MakarSankrant Informantion 2026| मकरसंक्रात विस्तृत माहिती

MakarSankrant Informantion 2026वर्षाची सुरुवात ज्या सणाने होते तो सण म्हणजे ‘मकरसंक्रात’ सूर्य मकर राशीत प्रवेश करणारा हा कालावधी अत्यंत लाभदायी असा मानला जातो. वातावरणात झालेले आल्हादायक बदल, या काळात येणारी वेगवेगळी फळं, भाज्या यांचा समावेश आहारात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. मुळातच भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे या देशात विविध ठिकाणी पिकणाऱ्या फळ, भाज्या, धान्यांना मान देऊन त्यांचा आनंद साजरा करणे ही पद्धत आपल्याकडे आहेच. भारतात भिन्न प्रदेशात बनवले जाणारे भिन्न भिन्न पदार्थ याच सणांच्या निमित्ताने आपणा सगळ्यांना चाखायला मिळतात. मकरसंक्रात हा सण पौष महिन्यात येतो. हा सण 14 किंवा 15 जानेवारी याच दिवशी साजरा केला जातो. या काळात बोरन्हाण, हळदीकुंकू असे काही कार्यक्रम आवर्जून केले जातात. या सगळ्यांचीच माहिती आपण या लेखातून विस्तृतपणे घेणार आहोत.

मकरसंक्रातीचे महत्व (MakarSankrant Informantion 2026 )

सौजन्य – Instagram

लेखाची सुरुवात करण्यापूर्वी आपण या सणाची थोडक्यात माहिती घेतली पण आता आपण या सणाची थोडी विस्तृत माहिती घेऊया. मकरसंक्रात हा सण फक्त महाराष्ट्रातच साजरा केला जातो असे नाही. तर हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. शिवाय याची नावे देखील वेगवेगळी आहेत. भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर सूर्य या काळात उत्तरेला सरकत असतो. ही न थांबणारी अशी क्रिया आहे. या काळात सूर्य हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला ‘मकरसंक्रात’ म्हणतात. सूर्याचे उत्तरायण म्हणून याला ‘उत्तरायण’ असे देखील म्हणतात. पश्चिम बंगालमध्ये याला त्यांच्या भाषेत ‘मोकोर संक्राती’ (म्हणजेच संक्रात केवळ उच्चारात थोडासा बदल ), नेपाळमध्ये याला ‘माघे संक्राती’ (याअर्थ सूर्याचे हस्तांतरण) असे म्हणतात. इतर राज्यांमध्ये याच काळात सण साजरे केले जातात. ते अगदीच संक्रात नावाने नसले तरी त्याचा संबंध हा याच संक्रातीशी आहे यात कोणतीही शंका नाही. जसे की आसाममध्ये ‘बिहू’, उत्तराखंडमध्ये ‘घुघटी’, बिहारमध्ये ‘दही चुरा’, तमिळनाडूमध्ये ‘पोंगल’ म्हणून साजरा केला जातो. याच काळात पंजाबमध्ये ‘लोहरी’ हा सण साजरा केला जातो. प्रत्येक सण साजरा करण्याची पद्धत ही थोड्याफार प्रमाणात वेगळी असली तरी या काळातील भौगोलिक बदल साजरे करणं हाच या मागील उद्देश असतो. MakarSankrant Informantion 2026

महाराष्ट्रातील मकरसंक्रात

MakarSankrant Informantion महाराष्ट्रात मराठी महिन्यांना अधिक महत्व आहे. पौषनंतर माघमध्ये प्रवेश केल्यानंतर येणारा हा सण अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्रात हा सण साजरा करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. मकरसंक्रात 3 दिवसांसाठी साजरी केली जाते. शिवाय हा एकमेव असा सण आहे ज्या काळात काळे कपडे घालणे हे अत्यंत शुभ मानले जाते. मकरसंक्रातीच्या आधी येणारा दिवस म्हणजे ‘भोगी’. या दिवशी खास मिक्स भाज्यांचा बेत केला जातो. या काळात मिळणाऱ्या भाज्या जसे की, हरभरा,मटार, आंबचुका,पापडी,बोरं यांचा वापर करुन कोणताही मसाला न वापरता एक भाजी केली जाते. ती बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते. संक्रातींच्या दिवशी तिळगुळ वाटला जातो आणि ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला’ या शुभेच्छा दिल्या जातात. त्यानंतर येणाऱ्या रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकू घातले जाते. याच काळात बाळांच्या उत्तम आरोग्यासाठी ‘बोरन्हाण’ देखील घातले जाते.

