Navdurga Names & Story येत्या 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे.नवरात्रीचे 9 दिवस ही देवीच्या विविध रुपांची पूजा हे आपण सगळेच जाणतो. पण या प्रत्येक देवीच्या रुपाचे विशेष आहे. ज्याची माहिती आज आपण घेणार आहोत.देवीच्या 9 रुपासोबत तिला दाखवला जाणारा प्रसाद हा देखील तितकाच खास असतो. या आधी आपण नवरात्र कथा, महिषामर्दिनी स्त्रोत हे देखील जाणून घेतले आहे. आता या लेखाच्या निमित्ताने देवीच्या 9 रुपाची ( 9 देवींची नावे) अधिक माहिती जाणून घेऊयात.
LORD SHRI RAM NAMES BOYS 25 + | मर्यादापुरुषोत्तम राम वरुन मुलांची नावे
देवी शैलपुत्री / Devi Shailputri
माता दुर्गेच्या 9 रुपांपैकी पहिले रुप म्हणजे देवी शैलपुत्री होय. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून तिला शैलपुत्री असे म्हणतात. नवरात्रीच्या दिवसांमध्ये पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची आराधना केली जाते. असे म्हणतात की, या दिवशी तुम्ही माता शैलपुत्रीची उपासना केली की तुमच्या सात चक्रापैकी सगळ्यात मूळ असे ‘मुलाधार चक्र’ हे उपासनेसाठी तयार होण्यास मदत मिळते. देवीच्या हातात डाव्या हातात कमळ आणि उजव्या हातात त्रिशुळ आहे. Navdurga Names
देवीची उपासना करण्यासाठी देवीच्या पायावर तूपाचा अभिषेक करावा. त्यामुळे सगळ्या रोगांपासून मुक्ती मिळते असे म्हणतात. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी माता शैलपुत्रीची आराधना करावी. ( 9 देवींची नावे)
मंत्र :
ॐ देवी शैलपुत्र्यै नमः॥वंदे वाद्द्रिछतलाभाय चंद्रार्धकृतशेखराम | वृषारूढां शूलधरां शैलपुत्री यशस्विनीम् || देवी सर्वभूतेषु माँ शैलपुत्री रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः|
माता शैलपुत्रीची कथा
एकदा राजा प्रजापति यांनी एक यज्ञ करण्याचे योजिले. हा यज्ञ करण्यासाठी त्याने अनेकांना आमंत्रित केले. पण त्याची मुलगी सती आणि भगवान शंकरांना आमंत्रित केले नाही. सतीला तेथे जाण्याची इच्छा होती. पण भगवान शंकरांनी मात्र मला आमंत्रित करण्यात आलेले नाही तर मला जाणे उचित नाही असे सांगितले. (Navdurga Names )
पण सती जाण्याची खूप इच्छा होती. तिने तेथे जाण्याचे ठरवले. सती आपल्या घरी गेली. तिचे म्हणावे तसे स्वागत काही झाले नाही. तिच्या भावंडांनी तिचे म्हणावे तसे स्वागत केले नाही. फक्त तिच्या आईने तिचे मनापासून स्वागत केले. पण आपल्या जिवाभावाच्या भावंडांनी मला अशी वागणूक दिली यामुळे ती क्रुद्ध झाली. भगवान शंकराबद्दलही त्यांनी काही अपशब्द काढले. राजा प्रजापति यांनी देखील आपल्या मुलीशी काही चांगला व्यवहार केला नाही. त्यामुळे सती खूपच नाराज झाली. तिने त्याच अग्नीत स्वत:ला झोकून दिले. ती त्या अग्नीत भस्म झाली.( 9 देवींची नावे)
या घटनेमुळे भगवान शंकरासह इतर देवगणही क्रुद्ध झाले. त्यांनी राजा प्रजापतिच्या यज्ञाचा विध्वंस केला. सतीच्या या रुपाचा शेवट इथेच झाला. पण पुढच्या जन्मी ती माता हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली. तिला शैलपुत्री नावाने ओळख मिळाली. हीच ती माता शैलपुत्री होय
