Kasartaka Story बद्दल आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. कोकणात अनेक अशी ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला जागृत अशी देवस्थाने पाहायला मिळतील. या सगळ्या देवस्थांनाची आपली अशी खासियत आहे. त्यामागे श्रद्धेसोबत इतिहासदेखील आहे. अनेक देवस्थांनाच्या कथा कदाचित काही जणांना अंधश्रद्धेचा एक भाग वाटतील. पण लोकांना आलेल्या अनुभवानंतरच ही देवस्थाने प्रसिद्ध झाली आहेत. अशीच एक कथा आहे कासारटाक्याची…. आता हा कोणी देव आहे तर नाही… कोणाचे रुप आहे तर अजिबात नाही. तरीही त्याला इतके का मानतात तुम्हाला माहीत आहे का? चला आज आपण या बैरागी कासारटाक्याची कहाणी जाणून घेऊया.
कासारटाक्याची कथा | Kasartaka Story
पूर्वीच्या काळी वाहनांची सोय नव्हती. कोणतेही काम करायचे असेल तर गावच्या गावे चालून मगच व्यापार करावा लागेल. गावातील लोकांना लागणाऱ्या गोष्टी वाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याशिवाय पर्याय नसे. रस्ते नसल्यामुळे जंगली श्वापदांपासून वाचून प्रवास करावा लागत असते. असाच एक कासार एका गावातून दुसऱ्या गावात महिलांना बांगड्या भरण्यासाठी जात असे. खांद्यावर बांगड्या घेऊन चौके मार्गे धामापूरात येत असे. त्या काळी महिलांना बांगड्या भरुन घेणे अत्यंत आवडत असे. त्यामुळे कासाराला खूपच मागणी असायची. तो चांगले पैसेही कमवत होता. एकदा काही चोरांची नजर या कासारावर पडली. कासार चांगलेच कमवत असेल. याला लुटले तर आपल्याला फायदा होईल असे समजून त्यांनी या कासाराला लुटण्याचे ठरवले.
निर्जन अशा ठिकाणी कासाराला गाठून त्याला लुटण्याचे ठरले त्यानुसार ते जंगलात त्याची वाट पाहात थांबले. कासार आल्यावर त्याला गाठले आणि त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पण कासार ते काही द्यायला तयार झाला नाही. कासाराने नकार दिल्यामुळे त्या कासाराचे शीर धडावेगळे केले.Kasartaka Story

त्याचे शीर येथे असलेल्या ओढ्यात पडले. कासाराच्या खूनाची माहिती खूप दिवसांनी लोकांना कळली. त्याचा अतृप्त आत्मा हा या परिसरात भटकू लागला. त्याने कोणालाही त्रास दिला नाही. उलट वाटसरु बनून तो लोकांची मदत करु लागला. येथे लोकांनी नवस केल्यानंतर ते पूर्ण होऊ लागले. त्यामुळे हा कासारटाका नवसाला पावणारा देव झाला.Kasartaka Story
याला कासार टाका असे नाव कसे पडले असा विचार करत असाल तर असं म्हणतात की, या कासाराचे शीर टाकीत पडले म्हणून त्याचे नाव ‘कासार टाका’ असे पडले. त्याला मासांहार आवडायचा म्हणून त्याला नैवेद्य देताना येथे मासांहार दिला जातो. येथील बाजूलाच असलेल्या ओहोळाजवळ अनेक जण मासांहार शिजवतात आणि खातात देखील.
नवसाला पावणारा कासारटाका
हा कासारटाका आता एक देवस्थान झाले असून येथे आलेली लोकं या मंदिरात डोकं टेकवल्याशिवाय पुढे जात नाही. हे मंदिर तसं काही भव्य नाही किंवा येथे कोणतीही सजावट तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पण या गावातील लोकं येथे आवर्जून येतात. त्याला नैवेद्य दाखवतात. त्याच्याकडे आपल्या इच्छा व्यक्त करतात.
असे जाता येईल कासारटाका
कासारटाका जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तळकोकणाचा चांगलाच अनुभव येईल. कुडाळ स्टेशनला उतरल्यानंतर तुम्ही रिक्षा करुन येथे येऊ शकता. या मार्गावरुन एसटी देखील जातात. तुम्ही जे सोयीस्कर आहे ते वाहन करुन या ठिकाणी जाऊ शकता. या ठिकाणी जाणारच असाल या पुढे असलेले सातेरी देवीचे मंदिरही पाहा.
ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास storyus.in ला लाईक करायला विसरु नका.