Swami Samarth Tarak Mantra 2023 | श्री स्वामी समर्थ- कथा, तारकमंत्र प्रत्येकाने करावा पाठ

Swami Samarth प्रत्येकाची श्रद्धा ही वेगवेगळी असते. हिंदू संस्कृतीत 33 कोटी देवांना नमन केले जाते. परंतु सगळ्याच देवांची पूजा अर्चना करणे शक्य होत नाही. अशावेळी आपण रोजच्या पूजेमध्ये गणपती, विष्णू,लक्ष्मी, शंकर, श्रीकृष्ण अशा देवतांना आळवतो. याशिवाय अनेकांचे श्रद्धास्थान हे श्री स्वामी समर्थ आहे. आज आपण श्री स्वामी समर्थांबद्दलची अधिक माहिती घेणार आहोत. त्याचा तारकमंत्र हा आतापर्यंत अनेकांसाठी फायद्याचा ठरला आहे. मनाची चलबिचलता घालवून शांती मिळवून देण्यासाठी तारकमंत्र हा अवश्य वाचला किंवा ऐकला जातो. एकदा तरी याचा अनुभव तुम्ही घ्यायला हवा. त्यासाठीच आज आपण स्वामी समर्थांची माहिती आणि त्यांचा तारकमंत्र जाणून घेणार आहोत. यासाठी हा संपूर्ण लेख तुम्ही वाचायला हवा.

स्वामी समर्थ माहिती | Swami Samarth

स्वामी समर्थ हे दत्त परंपरेतील चौथा अवतार आहे. त्यांच्याविषयी जाणून घेताना आधी ही माहिती घेऊया

नाव : स्वामी समर्थ
जन्मस्थान : अक्कलकोट
प्रकटदिन : चैत्र शुद्ध 2
वेश : दिगंबर (अवधूत रुप)
कार्यकाळ : १८५६ ते १८७८
संप्रदाय : दत्त संप्रदायातील चौथा अवतार
चरित्रग्रंथ : श्रीस्वामी लिलामृत, श्री गुरुलिलामृत
शिष्य : बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, आळंदीचे नृसिंहसरस्वती,रामानंद बिडकर महाराज

श्री स्वामी समर्थ जन्मकथा

swami samarth tarak mantra

स्वामी समर्थांच्या जन्माची कथाही तितकीच रंजक आहे. वर म्हटल्याप्रमाणे स्वामी समर्थ Swami Samarth हे दत्त संप्रदायातील चौथे अवतार आहेत. पण कसा? तर दत्त संप्रदायातील परंपरेचा विचार केला तर वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त यांची विभूती होऊन गेली. अत्रिऋषी आणि अनसूया यांचे पुत्र श्रीदत्तगुरु होते. दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ होतंं. पूर्वेकडील प्रांतात पीठापूर येथे 14 व्या शतकात त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपला अवतार संपविताना ‘पुन्हा भेटेन’ असे वचन दिले आणि त्याप्रमाणे त्यांनी नृसिंहसरस्वती रुपात कारंजानगर (कारंजा-वऱ्हाड) येथे जन्म घेतला. त्यांचा कार्यकाळ हा 1458 पर्यंत होता. त्यांनी गाणगापूर ?येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली. साधारण सन 1457 मध्ये अचानक यात्रेच्या वेळी कर्दळीवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे 300 वर्षांनी ते त्याच वनातून पुन्हा प्रकट झाले. पण यंदा ते श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होते. दाखल्यानुसार ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतिमत्वाचा ते चौथा अवतार मानले जातात. दत्तसंप्रदायाचा विचार करता. जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, माणिकप्रभू, नारायण- महाराज जालवणकर, चिदंबर दीक्षित, टेंबे स्वामी असे सत्पुरुष होऊन गेले. स्वामी समर्थांनी स्वत:चं मूळ वडाचे झाड आणि नाव नृसिंहभान असे सांगितल्याने त्यांने दत्तांचे चौथे अवतार मानण्यात आले. त्यामुळे दत्तभक्त हे स्वामीभक्त झाले.