देवी ब्रम्हचारिणी/ Devi Bramhacharini
द्वितीयेच्या दिवशी ज्या देवीची पुजा केली जाते.तिचे नाव आहे माता ‘ब्रम्हचारिणी’ ब्रम्ह या शब्दाचा अर्थ या ठिकाणी ‘तपश्चर्या’ आणि चारिणी याचा अर्थ ‘आचरण’ असा होतो. साधनेचे आचरण असलेल्या या मातेची पूजा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी केली जाते. या देवीच्या उजव्या हातात जपमाळ आणि दुसऱ्या हातात कमंडलु आहे. भविष्यपुराणात देवीच्या या रुपाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समृद्धी येण्यासाठी या मातेची उपासना केली जाते. इतकेच नाही तर ‘कुंडलिनी शक्ती’ जागृत करण्यास मदत करते. इतकेच नाही तर स्वाधिष्ठान चक्रावर ही नियंत्रण मिळवण्यास मदत करते. या देवीचा नैवेद्य हा देखील फारच साधासोपा आहे. या देवीला साखर किंवा फळाचा नैवैद्य चालतो. माता ब्रम्हचारिणीची पूजा मनोभावे केल्याने तुमच्या जीवनातील सारे अडथळे दूर होण्यास मदत मिळते. ( 9 देवींची नावे)
मंत्र :
दधाना कर पद्माभ्यामक्ष माला कमण्डलु | देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा ||
माता ब्रम्हचारिणीची कथा
माता सतीने आपल्या रुपाला भस्म करुन घेतल्यानंतर ती हिमालयाच्या घरी जन्माला आली. शंकराला पति म्हणून परत प्राप्त करण्यासाठी नारदमुनींचा उपदेश घेऊन तिने घोर अशी तपश्चर्या केली. तपाचे आचरण तिने केल्यामुळे तिला ब्रम्हचारिणी असे नाव प्राप्त झाले.तिने सगळ्यात कठीण असे व्रत केले. कडक उन्हात, कधी काही न खाता, केवळ बिल्वपत्र खाऊन तर कधी उपाशी राहून तिने कित्येक हजार वर्षे ही तपसाधना केली.
तिच्या या तपसाधनेत ती अत्यंत कृश झाली. तिचे शरीर थकून गेले. देव, ऋषिगण या सगळ्यांनी या मातेच्या तपसाधनेची प्रशंसा केली. ते म्हणाले की, इतकी कठीण तपसाधना ही केवळ तुझ्याकडूनच शक्य होती. भगवान शिव तुझे पती म्हणून तुला लाभणार आहेत. आता ही तपसाधना सोड आणि घरी जा कारण तुझे पिता तुला घेण्यासाठी येणार आहेत.
शिवाला पाहण्याची तिची तपसाधना इतकी कठोर होती की यातून आपण हाती कोणतेही घेतलेले काम सोडता कामा नये हे समजते.
देवी चंद्रघण्टा (Navdurga Names)/ Devi Chandraghanta
माता दुर्गेचे तिसरे रुप म्हणजे देवी ‘चंद्रघण्टा’ नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला या देवीची उपासना केली जाते. असे म्हणतात की या दिवशी साधकाचे मन हे मणिपूर चक्राकडे स्थिरावललेले असते. मणिपूर चक्राचा संबंध हा आपल्या पचनसंस्थेशी असतो. मणिपूर अर्थात ‘shining Jewels’. या शिवाय पुराणात असे मानले जाते की, जर माता चंद्रघण्टा प्रसन्न झाली तर तुम्हाला वेगवेगळ्या अनुभूतींचा अनुभव येतो. जसे की, दिव्य सुंगध, काही आवाज यांचा अनुभव येतो.इतकेच नाही तर माता चंद्रघण्टा ही शांतिदायक आणि कल्याणकारी आहे. या देवीच्या डोक्यावर अर्धचंद्राच्या आकारातील घंटा आहे म्हणून याला चंद्रघंटा असे म्हणतात. या देवीला 10 हात आहेत. या हातांमध्ये शस्त्र, बाण असून ही देवी युद्धाला तयार अशा मुद्रेत आहे. या देवीचे वाहन सिंह आहे. जो माता चंद्रघण्टेची उपासना करतो त्याला सगळ्या कष्टांपासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते. त्यामुळे काया वाचा मने या देवीची उपासना करावी ती अवश्य मदत करते. Navdurga Names
