Vaibhav Lakshmi Vrat Katha 2023 | महिमा ‘वैभवलक्ष्मी’ चा

Vaibhav Lakshmi Vrat Katha| लक्ष्मी मातेची कृपा अबाधित राहावी यासाठी वैभवलक्ष्मी व्रत अगदी आवर्जून करायला हवे. वैभवलक्ष्मी व्रताची प्रचिती आतापर्यंत अनेकांना आलेली आहे. धनधान्य आणि सुखसमृद्धी मिळावी असे वाटत असेल तर वैभवलक्ष्मीची पूजा अर्चना नक्कीच करायला हवी. वैभवलक्ष्मीचे हे व्रत करताना तुम्ही मनोभावे केली तर त्याचे फळ मिळण्यास मदत मिळते. वैभवलक्ष्मीची कथा शोधत असताना हाती एक पुस्तक लागले लक्ष्मी उपासना अशी करा- पं. आनंदधनराम( पब्लिकेशन : अंजली पब्लिशिंग हाऊस) या पुस्तकातून ही कथा घेत आहोत. ही कथा storyus.in आपले असल्याचा अजिबात दावा करत नाही. परंतु लोकांपर्यंत अधिकाधिक पुस्तकं पोहाचावी इतकाच या मागील प्रयत्न आहे. Vaibhav Lakshmi Vrat Katha

कथा वैभवलक्ष्मीची (Vaibhav Lakshmi Vrat Katha)

आटपाटं नगर होतं. हजारो कुटुंब राहात होती त्या नगरात, पण एकमेकांकडे पाहायला सुद्धा कोणाला वेळ नव्हता. मग एकमेकांच्या सु:ख दु:खात सहभागी होण्याची तर गोष्टच दूर राहिली आणि भरीत भर म्हणून दारु, सट्टा, रेस, जुगार,मटका अशा अनेक वाईट गोष्टी आणि व्यसने अनेकांचे सुखाचे संसार उद्धवस्त करीत होत्या.याच नगरात सुशिलेचा संसार चालला होता. नावाप्रमाणे ती सुशील आणि सात्विक होती. भजन, पूजन आणि ईशचिंतनावर तिची गाढ श्रद्धा होती. सुशीला आणि सुधाकररावांचा संसार म्हणजे एक आदर्श संसार होता; पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. हळुहळू लक्ष्मीने घरातून काढता पाय घेतला आणि उत्तम तऱ्हेने चाललेला सुशिलेचा संसार दारिद्र्याच्या गर्तेत लोटला गेला. अक्षरश: अन्नान्न दशा झाली; पण असं का घडलं? (महिमा वैभवलक्ष्मी चा)

आणि सुखी संसाराला दृष्ट लागली!

त्या महानगरातील अनिष्ट गोष्टींनी सुशिलेच्या भोळ्या भाबड्या पतीलाही सोडलं नाही. सुधाकरराव एका रात्रीत ‘लक्षाधीश’ होण्याची स्वप्ने पाहू लागले आणि रेसच्या नादी लागून ‘भिक्षाधीश’ मात्र झाले. ते दु:ख विसरण्यासाठी त्यांना दारुचे व्यसन जडले. मग काय? सुधाकररावांचा सर्वच पगारच रेसकोर्सवर आणि दारुच्या पिठ्यात गडप होऊ लागला. साहजिकच जिथे केवळ आनंदी आनंद होता तिथे आता दारिद्र्याचे दशावतार सुरु झाले. सुशिलेला अश्रू ढाळत बसण्याशिवाय पर्यायच नव्हता; परंतु तिचं भजन,पूजन आणि ईशचिंतन चालूचं होतं.
दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस नित्य नियमाप्रमाणे सुशिला ईशचिंतनात मग्न होती. दुपारचे दोन वाजले होते. इतक्यात दारावर थाप पडली. ‘भर दुपारी या एकादशीच्या घरी आणखी कोण शिवरात्र आली?’ म्हणून सुशीलेने दार उघडलं.


बैराग्याचे आगमन!