Tulsi Mala Niyam: कधी आणि कशी घालावी तुळशीची माळ? नियम आणि अध्यात्मिक लाभ

मकरसंक्रात आणि भोगी MakarSankrant Informantion 2026

मकरसंक्रातीच्या आधी येणारा सण म्हणजे भोगी याबद्दल आता अधिक जाणून घेणार आहोत. भोगी याचा अर्थ उपभोग, आनंद असा आहे. या दिवशी बाजारात उपलब्ध असलेले मटार, वांग,गाजर, वालपापडी, पावटा या सगळ्या भाज्या एकत्र करुन त्यात तिळाचा कूट घालून एक विशिष्ट भाजी तयार केली जाते. ही भाजी तिळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते. या दिवशी या भाजीचे फारच महत्व असते. शिवाय या दिवशी महिला अभ्यंगस्नान करण्याचीही पद्धत आहे. असे म्हणतात की, या दिवशी आंघोळ केली नाही किंवा भोगी साजरी केली नाही तर नवरा रोगी मिळतो. अशी समजूत असल्यामुळे अनेक महिला या दिवशी घरात भोगीच्या भाजीचा बेत अगदी हमखास करतात. शिवाय या काळात असे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला उब मिळते.

बोरन्हाण

मकरसंक्रातीच्या काळात लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरन्हाण घालण्याची देखील पद्धत अनेक ठिकाणी आहे. मुलांना छान पाटावर बसून त्यांच्या अंगावरून लाह्या, बोरं, फुटाणे, हरभरा टाकले जाते. लहान मुलं ते वेचून खातात. लहान मुलांनी या काळात हे पदार्थ खावे यासाठीच हा अट्टहास असते. वयाच्या 5 वर्षांपर्यंत अनेक जण बोरन्हाण घालतात. यादिवशी हलव्याचे दागिने आणि काळे कपडे मुलांना घालते जाते. त्यामुळे एक नवा आनंद मिळतो.

हळदीकुंकू समारंभ

मकरसंक्रातीपासून ते रथसप्तमीच्या काळात हळदीकुंकू घालण्याची देखील पद्धत आहे.सुवासिनी या दिवशी महिलांना बोलावून हळदी कुंकू देतात. त्यावेळी तिळाचे लाडू देण्याची पद्धत आहे. तिळाचे लाडू यामागे केवळ शास्त्र नाही तर यात विज्ञान आहे. पूर्वी महिलांना बाहेर जाणे सहज मिळत नव्हते. या निमित्ताने महिला दुसऱ्या महिलांसोबत काही वेळ घालवत असे. मनाला हवे तसे नटून त्यांना वावरता येत असे. शिवाय त्यांना पोषक असा तिळाचा लाडू या निमित्ताने खाता येत असते. त्यामुळेच कदाचित या सणाला अधिक महत्व प्राप्त झाले असेल.

मकरसंक्रात कथा

मकरसंक्रातीसाठी एक अशी आख्यायिका पुराणात नाही. तर यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्यापैकी काही महत्वाच्या गोष्टी आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. MakarSankrant Informantion 2026

  1. सूर्य देव आपला पूत्र अर्थात शनी देव यांना भेटण्यासाठी जातात. शनीला भेटण्यासाठी त्यांना मकरराशीत जावे लागते. म्हणूनच याला मकरसंक्रात असे म्हणतात. हा दिवस उत्तरायणाचे प्रतिक आहे. कारण यादिवसापासून पुन्हा रात्र छोटी आणि दिवस मोठा होऊ लागतो. सूर्य हा अधिक काळ पृथ्वीवर राहू लागतो.
  2. मकरसंक्रातची देवता संक्रातीदेवी मानली जाते. या देवीने संकरासूर नावाच्या राक्षसाचा संहार करुन लोकांचे रक्षण केले. त्यांचे आयुष्य सुखी केले. तर दुसऱ्यादिवशी किंकरासूराचा वध केला. त्यामुळे दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा केला जाते. संक्राती देवी ज्या रंगाचे कपडे परिधान करुन आली आहे ते कपडे वापरणे वर्ज्य मानले जाते.

इंग्रजी कॅलेंडरनुसार येणारा हा पहिला सण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची पद्धत आहे. मकससंक्रातीची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल आम्हाला नक्की कळवा. MakarSankrant Informantion 2026

Mahabharat Stories | महाभारत काळात कधी आणि कशी झाली होती हनुमान आणि भीमाची टक्कर, मारूतीने कसा उतरवला भीमाचा अहंकार?

Leave a Comment