मंत्र :
पिण्डजप्रवरारुढा चण्डकोपास्त्रकैर्युता | प्रसादं तनुते मह्यं चन्द्रघण्टेति विश्रुता ||
माता चंद्रघण्टेची कथा
महिषासुर वधाची कथा या आधी आपण जाणून घेतली आहे. माता पार्वतीला महिषासूर मर्दिनीचे रुप घ्यावे लागले होते हीच ती माता चंद्रघण्टा होय. महिषासुराचा आतंक वाढल्यामुळे सगळेच दैव हैराण होते. स्वर्ग आपल्या ताब्यात घेण्याच्या मनुसब्यात असलेल्या महिषासुराने सगळ्यांना हैराण करुन सोडले. स्वर्गावरच त्याची नजर आहे हे देवांना कळल्यावर ते अधिकच क्रुद्ध झाले. त्यांनी आपली शक्ती एकवटली आणि त्यातून माता चंद्रघण्टा समोर आली. तिला प्रत्येक देवाने आपले शस्त्र दिले. शंकरांनी त्रिशूळ, ब्रम्हांनी कमळ, विष्णूंनी चक्र, सूर्याने तेज आणि वाहन म्हणून सिंह दिले. त्यानंतर माता चंद्रघण्टेने महिषासुराचा वध केला.
देवी कूष्मांडा / Devi Kushmanda
नवरात्रीची चौथी माळ अर्थात माता ‘कूष्मांडा’ देवीचा दिवस. या दिवशी माता कूष्मांडाची उपासना केली जाते. नवरात्रीच्या चौथ्यादिवशी माणसाचे मन हे अनाहत चक्रावर व्यतिथ झालेले असते. ज्यावेळी ही सृष्टी नव्हती. त्याकाळापासून कूष्मांडा देवीचे वास्त्व्य आहे असे सांगितले जाते. तिनेच या ब्रम्हांडाची रचना केली असे देखील मानले जाते. ही देवी आदिशक्ती, आदिस्वरुप म्हणून ओळखली जाते. या देवीचे निवास हे सूर्यमंडलामध्ये आहे असे मानले जाते.या देवीचे तेज हे सर्वदिशांमध्ये आणि प्राणिमात्रांमध्ये सामावलेले आहे. या देवीला आठ भुजा आहेत. त्यामुळे हिला अष्टभुजा देवी असे म्हटले जाते. या देवीच्या हातामध्ये कमंडलु, धनुुष्य, बाण, कमळ,अमृताने भरलेला कलश, चक्र आणि गदा आहेत. देवीचा आठवा हात ही आशीर्वाद आणि सिद्धी देण्यासाठी आहे. या देवीला कोंबड्याची बळी दिली जाते. कोंबड्याला संस्कृतमध्ये कूष्मांडा असे म्हणतात. यावरुनच या देवीचे नाव कूष्मांडा असे आहे. (Navdurga Names )
मंत्र :
सुरासंपूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च।दधाना हस्तपद्माभ्यां कूष्माण्डा शुभदास्तु मे ॥
माता कूष्मांडा कथा
पौराणिक कथेच्या दाखल्यानुसार असे सांगितले जाते की, ज्यावेळी सृष्टीची उत्पत्ती ही झाली नव्हती. त्यावेळी सर्वत्र अंध:कार पसरला होता. कोणी जीवजंतू या सृष्टीवर नव्हते. त्यावेळी माता दुर्गेची शक्ती असलेल्या कूष्मांडा देवीने या संपूर्ण ब्रम्हांडाची निर्मिती केली. ब्रम्हांड की रचना म्हणून देखील तिला कूष्मांडा म्हटले जाते. शास्त्रात असा उल्लेख केलेला आहे की, माता कूष्मांडामध्ये इतकी शक्ती आहे की, ती सूर्याचे तापमान देखील सहन करु शकते. तिच्या उपासनेने तुम्हाला शक्ती प्राप्त होऊ शकते.