बाहेर एक जटाधार बैरागी उभा होता. काही खायला देण्यासाठी याचना करीच होता. सुशिलेला त्याची दया आली. इतक्यात तिला आठवण झाली की, सकाळीच धुणीभांडी करायला जाते. त्याने शिळी पोळी दिली ती घरात आहे. क्षणाचाही विलंब न करता ती घरात गेली आणि ती शिळी पोळी आणून त्याने ती त्या बैराग्याच्या झोळीत टाकली. नमस्कार करुन ती परत फिरणा तोच त्या बैराग्याने विचारले की,
‘माई, अशी उदास का? तू स्वत: उपाशी आहेस आणि जे जवळ होते तेही मला दिलेस. अशी किती दिवस उपाशी राहणार?’
आता सुशिलेची खात्री पटली, की हा कुणी सामान्य साधु- बैरागी नाही; पण संत महात्मा असावा. तेव्हा तिने दु:खी अंत:करणाने आपली करुण कहाणी त्याला ऐकविली आणि त्याच्या पाया पडून तिने काही उपाय सुचविण्याविषयी करुणा भाकली. त्यावर तो बैरागी म्हणाला,
‘माई, संसारात अडचणी येणारच, पण हिंंमतीने त्यांना सामोरं यायला हवं. त्यासाठी मी तुला अगदी साधे सोपे व्रत सांगतो.’Vaibhav Lakshmi Vrat Katha
व्रत लहान असलं तरी त्याचं फळ महान आहे. दर शुक्रवारी संध्याकाळी दिवेलागणीला एक- दोन खऱ्या सोन्याच्या दागिन्यांची हळद-कुंकू आणि लाल फुलाने पूजा करावी. त्या दिवशी संध्याकाळच्या स्वयंपाकात एखादा गोड पदार्थ करुन त्या सर्वांचा नैवेद्य त्या अलंकाररुपी लक्ष्मीला दाखवावा. मग उदबत्ती ओवाळून ‘वैभवलक्ष्मी’ ची आरती करुन घरातील सर्वांना त्या नैवेद्याचा प्रसाद द्यावा. मग रात्री झोपण्यापूर्वी दागिने कपाटात ठेवावेत. बस्स झाले. व्रत, जप, तप, उपवास काही नाही. उद्याच शुक्रवार आहे. उद्यापासून व्रत सुरु कर. ईश्वर तुझे कल्याण खचितच करील. ‘वैभवलक्ष्मी’ माता तुझा संसार पुन्हा सुखाचा करील.

शिळी पोळी ताजी झाली!

हे ऐकताच सुशिलेल्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आणि तिने पुन्हा त्या बैराग्याचे चरण – स्पर्श केले. त्याबरोबर त्या बैराग्याने झोळीतून सुशिलेने दिलेली पोोळी प्रसाद म्हणून तिला दिली आणि तो ताडताड पावले टाकीत निघून गेला; पण काय आश्चर्य! ती पोळी नुकतीच तव्यावरुन काढल्यासारखी ताजी आणि गरम होती.
दुसऱ्या दिवशी शुक्रवार उजाडला. सुशीला सकाळपासूनच खूप खुशीत होती. ती ज्या क्षणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहात होती. तो सायंकाळचा दिवेलागणीचा समय आला. तिने लगबगीने देवापुढे उदबत्ती लावली आणि काळजीपूर्वक जतन केलेली सोन्याची साखळी आणि अंगठी वाटीत ठेवून त्या बैराग्याने सांगितल्याप्रमाणे त्यांची मनोेभावे पूजा व आरती केली. कारण तिची बैराग्यावर पूर्ण श्रद्धा होती.
अशाप्रकारे दोन शुक्रवार गेले आणि तिसरा शुक्रवार उजाडला. आज पहिली तारीख होती; पण तिला सर्व तारखा सारख्याच होत्या. आजची दशा फारच वाईट होती. कारण घरात उदबत्ती नव्हती. दिव्यात तेल नव्हत आणि नैवेद्यासाठी धान्याचा कणही नव्हता. ती विलक्षण अस्वस्थ झाली होती. इतक्यात दार वाजले म्हणून ती भानावर आली.तिने दार उघडले आणि काय आश्चर्य! रात्री बाराशिवाय कधीही घरी न येणारे सुधाकरराव दारात उभे! ते घरात आले. त्यांनी सुशिलेला हाक मारली आणि तिच्या हातावर संपूर्ण पगाराचे पाकिट ठेवले. दोघेदी अवाक् होऊन क्षणभर एकमेकांकडे पहातच राहिली. नंतर सुधाकरराव अपराधी स्वरात सांगू लागले. Vaibhav Lakshmi Vrat Katha

सुधाकररावांना स्वप्न दृष्टांत!

