Krishna Katha Marathi आज आपण जाणून घेणार आहोत. भगवान कृष्णाच्या लिला आपण सगळ्यांनीच ऐकल्या असतील. आज आपण कृष्ण जन्मापासून ते श्रीकृष्णाच्या काही रंजक कथा देखील जाणून घेणार आहोत. या आधी आपण रावण जन्माची कथा, सिता हरणाची गोष्ट जाणून घेतली आहे. आता यात आपण लाडक्या श्रीकृष्णाच्या कथा जाणून घेणार आहोत. नव्या पिढीला श्रीकृष्णाच्या गोष्टी या वाचण्याचा कंटाळा असेल. त्यांना हातात पुस्तके नको वाटत असतील. तर अशावेळी तुम्ही हा लेख वाचून त्यांना या गोष्टी सांगू शकता.
श्रीकृष्ण जन्माची कथा | Krishna Katha Marathi
ही कथा आहे द्वापारयुगातील. त्यावेळी भोजवंशी राजा उग्रसेन मथुरामध्ये राज्य करत होता. पण त्या राजाचा मुलगा कंस हा फारच आततायी आणि वाईट होता. त्याने आपल्या वडिलांची सत्ता हिस्कावून घेतली. राजा कंसची एक बहीण होती देवकी, जिचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदाराशी झाला होता. एके दिवशी कंस आपल्या बहिणीला सोडण्यासाठी सासरी जात होता. त्याचवेळी एक आकाशवाणी झाली. ती आकाशवाणी अशी होती की, देवकीच्या पोटी जो आठवा पुत्र जन्माला येईल तो तुझा वध करेल.’ हे ऐकून कंस चांगलाच घाबरुन गेला. आणि त्याने वासुदेवाला मारण्याचा विचार केला. त्याचे ते विचार ऐकून देवकीने त्याची गयावया केली. ती म्हणाली की, माझ्या पोटी येणाऱ्या पुत्रासाठी तू माझ्या पतीला का मारशील? त्यापेक्षा मीच माझा पुत्र तुझ्या स्वाधीन करेन. हे ऐकून काहीसा समाधानी झालेल्या कंसाने त्या दोघांना कारागृहात बंद करण्याचा निर्णय घेतला.(Krishna Katha Marathi)
BramhaMuhurta| काय आहेत ब्रम्हमुहूर्तावर उठण्याचे फायदे
कारागृहात देवकी- वासुदेव यांना 7 पुत्र झाले तिने राजा कंसला ते सगळे पुत्र देऊन टाकले. त्याला ऐकू आलेल्या आकाशवाणीच्या भीतीने त्याने देवकीचे ते सातही पुत्र मारुन टाकले. देवकी पुन्हा एकदा गरोदर राहिली. आता यावेळी तिला पुत्र झाला तर तो तिला कंसाला देणे गरजेचे होते. पण देवकीआ आणि वासुदेव यांना आता त्यांचे हे दु:ख सहन होत नव्हते. त्यांनी बाळाच्या सुरक्षेसाठी अनेक प्रार्थना केल्या. ज्यावेळी त्यांना पुन्हा एकदा पुत्र झाला. त्यावेळी त्यांना आनंद झाला. परंतु त्यासोबत हा मुलगाही कंस मारुन टाकेल याची भिती वाटली. परंतु त्याचवेळी त्यांच्या कारागृहात एक लख्ख प्रकाश चमकला. हातात चक्र, गदा, कमळ धारण केलेला आणि चारभुजा असलेला देव प्रकटला. हे पाहून त्यांना फार आनंद झाला. त्या दोघांनीही त्याचे पाय धरले. त्यांचे दु:ख जाणून त्या दोघांना सांगितले की, या बाळाला घेऊन राजा नंद यांच्या घरी जा. असे सांगितले. आणि त्या देवाने लहान बाळाचे रुप धारण केले.
