोणत्याही धातूच्या दिव्याचे या दिवसात दान केले जाते. शिवाय याच काळात अन्नदानालाही महत्व असते. (Adhik Maas)

अधिक मास आणि चांदीचे महत्व

अधिक मासात Adhik Maas वस्तू देण्यामागेही काही कारण आहे. असे म्हणतात, की माता लक्ष्मीला चांदी ही अतिशय प्रिय आहे. लक्ष्मी-नारायणाचे रुप असलेला जावई आणि मुलगी यांना चांदीच देणे अधिक योग्य मानले जाते. चांदीला धार्मिक कार्यात अत्यंत महत्वाचे असे स्थान दिले जाते. चांदी ही सात्विक आहे. असे म्हणतात की, भगवान शंकराच्या अश्रूपासून ज्या धातूची निर्मिती झाली तो म्हणजे चांदी. चांदी ही प्रेम, शांतता,शुक्र आणि चंद्र यांचे प्रतिक मानले जाते. चांदी शरीरातील पाणी आणि घटक दूर करते. शरीरातील अनेक समस्या दूर करण्याची क्षमता चांदीमध्ये असते. म्हणूनच या काळात चांदीची वस्तू दिली जाते. (मलमास)

धोंडा जेवण

अधिक मास आणि जाळीदार पदार्थ

पुरुषोत्तम काळ हा धोंड्याचा महिना म्हणूनही ओळखला जातो. धोंड्याच्या महिन्यात अन्नदानाला एक विशेष महत्व असते. हिंदू धर्मात जावई हा नारायणाचे रुप असतो. तर मुलगी ही लक्ष्मीचा अवतार. धोंड्याचा महिना हा पुरुषोत्त्म महिना असतो म्हणून या दिवसात जावई-मुलीला घरी खास जेवणाचे आमंत्रण दिले जाते. तीन वर्षातून एकदा अधिक मास येतो. त्यामुळे जावयाला खास जेवणासाठी आमंत्रण दिले जाते. जावयाला दीपदान करण्याची पद्धत आहे. त्याला कोणताही गोडधोडाचा पदार्थ देताना तो 33 पटीने देण्याची पद्धत असते. हे पदार्थ जाळीदार असावेत असे देखील मानले जाते. म्हणूनच अनेक जण तुपात तळलेले अनारसे किंवा अन्य काही गोड पदार्थ जावयाला देतात. मुलीला या दिवशी जोडवी दिली जाते. पायात घातली जाणारी जोडवी हे सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. आई मुलीला या दिवशी चांदीची जोडवी भेट देते. तर जावयाला दीपदान करते. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. त्यानिमित्ताने घरी पंचपक्वान केले जाते.

अधिक मास कथा (Adhik Maas Katha)

आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण नक्कीच सांगितले जाते. ती कथा पुढील प्रमाणे

आपल्या इथे प्रत्येक मराठी महिन्याला प्रत्येक वाराला देवता आहे. पण अधिक महिन्याला कोणतीही देवता का नाही? असा प्रश्न एकदा ऋषीमुनींनी व्यास महर्षीला विचारला. महर्षींनी त्यांना अधिक मासाचे महात्म्य सांगितले, ते म्हणाले ‘एका वर्षातील बारा पौर्णिमांचे मिळून एक चांद्र वर्ष होते. त्याचा कालावधी आहे ३५४.३६ दिवसांचा आहे. एका वर्षातील सूर्याचे १२ राशींतून संक्रमण, म्हणजे एक सौर वर्ष होय. हा कालावधी आहे ३६५.२४ दिवसांचा. त्या दोघांच्या कालावधीमध्ये १०-११ दिवसांचा फरक आहे. कालगणना नीट होण्यासाठी, या दोन्हींचा मेळ बसवायला लागतो, म्हणून साधारण दर अडीच वर्षांनी दोन्हीमध्ये ३० दिवसांचा फरक पडला, की चांद्र वर्षात एक अधिक मास घेऊन दोघांची सांगड घातली जाते. ज्या चांद्र महिन्यात सूर्याचे राशी संक्रमण होत नाही, त्या महिन्यात ‘अधिक मास’ घेतला जातो. मग त्या वर्षात १२ ऐवजी १३ महिने असतात.

अधिक मासात संक्रांत नाही. तो काही ठराविक ऋतूमध्ये येत नाही. त्या महिन्यात कोणतेही सणवार येत नाहीत. त्यामध्ये लग्नाचे किंवा अन्य मंगल प्रसंगांचे मुहूर्त काढले जात नाहीत. या तेराव्या महिन्याला स्वत:चे नाव आणि त्याला कोणतीही अधिष्ठात्री देवता नाही. त्यामुळेच अधिक मासाला कोणी देवता नाही. शुभ कार्यच काय, पितृकार्यदेखील या महिन्यात वर्ज्य मानले गेले. मग काय? सगळे जण त्याला ‘मलमास’ किंवा ‘मलीन मास’ म्हणून हिणवू लागले. अशी निंदा ऐकून अधिक मास फार दु:खी झाला. मग त्याने विष्णूची उपासना केली. त्याला विष्णू प्रसन्न झाले. त्याला विचारले, ‘तुला काय हवे आहे?’ अधिक मासाने आपले सगळे दु:ख विष्णूला सांगितले आणि म्हणाला, ‘देवा, मला कोणी देवता नाही. माझे रक्षण करणारा कोणी स्वामी नाही. माझी लाज राखणारी अधिष्ठात्री देवता नाही. त्यावर काही उपाय कर.’