वैभवलक्ष्मीची कथा (vaibhav lakshmi vrat katha)



‘ गेल्या शुक्रवारची गोष्ट. माझ्या स्वप्नात एक जटाधारी बैरागी हातात त्रिशुळ घेऊन आला आणि कठोर शब्दात मला म्हणाला,’ रेस, दारु’ सोडून दे नाहीतर माझ्याशी गाठ आहे. या त्रिशुळानेच तुला ठार करीन.” इतके बोलून त्याने मला बकोटे धरुन गदागदा हलविले. माझी तर पाचावर धारण बसली. मी जाम टरकलो. सर्व व्यसनं सोडण्याचं वचन मी त्याला दिलं आणि मला जाग आली. अंथरुण घामानं गच्च भिजलं होतं. त्या दिवसापासून मी व्यसनांना राम राम ठोकला. आजपर्यंत जे काही झालं ते विसरुन जा.”

व्रताची प्रचीती आली

”वैभवलक्ष्मी” व्रताची इतक्या लवकर आलेली प्रचिती पाहून सुशिलेचा आनंद गगनात मावेनसा झाला. तिच्या श्रद्धा- भक्तीला आणखीनच उधाण आलं. ती लगबगीने बाजारात गेली. आवश्यक त्या सगळ्या वस्तू तिने विकत आणल्या आणि मनोभावे ‘वैभवलक्ष्मी’ ची पूजा केली. नैवेद्य दाखवला. प्रसाद सुधाकररावांना दिला. त्यांनी कसला प्रसाद म्हणून विचारणा केली. तेव्हा सुशिलेने बैराग्याची हकिकत त्यांना सांगितली. त्याने दिलेल्या ‘वैभवलक्ष्मी’ च्या व्रताने आपल्या संसाराची गाडी हळुहळू पुन्हा रुळावर येत असलेली पाहून उभयंताना खूपच आनंद झाला ! Vaibhav Lakshmi Vrat Katha

लक्ष्मीचा वावर सुरु झाला!

सुधाकरराव निष्णात स्थापत्यविशारद होते. त्या महानगरातील एका बांधकाम कंत्राटदाराकडे ते नोकरीला होते. उपनगरातील मोक्याची मोकळी जमीन सुधाकररावांच्या मघ्यस्थीने त्या कंत्राटदाराला वाजवी किंमतीत मिळाली आणि तो प्रसन्न झाला. कारण त्या जमिनीवर त्या महानगरातील अनेक बड्या बांधकाम कंत्राटदारांचा डोळा होता. त्याने सुधाकररावांना सागरतीरावर नव्यानेच बांधलेल्या एका इमारतीतील आलिशान फ्लॅट बक्षीस दिला. शिवाय नव्या व्यापारी संकुलाच्या प्रकल्पात चार आणे भागी दिली. मग काय सुशीला आणि सुधाकर चाळीतल्या अंधाऱ्या खोलीतून ऐसपैस हवेशीर फ्लॅटमध्ये राहायले आले. दरम्यान त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली.
गेल्याच आठवड्यात सुधाकररावांनी नवी कोरी मारुती वन थाऊजंड खरेदी केली आणि ते सपत्निक कोकणात आपल्या सासुरवाडी संगमेश्वरला आले होते आणि मला तिठ्यावर उभा असलेला पाहून ड्रायव्हरला गाडी थांबवायला भाग पाडले होते.
सुशिलेची ‘वैभवलक्ष्मी’ व्रताच्या महिम्याची कहाणी ऐकून मी चक्रावून गेलो. ती मनोमन त्या ‘वैभवलक्ष्मी’ मातेला नमस्कार केला तेव्हा गाडी झाडगावांतल्या अप्पा पटवर्धनाच्या कौलारु घरासमोर उभी केली. महिमा वैभवलक्ष्मीचा

अशाप्रकारे जे कोणी वैभवलक्ष्मी व्रत श्रद्धेने Vaibhav Lakshmi Vrat Katha करेल त्यावर लक्ष्मीची कृपा राहील.त्यामुळे वैभवलक्ष्मीचे हे व्रत करायला अजिबात विसरु नये.

अधिक वाचा

Chan Chan Kavita | छान छान कविता मराठी

KAKAD AARTI | काकड आरती संग्रह मराठी 2023

2 thoughts on “Vaibhav Lakshmi Vrat Katha 2023 | महिमा ‘वैभवलक्ष्मी’ चा”

Leave a Comment