राजा नंद यांची पत्नी सुद्धा त्याचवेळी गर्भवती होती. तिच्या पोटी मुलगी जन्माला आली. ती कन्या एक मायावी रुप होते. त्या मुलीच्या जागी या बाळाला ठेवण्याचे वासुदेवाला सांगण्यात आले. परंतु बाहेर विजा चमकत होत्या, पाऊस धो धो पडत होता. अशावेळी या लहान बाळाला घेऊन कसे काय जायचे? असा प्रश्न पडला. त्यावेळी त्या प्रकटलेल्या देवाने सगळे मार्ग मोकळे होतील असे सांगितले होते. आपल्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी वासुदेव भर पावसात एका टोपलीत बाळाला घेऊन निघाले. त्यावेळी कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले. कारागृहाचे पहारेकरी झोपून गेले. उसळलेल्या यमुना नदीने देखील मार्ग उपलब्ध करुन दिला. त्यामुळे राजा नंदकडे जाणे सोपे झाले. राजा नंद आणि राणी झोपी गेली होती. त्यांच्या पाळण्यात कन्या होती. त्या कन्येला घेऊन आणि आपल्या पुत्राला पाळण्यात ठेवून वासुदेव निघाले.Krishna Katha Marathi
वाचा रामायणातील या महत्वपूर्ण कथा भाग १
ज्यावेळी ते कारागृहात पोहोचले. त्यावेळी कंसाला देवकी बाळंतीण झाल्याचे कळले. त्याचक्षणी त्याने झालेल्या बाळाला घेऊन येण्याची आज्ञा दिली. कन्येला घेऊन पहारेकरी कंसकडे गेले. आपला कर्दनकाळ असलेली ही कन्या आताच मारुन टाकण्यासाठी त्याने तिला जमिनीवर आपटले. त्याच क्षणी ती मायावी कन्या हवेत उडाली., म्हणाली, अरे मुर्खा तुला मारणाऱ्याने आधीच जन्म घेतला आहे आणि तो राजा नंदच्या घरी अगदी सुखरुप आहे. मला मारुन काहीही होणार नाही. तुझ्या पापाची शिक्षा तुला लवकरच मिळणार आहे. असा झाला देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म. आपल्या पोटी जन्माला आलेला कोण आहे हे काही या दोघांना माहीत नव्हते. पण लवकरच त्याच्या लिला सगळ्यांना कळल्या.(Krishna Katha Marathi)
कालिया मर्दनची गोष्ट
कृष्ण लहानाचा मोठा हा गोकुळात झाला. यमुनेच्या काठी आपल्या मित्रांसोबत खेळायला त्याला फारच आवडायचे. त्याचे सवंगडी या ठिकाणी विटी दांडूसारखे अनेक खेळ खेळत असत. पण एके दिवशी यमुनेच्या काठी जाणेही गावकऱ्यांना नकोसे झाले. कारण या यमुना नदीत कालिया नावाचा एक भला मोठा साप आला होता. तो या नदीत आल्यापासून त्याने गावातील लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्याने यमुनाचे पाणी देखील दुषित करुन टाकले होते. त्याला अनेकांनी पाहिले होते. पाच फणे असलेला विशाल असा हा नाग दिवसेंदिवस अधिकच त्रास देऊ लागला होता.(Krishna Katha Marathi)
मुळात कालियाचे हे काही ठिकाण नव्हते. तो दूरवर एका बेटावर राहात होता. पण विष्णूचे वाहन असलेला गरुड त्याला तिथे त्रास देत होता. या नागाचा संहार करण्याचे काम त्याच्याकडे दिले होते. पण कालियाला कळले होेते की, काहीही झाले तरी वृदांवनात मी एकदा गेलो की मला कोणीही मारु शकणार नाही. गरुडाला एका शापामुळे वृदांवनात जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्या नागाने यमुना नदीत जाऊन आपले स्थान निर्माण केले आणि लोकांना Krishna Katha Marathi घाबरवण्यास सुरुवात केली. हे यशोदेला कळल्यानंतर तिने कृष्णाला यमुनेजवळ जाण्यास मज्जाव केला. पण या कालियाचा संहार भगवान कृष्णाकडूनच होणार होता.
म्हणूनच एके दिवशी आपल्या सवंगड्यांना घेऊन तो विटी दांडू खेळत होता. खेळता खेळता त्याने जोरात विटी यमुना नदीत मारली. विटी काढण्याचा बहाणा करुन त्याने यमुना नदीत उडी मारली. त्याने उडी मारल्या मारल्या सगळेच भयभीत झाले. आता या कृष्णाचे काय होईल? हा कालिया त्याला खाऊन टाकेल अशी भीती सगळ्यांना वाटू लागली. सगळीकडे आरडाओरड सुरु झाली. ही बातमी राजा नंद आणि यशोदा माईपुढे गेली. तिच्या अंगाची सारी ताकदच निघून गेली.ती भयभीत होऊन धावत पळत यमुनेच्या काठी आले.
पाण्यात उडी मारल्यानंतर कालियाला आश्चर्य वाटले. इथे सगळे आपल्याला घाबरत असताना हा धीट असा मुलगा आहे तरी कोण? ज्याला आपली भीती नाही. कालियाने आपल्या शेपटीने कृष्णाला आवळायला सुरुवात केली. तर कृष्णाने आपल्या शक्तीने आपला आकार वाढवण्यास सुरुवात केली. आपला आकार त्याने अशा काही वाढवला की, त्यामुळे कालियाची पकड सैल होऊ लागली. त्याच्या शरीरावर ताण पडू लागला. त्याचाच फायदा घेऊन कृष्णाने त्याची शेपटी पकडून त्याला गरागरा फिरवले.त्यामुळे त्याचे पाच फणे पाण्यावर आले. त्याला पाहून लोकं अधिक घाबरुन गेली. हा कसला चमत्कार!