कनवाळू विष्णूने त्याला स्वत:बरोबर गो-लोकात नेले. तिथे एका रत्नखचित सिंहासनावर मुरलीधर पुरुषोत्तम बसला होता. एखाद्या तेजस्वी ज्योतीप्रमाणे तो शोभून दिसत होता. ती दिव्यमूर्ती पाहून अधिक मास आनंदाने डोलू लागला. करुणासिंधू पुरुषोत्तमाने मलमासाची व्यथा जाणून त्याला वरदान दिले, ‘आजपासून तू माझा झालास. आता माझे सर्व दैवी गुण तुझ्यात लीन होतील. यापुढे तुला कोणीही मल मास म्हणणार नाही. तुला आता सगळे जण ‘पुरुषोत्तम मास’ म्हणून ओळखतील. या महिन्यात जे कोणी धर्माचरणाची पुण्यकर्मे करतील, त्यांच्या जीवनाचे सार्थक होईल. त्यांची मनोरथे पूर्ण होतील आणि माझ्या कृपेने त्यांना मुक्ती मिळेल.’ मुरलीधराचे ते शब्द ऐकून पुरुषोत्तम मासाला अतिशय आनंद झाला. परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे, तसे पुरुषोत्तमाच्या दिव्य दर्शनाने अशुभ समजला जाणारा अधिक मास शुभ झाला.

कथा क्रमांक 2

पुढे एकदा काय झाले, वनवासात असताना पांडवांनी कृष्णाला विचारले, ‘आम्ही असे काय पाप केले, म्हणून आम्हाला वनवास भोगावा लागत आहे? तू आमचे हाल कसे काय पाहू शकतोस?’ श्रीकृष्ण म्हणाले, ‘त्याला मी काय करणार? तुम्हीच द्यूत खेळून तुमच्या कर्माने वनवास ओढवून घेतला. ही तुमच्याच कर्माची फळे आहेत.’ त्यावर पांडवांनी विचारले, ‘कृष्णा, आमच्याकडून पाप घडले हे खरेच आहे; पण द्रौपदीला का वनवास भोगावा लागत आहे?’ तेव्हा कृष्णाने सांगितले, ‘मागच्या जन्मात केलेल्या अपराधामुळे तिला वनवास भोगावा लागत आहे. मागच्या जन्मी ती मेधावती नावाची कन्या होती. तिला दुर्वास ऋषींनी अधिक मासाचे व्रत करण्यास सांगितले; पण मेधावतीने त्यास नकार दिला. तेव्हा दुर्वास संतापून म्हणाले, ‘तू पुरुषोत्तम मासाला तुच्छ लेखलेस. अधिक मासाच्या व्रतावर शंका घेतेस? मुली, या अपराधासाठी तुला पुढच्या जन्मी वनवास भोगावा लागेल.’ म्हणून तिला या जन्मी वनवास भोगावा लागत आहे.’ पांडव आणि द्रौपदी कृष्णाला म्हणाले, ‘जे मागे होऊन गेले ते बदलता येत नाही; पण या पुढे आम्ही काय करावे, की ज्या योगाने आम्हाला सुखप्राप्ती होईल?’ त्यावर कृष्णाने त्यांना अधिक मासाचे व्रत सांगितले. पांडवांनी त्याप्रमाणे केल्यावर त्यांची इच्छाशक्ती वाढली. त्या जोरावर त्यांना गेलेले राज्य परत मिळवता आले आणि मग ते सुख-समाधानाने राहिले.’

व्यास ऋषी म्हणाले, ‘अधिक मासात जे कोणी जप, तप, व्रत, पूजा, यज्ञ, होम करतील, त्यांना अनंत पुण्य प्राप्त होते. जे लोक भगवद्गीता, भागवत कथा अथवा रामकथेचे वाचन किंवा श्रवण करतात, त्यांना विशेष पुण्य प्राप्त होते. पुरुषोत्तम मासात जे भक्त फरशीवर झोपतात, एक वेळ जेवतात आणि दानधर्म करतात, त्यांना मन:शांती मिळते. पुरुषोत्तम महिन्यात प्रत्येकाने काही तरी विशेष यागाचे, योगाचे, आरोग्याचे, मन:शांतीचे पुण्यकर्म करावे. जे असे व्रत घेतील, त्यांना पुरुषोत्तम मास लाभेल.’

शरीराला थोडा ताण पडेल, मनाला थोडे आवरावे लागेल अशी व्रते केल्याने इच्छाशक्ती वाढते. व्रत आणि नेम मन व शरीराला काही चांगल्या सवयी लावण्यासाठी दिलेल्या प्रथा आहेत, असे म्हणू शकतो. आजच्या भाषेत सांगायचे, तर हा नवीन सवयी लावून घेण्यासाठी दिलेला अधिक वेळ आहे. एखादी गोष्ट महिनाभर न चुकवता केली, तर ती सवयीची होते, असे पाश्चात्य प्रशिक्षक कळकळीने सांगतात. तीच सोय अधिक मासाच्या व्रताने करून दिली आहे. दर अधिक मासात काही नवीन व्रत धरावे, ते मनोभावे पाळावे आणि मग जन्मभर सवय म्हणून एक एक रत्न जडून घ्यावे. हेच त्या व्रताचे महात्म्य आहे. (Adhik maas)

(वरील कथा ही पौराणिक ग्रंथातून घेण्यात आलेली आहे. Storyus ने ती या माध्यमातून पोहोचवण्याचा केवळ प्रयत्न केला आहे. )

मार्गशीर्ष गुरुवार कथा | MARGSHISH GURUVAR KATHA 2023

LORD SHRI RAM NAMES BOYS 25 + | मर्यादापुरुषोत्तम राम वरुन मुलांची नावे

Leave a Comment