यासंदर्भात एक अशी कथा सांगितली जाते की, दत्तांचे तिसरे अवतार नृसिंहसरस्वती हे कर्दळीवनात तपश्चर्येसाठी गेले. साधारण साडेतीन वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. त्यांच्याभोवती एक वारुळ तयार झाले. एकदा त्या वनात एक लाकूडतोड्या गेला त्याचा घाव चुकून त्या वारुळावर बसला. त्यातून स्वामी समर्थ प्रकटले. कुऱ्हाडीचा घाव हा त्यांच्या मांडीवर बसला आणि त्यांची तपश्चर्या भंग झाली. त्यांच्या मांडीवर हा घाव होता. इतकेच नाही तर त्यानंतर स्वामी समर्थांनी अनेक ठिकाणी भ्रमण केले. त्यांच्या दिव्यशक्तीची अनुभूती अनेकांनी आली.

अधिक वाचा
मार्गशीर्ष गुरुवार कथा | MARGSHISH GURUVAR KATHA 2023
VAIBHAV LAKSHMI VRAT KATHA 2023 | महिमा ‘वैभवलक्ष्मी’ चा
SANTOSHI MATA KATHA | संतोषी माता कथा 2023

श्री स्वामी समर्थ तारकमंत्र

महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

स्वामी समर्थांचा तारकमंत्रात मोठी ताकद मानली जाते. हा तारकमंत्र तुम्ही न चुकता उठल्यानंतर, दिवेलागणीच्या वेळेत किंवा फावल्या वेळेत म्हणावा. अगदी मनापासून हा तारकमंत्र म्हटला तर याची ताकद तुम्हाला नक्की जाणवेल.

गुरु ब्रम्हा गुरु विष्णु
गुरु : देवो महेश्वरा:
गुरु साक्षात परब्रम्ह
तस्मै श्री गुरवे नम:

नि:शंक हो रे मना, निर्भय हो रे मना
प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना,
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी ||

जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविन काल ना नेई त्याला
परलोकी हिना भिती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी ||

उगाचि भितोसी भय हे पळू दे
वसे अंतरी स्वामी शक्ती कळु दे,
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा
नको घाबरु तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी ||

खरा होई जागा श्रद्धेसहीत
तसा होशी त्याविन तू स्वामी भक्त
कितीदा दिली बोल त्यांनीच साथ
नको डगमगू स्वामी देतील हाथ
अश्क्य ही शक्य करतील स्वामी ||

विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच या पंचामृतात
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती
ना सोडिती तया जया स्वामी स्वामी घेती हाती
अशक्यही शक्य करतील स्वामी ||

स्वामी समर्थांचा हा तारकमंत्र नित्यनेमाने ऐकावा किंवा देवासमोर म्हणावा तुम्हाला नक्कीच थोडी शांती मिळेल.

मंत्राचे सामर्थ्य

हिंदू धर्मात आपण पूजाअर्चनेला चांगलेच महत्व देतो. मुळातच अचल, अशांत मनाला शांत करण्याचे काम पूजा मंत्रोच्चार करत असतात. फार पूर्वीपासून सांगून ठेवले आहे की, पुराणात असलेल्या मंत्रोच्चारात चांगलीच ताकद असते. त्याच्या केवळ उच्चाराने किंवा मनन केल्याने मनाला चांगली शांती मिळण्यास मदत मिळते. केवळ तारकमंत्रच नाही तर तुम्ही अगदी कोणत्याही मंत्राचे उच्चारण केले तरी देखील तुम्हाला अशीच कमालीची मन:शांती मिळेल.

लेख आवडला असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तिसोंबत शेअर करा. इतकेच नाही तर या संदर्भातील आणखी ही काही माहिती असेल तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.

अधिक वाचा
GARBHSANSKAR 3 | गर्भसंस्कार 3 | असे रुजवा बाळात सकारात्मक विचार
GARBHSANSKAR MARATHI -2 | बुद्धीवान बाळासाठी आईने काय करावे

2 thoughts on “Swami Samarth Tarak Mantra 2023 | श्री स्वामी समर्थ- कथा, तारकमंत्र प्रत्येकाने करावा पाठ”

Leave a Comment