एवढ्यात बाल कृष्ण आपल्या मूळ रुपात आला आणि तो कालियाच्या डोक्यावर चढला. कालियाच्या डोक्यावर चढून त्याने नाचण्यास सुरुवात केली. ही लिला पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. हा सर्वसामान्य बालक नाही याची ओळख सगळ्यांना झाली. कालियाच्या डोक्यावर नाच करताना तो अर्ध मेला होऊन गेला. त्याला तसे पाहून त्याच्या कुटुंबाने त्याला जीवनदान देण्याची विनंती केली. त्यानंतर कृष्णाने त्याला जीवनदान दिले आणि यमुना नदी सोडून जाण्यास सांगितले. त्याने यमुना नदी सोडल्यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला.
(नागाला आपल्या हिंदू धर्मात अनन्यसाधारण असे महत्व आहे. अनेक प्रसंगी नागांनीच देवांना देखील साथ दिली आहे. त्यामुळे त्यांची पूजा केली जाते.)
अरिष्ठासूराचा वध
एके दिवशी वृंदावनात एख भला मोळा वळू आला. तो गावतल्या लोकांवर हल्ला करु लागला. त्या वळूमुळे सगळे हैराण झाले होते. तो वळू सैरावैरा गावात पळत होता. तो कोणाचा आहे हे देखील कोणालाही माहीत नव्हते. आता या वळूपासून आपली सुटका करुन घेण्यासाठी सगळ्यांनी कृष्णाकडे धाव घेतली. आता कृष्णाच आपल्याला यातून वाचवू शकतो.Krishna Katha Marathi
कृष्णाला सगळी आपबिती कळली. त्याने लगेचच गावकऱ्यांची सुटका करण्यासाठी त्या वळूकडे धाव घेतली. ज्यावेळी आपल्या दिव्य शक्तीने कृष्णाने त्याच्याकडे पाहिले त्यावेळी त्याला कळले की, या वळूमध्ये अरिष्ठासूर नावाचा राक्षस संचारला आहे. आता या वळूची सुटका या राक्षसापासून करण्यासाठी त्याने एक युक्ती लावली. कृष्णाने त्या वळूच्या शिंगावर टोचले त्या क्षणी तो राक्षस वळूच्या अंगातून बाहेर पडला. वळू कृष्णापुढे नतमस्तक झाला. त्याने कृष्णाला सांगितले की, मी बृहस्पति यांचा शिष्य आहे. त्याच्या आज्ञेचे पालन न केल्यामुळेच त्यांनी मला वळू बनण्याचा श्राप दिला आहे.
आपण या अरिष्ठासूरापासून माझी सुटका केली त्यासाठी मी आपला आभारी आहे. (Krishna Katha Marathi )
पुतना राक्षसणीचा संहार
श्रीकृष्णाच्या जन्मानंतर त्याला मारण्यासाठी संधी कंसाला अजिबात घालवायची नव्हती. कारण त्याच्या कानात ती भविष्यवाणी चांगलीच आठवत होती. देवकीला झालेला आठवा पुत्र जिवंत आहे हे कळल्याबरोबर त्याचा वध करण्यासाठी त्याने पुतना राक्षशिणीला पाचारण केले. पुतना आल्यानंतर त्याने सांगितले की, आतापर्यंत माझ्या सांगण्यावरुन तू अनेक लहान बाळांचा वध केला आहे. परंतु देवकीचा पुत्र हा कुठे आहे ते आता मला कळले आहे. तू आताच्या आता मथुरेत जा आणि राजा नंदाच्या घरी जन्मलेल्या त्या पुत्राचा वध कर.
त्या प्रमाणे पुतना सुंदर स्त्रीचे रुप घेऊन राजा नंदाच्या घरी पोहोचली. तिथे पाळण्यात खेळणाऱ्या त्या पुत्राला पाहून तिने त्याच्याकडे धाव घेतली. पाळण्यात ते बाळ एकटेच खेळत बसले होते. पुतनाला पाहून बाळाने स्मित केले. त्याला उचलून दूध पाजण्याच्या निमित्ताने पुतनाने तिला स्तनाग्रांकडे नेले. तिच्या स्तनाग्रांना विष लावण्यात आले होते. पुतनाकडून स्तनपान होत असताना तिच्या विषाचा विपरित परिणाम बाळावर झाला. उलट पुतनाच्याच शरीरात ते विष संपूर्णपणे भिनले व तिचा मृत्यू झाला.
त्यामुळे कंसालाही चांगलाच धक्का बसला. नंद राजाच्या घरी असलेला हा पुत्र साधासुधा नाही हे त्याला चांगलेच कळून चुकले.
कृष्णाच्या आणखी छान छान गोष्टी वाचण्यासाठी थोडी वाट नक्की पाहा