देवी स्कंदमाता / Devi SKandamata
नवरात्रीचा 5वा दिवस स्कंदमाता देवीच्या उपासनेचा दिवस आहे. स्कंदमाता आपल्या भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते. स्कंद कुमार अर्थात कार्तिकेयची माता म्हणून स्कंदमाता. या देवीच्या मांडीवर एक लहान बाळ आहे ते कार्तिकेय आहे. या देवीला चार भुजा आहेत. स्कंदमाताच्या मागच्या हातात दोन कमळ आहेत. तिच्या उजव्या हातात स्कंद आहे. या देवीचा आवडीचा रंग हिरवा असून जर तुम्ही हिरवा रंग घालून या देवीची उपासना केली तर तुम्हाला त्याचा अधिक लाभ होण्यास मदत मिळेल. ज्यांना अपत्य हवे असेल त्यांनी माता स्कंदमातेची पूजा मनोभावे करायला हवी.
मंत्र :
सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया |
शुभदाऽस्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी ||
माता स्कंदमाता कथा
पौराणिक दाखल्यानुसार तारकासुर नावाचा एक राक्षस होता. ज्याचा आतंक वाढत चालला होता. पण तारकासुराचा अंत कोणीही करु शकत नव्हता. हा वध करणे फक्त कार्तिकेयला शक्य होते. पण तारकासुराचा वध करण्यासाठी कार्तिकेयला प्रशिक्षण देण्यासाठी माता दुर्गेने स्कंदमातेचे रुप घेतले.
देवी कात्यायनी / Devi Katyayini
नवरात्रीची ६ वी माळ देवी कात्यायनी देवीच्या उपासनेचा दिवस आहे. अमरकोषामध्ये माता पार्वतीला ‘कात्यायनी’ म्हणून ओळखले जाते.लाल रंग हा या देवीचा प्रिय रंग असून नवरात्रीच्या या दिवशी आज्ञा चक्र मध्ये साधकाचे मन असते. योगसाधनेमध्ये आज्ञा चक्राचे महत्वाचे स्थान आहे. जो तनमनधनाने आराधना केली तर या देवीचे दर्शन मिळण्यास मदत मिळते. या देवीच्या पूजनाने अद्भूत शक्ती आणि अनिष्ट शक्तींचा संहार करण्याची ताकद मिळते. यादेवीच्या उपासनेमुळे रोग, शोक, संताप,भय यांच्यापासून मुक्ती मिळते. कात्यायनी देवीच्या चार भुजा असून तिच्या वरच्या हातांनी अभयमुद्रा केलेली आहे. तिच्या एका हाताची वर मुद्रा आहे. उरलेल्या दोन हातांपैकी एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कमळ आहे.
मंत्र :
चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहन ।कात्यायनी शुभं दद्याद्देवी दानवघातिनी ॥
माता कात्ययिनीची कथा
असे सांगितले जाते की, कात्य गोत्रामध्ये महर्षी कात्यायन यांनी भगवती पराम्ब यांची उपासना केली होती. कठीण अशी तपस्या केली. त्यांची इच्छा होती की, त्यांना कन्यारत्न व्हावे. त्यानुसार त्यांना एक कन्या रत्न झाले. जी भगवती नावाने प्रसिद्ध झाली. तिलाच कात्यायनी असे देखील म्हटले जाते. भगवान कृष्णाला मिळवण्यासाठी ब्रिज गोपिकांनी याच देवीची आराधना केली होती. यमुना नदीच्या तीरावर तिचे वास्त्व्य आहे.
देवी कालरात्रि / Devi Kalratri
नवरात्रीची 7 वी माळ आणि देवीचे सातवे रुप म्हणजे देवी कालरात्री. या दिवशी साधकाचे मन हे सगळ्यात शेवटच्या चक्रात असते. देवी कालरात्रि हे देवीचे व्यापक असे रुप आहे. देवीच्या विनाशकारी रुप अर्थात काली, महाकाली, भैरवी, चामुंडा, चंडी आणि दुर्गा यापैकी एक रुप हे रुप आहे. कालरात्रि देवी धूर्मवर्णा, कालरात्रि आणि रौद्री या नावाने देखील प्रसिद्ध आहे. देवीचे हे रुप असे आहे की, या मुळे भूत, प्रेत,पिशाच आणि नकारात्मक उर्जा या सगळ्या गोष्टींचा नाश होण्यास मदत मिळते. या देवीच्या उपासनेने समस्त पापांचे नाश होण्यास मदत मिळते. या देवीचे रुप जरी रुद्र असले तरी देखील ती अत्यंत लाभदायी आहे.
मंत्र:
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता | लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी ||
वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा | वर्धन्मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयन्करि ||
माता कालरात्रिची कथा
एका पौराणिक कथेनुसार रक्तबीज नावाचा एक राक्षस होता. मनुष्यासोबत देवगणही या राक्षसामुळे हैराण होते. या राक्षसाचे एक विशेष असे होते की, जर या राक्षसाच्या रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला तर त्यापासून त्याच्यासारखाच राक्षस जन्माला येत होता. यामुळे सगळेच हैराण झाले होते. या राक्षसांचा संहार कोणाकडूनही होणे शक्य नव्हते. तेव्हा सर्व देवगण हे शिवांकडे पोहोचले. भगवान शंकरांना ही गोष्ट माहीत होती की, या राक्षसाचा संहार हा केवळ माता दुर्गेकडूनच शक्य आहे. (Navdurga Names )
भगवान शिवांनी माता पार्वतीला ही गोष्ट सांगितली. त्यावेळी माता पार्वतीने स्वत:ची शक्ती आणि तेज यांचा वापर करुन देवी कालरात्रिला उत्पन्न केले. देवी कालरात्रिने रक्तबीज राक्षसाचा खात्मा केला. लढताना त्याच्या शरीरातून जितके रक्त बाहेर पडले ते रक्त कालरात्रिने आपल्या मुखात घेतले. त्यामुळे त्याचा अंत झाला
देवी महागौरी/ Devi Mahagauri
नवरात्रीची 8 वी माळ ही देवी महागौरीचा दिवस आहे. या दिवशी माता दुर्गेच्या महागौरी रुपाची पूजा केली जाते. महागौरीचा वर्ण हा शुभ्र असून तिचे वाहन वृषभ आहे. या देवीच्या 4 भुजा असून तिच्या हातात डमरु, त्रिशुल आहे. तिने हाताची वर मुद्रा आणि शांतमुद्रा घेतलेली आहे. तिची तुलना ही शंख, चक्र, कुंदाचे यांच्या सुंदरतेशी केली जाते. . या देवीचे आयु हे अनेक ठिकाणी 8 वर्ष मानले जाते. त्यामुळे त्याला अष्टवर्षा भवेद गौरी असे म्हणतात. ही देवी देवतांच्या सांगण्यानुसार हिमालयात शाकंभरी देवीच्या नावाने प्रकट झाली. नवरात्रीच्या दिवसात अष्टमीचे एक खास महत्व आहे. अष्टमीच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी खास पूजा केली जाते. अनेक ठिकाणी अष्टमीचा होम आणि जागरण देखील केले जाते. या देवीच्या साधनेमुळे अलौकीक अशा शक्ती मिळण्यास मदत मिळते. आयुष्य कल्याणकारी होते. इतर दिवशीही या देवीची उपासना करणे हे कधीही चांगले.
मंत्र :
श्वेते वृषे समारुढा श्वेताम्बरधरा शुचिः | महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा ||
माता महागौरीची कथा
एका कथेनुसार भगवान शिवांना प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीने कठोर अशी तपश्चर्या केली. ज्यामुळे त्यांचे शरीर काळे पडले. भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी माता पार्वतीच्या शरीराला गंगेच्या पाण्याने स्वच्छ केले. त्यामुळे मातेचा वर्ण गौर झाला. त्यामुळेच तिला महागौरी असे नाव पडले.
या संदर्भात एक आणखी कथा सांगितली जाते की, एक सिंह खूपच उपाशी होता. तो जेवण शोधण्यासाठी एका तलावाकडे गेला. त्यावेळी देवी उमा तपास्या करत होती. देवीला पाहून त्या सिंहाची भूक वाढली. पण ती तपस्या करतेय हे पाहून तो तिची तपस्या संपण्याची वाट पाहू लागला. ती वाट पाहून पाहून तो खूप कमजोर झाला. देवी ज्यावेळी तपश्चर्या करुन उठली. त्यावेळी कमजोर सिंहाला पाहून मातेला तिची दया आली. तिने त्याला आपले वाहन बनवून घेतले. त्यामुळे देवीचे वाहन बैल आणि सिंह दोन्ही आहे.
अजून एका कथेनुसार दुर्गम नावाच्या राक्षसाचा अत्याचार वाढला आहे. त्यावेळी देवी भगवती शाकंभरीच्या सगळे शरण आले. तिने त्रिलोक मुग्ध करणाऱ्या महागौरीचे रुप घेतले. हीच महागौरी शिवालिक पर्वतावर विराजमान झाली आहे. या देवीचे शाकंभरी नावाचे मंदिर सुद्धा आहे. याच शाकंभरी देवीन महागौरीचे रुप धारण केलेले आहे.
देवी सिद्धिदात्री
माता दुर्गेची नववी शक्ती आणि नववे रुप हे देवी सिद्धिदात्री देवी आहे. नावाप्रमाणेच ही देवी सगळ्या सिद्धी तुम्हाला मिळवून देण्यास मदत करते. नवरात्रीच्या 9 व्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. असं म्हणतात या देवीची सिद्धी प्राप्ती झाल्यानंतर ब्रम्हांडातील सगळ्या गोष्टींवर तुम्ही विजय मिळवता. माता सिद्धिदात्री देवीचे वाहन सिंह असून तिच्या 4 भुजा आहेत. तिच्या हातात कमलपुष्प आहे. मार्कण्डेय पुराणानुसार अणिमा, महिमा, गरिमा,लघिमा,प्राप्ति,प्रकाम्य, इशित्व,वशित्व या चार सिद्धिया मिळण्यासाठी मदत होते.
मंत्र :
सिद्धगन्धर्वयक्षाद्यैरसुरैरमसुरैरपि | सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी ||
माता सिद्धिदात्रीची कथा
देवी पुराणानुसार भगवान शिवाने याच देवीच्या आराधनेतून सगळ्या सिद्धि प्राप्त केल्या होत्या.या देवीच्या अनुकंपेमुळेचे भगवान शकंराचे अर्धे शरीर हे देवीचे झाले होते. त्यामुळेच त्यांन अर्धनारीनटेश्वर असे म्हटले जाते. (Navdurga Names )
असे सांगितले जाते की, सुरुवातीच्या काळात ब्रम्हांडमध्ये काहीही नव्हते. त्यावेळी केवळ अंध:कार होता. त्यावेळी माता कुष्मांडाने आपल्या केवळ स्मित हास्यामुळे ब्रम्हांडाची रचना केली. त्यावेळी तिने त्रिमूर्तिची देखील रचना केली. त्यांनी शिव, ब्रम्हा आणि विष्णुची रचना केली. प्रत्येक देवतेला कार्य दिले. ब्रम्हाला सृष्टीची निर्मिती, विष्णुला संरक्षण आणि भगवान शिवांना संहारक करण्याचे कार्य सोपवले. सगळ्या देवांचे निर्माण झाल्यानंतर त्यांनी कुष्मांडा देवीची प्रार्थना केली. देवीला प्रसन्न करुन त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले आणि भगवान शिवांनी त्यांना पूर्णता देखील प्रदान करण्यास सांगितले. त्यावेळी देवी कुष्मांडाने आणखी एका देवीची रचना केली. त्या देवीचे नाव ‘सिद्धीदात्री’ देवी. माता सिद्धिदात्रीने भगवान शिवांना अष्टसिद्धि आणि त्यासोबत आणखी 18 सिद्धी प्रधान केली. याचा उल्लेख भगवान कृष्णांनी देखील केला आहे. त्यानंतर भगवान शिव यांचे शरीर हे अर्धे सिद्धिदात्री देवीचे झाले. देवी शिवाचे अर्धे रुप झाली.
नवरात्रीच्या या 9 दिवसात देवीची आराधना करताना देवीची महती आणि माहिती जाणून घ्या. देवीची