Krushnachya Gavalani | विष्णूचा आठवा अवतार आणि वैष्णव पंथातील सर्वोच्च देवता म्हणून भगवान श्रीकृष्णाची ओळख आहे. सावळ्या कृष्णाच्या कितीतरी बालक्रिडा आपण अनेकांनी ऐकल्या आहेत. त्याच्या मस्तीसोबतच त्याने केलेल्या पराक्रमाच्याही गोष्टी आपणास माहीत आहे. संरक्षण, करुणा, माया आणि प्रेमाची देवता म्हणून कृष्णाची ओळख आहे. हिंदू पंचागांनुसार श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कृष्णाचा जन्म झाला. तोच दिवस म्हणजे ‘गोकुळाष्टमी’ म्हणूनच हा दिवस भगवान श्रीकृष्णाचा जन्म दिवस म्हणून ओळखला जातो. यादिवशी रात्री 12 वाजता भगवान कृष्णाची बालमूर्ती ही पाळण्यात बसवून झुलवली जाते. अनेक ठिकाणी कृष्ण जन्म हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाभारत, भागवत पुराण आणि भगवदगीतेतील कृष्ण हे मध्यवर्ती असे पात्र आहे. ज्याच्याभोवती अनेक गोष्टी फिरताना दिसतात. भगवान कृष्णांनी दिलेले उपदेश आजच्या या काळातही उपयोगी पडतात. कृष्ण जन्म हा द्वापारयुगातला असून त्यानंतरचा काळ हा कलियुग म्हणजे आताचा काळ म्हणून ओळखला जातो. आज आपण भगवान कृष्णाच्या प्रसिद्ध अशा काही गवळणी जाणून घेणार आहोत. जेणेकरुन तुम्हाला त्या गाता येतील. या शिवाय तुम्ही काकड आरती मराठी देखील वाचू शकता.
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी ।
कान्हा वाजवी बासरी ।।धृ ।।
बारा सोळा गौळ्याच्या नारी ।
त्या नटूनी चालल्या मथूरे बाजारी ।
त्याने मारला खडा न माझा फोडला घडा ।
त्याने फोडिल्या घागरी ।।1।।कान्हा वाजवी बासरी
यशोदा बोले बाळ श्रीहरी ।
छेडू नको रे गोकूळ नगरी ।
राधिकेच्या घरी कान्हा पलंगावरी ।
राधा झाली ग बावरी ।
कान्हा वाजवी बासरी।।2।।कान्हा वाजवी बासरी
एका जनार्दनीं गवळण राधा
ती विनवी तुजला अरे मुकुंदा
गवळ्याची नार करी सोळा शृंगार
झाली चरणावरी ।
कान्हा वाजवी बासरी ।।3।।
केवळ केसांसाठीच नाही तर या कारणासाठीही फायदेशीर आहे नारळ
लाजली कृष्णाला लाजली
लाजली कृष्णाला राधा लाजली
त्याने केली कला अशी दावली लिला
त्याच्या मुरलीची गोडी लावली
लाजली कृष्णाला राधा लाजली
आली राधा आली
चोर पावलांनं लपून आली
हळूहळु हळुहळू
वृंदावनी त्या कडम्भा खाली
नाही कळल्य कोणा त्याच्या खाणाखुणा
राधा कृष्णाची जोडी जमली
लाजली कृष्णाला राधा लाजली
झाला अहो झाला..
साऱ्या गोकुळात बोलबाला
अरे अरे अरे अरे
कृष्णा न केला गोपाळ काला
काल आईन दुपारी यमुनेच्या तीरी
श्री हरी ची बासरी वाजली
लाजली कृष्णाला राधा लाजली
केलि अहो केलि
कशी उत्तम ही कमाल केली
हाय हाय हाय हाय
राधा गवळन बोलून गेली
भाव भक्ति करी राधेच्या उरी
अशी प्रीत ही जगात गाजली
लाजली कृष्णाला राधा लाजली
येते मी माघारी कान्हा जरा थांब ना
येते मी माघारी कान्हा जरा थांब ना ग
कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग
सोनियाचा पाळणा ग रेशमाची दोरी
हलविता हलविता झोका जाईन लांब ना ग
कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग
सोनियाची विट्टी ग चांदियाचा डांडू
टोलविता टोलविता टोला जाइन लांब ना
कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग
एका जनार्धनी दही दूध ताक लोणी
घुसडीता घुसडीता अंगा येईन घाम ना ग
कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग
येते मी माघारी कान्हा जरा थांब ना ग
कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग
कृष्णा तुला मी ताकीद करते
कृष्णा तुला मी ताकीद करते,
कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
गवळ्याघरी बोभाट उठला ।
माठ दह्याचे फोडू नको रे ॥1॥
कृष्णा तुला मी ताकीद करते,
कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
रागीट तुझा पिता नंद
मार तयाचा खाऊ नको रे ॥२॥
कृष्णा तुला मी ताकीद करते,
कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
आली गौळण कपटी राधा,
तिच्या घरात तू जाऊ नको रे ॥3॥
कृष्णा तुला मी ताकीद करते,
कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
पाळण्यात घालूनी झोके देते,
आता मुला, तू रडू नको रे ॥4॥
कृष्णा तुला मी ताकीद करते,
कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
वरद्या वांकड्या पेंद्या सुदामा,
ह्यांच्या डावामध्ये खेळू नको रे ॥5॥
कृष्णा तुला मी ताकीद करते,
कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
नामा म्हणे पतित पावना,
ह्यांच्या नामा तू विसरू नको रे ॥6॥
कृष्णा तुला मी ताकीद करते,
कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो कान्हा
कशी जाऊ मी वृंदावना
मूरली वाजवितो कान्हा
पैलतिरी हरी, वाजवी मुरली
नदी भरली भरली जमुना
कासे पितांबर कस्तुरी टिळक
कूंडल शोभे काना
कशी जाऊ मी वृंदावना
काय करू बाई, कूणाला सांगू
हरीनामाची सांगड आणा
नंदाच्या हरीने कौतुक केले
जाणे अंतरीच्या खुणा….
कशी जाऊ मी वृंदावना
एका जनार्दनी मनी म्हणा
देव महात्मे ना कळे कोणा
कशी जाऊ मी वृंदावना
मुरली वाजवितो कान्हा
राधे चाल माझ्या गावाला जाऊ गवळण Krushnachya Gavalani
राधे चाल माझ्या गावाला जाऊ,
सारे गोकुळ फिरून पाहू… ।। धृ ।।
राधे चाल माझ्या गावाला जाऊ,
गोकुळ माझ गाव ।
साऱ्या गावात माझ नाव… ।। १ ।।
राधे चाल माझ्या गावाला जाऊ,
वासुदेव माझा पिता,
आहे देवकी माझी माता… ।। २ ।।
राधे चाल माझ्या गावाला जाऊ,
एका जनार्दनी गवळण राधा,
लागली हरीच्या नादा… ।। ३ ।।
राधे चाल माझ्या गावाला जाऊ,
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी
बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || धृ ||
गोकुळच्या त्या गाई म्हशीचं
खाणं सगळं राण माळाचं
उगीच कशाला चाखून बघायचं
पैशा विणा घेणं
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || १ ||
यमुनेचा तो अवघड घाट
चढता चढता दुःखतिया पाट
नेहमीच तयाची वारी कट
थांबू नका गवळणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || २ ||
महानंदाची वेडी माया
देवासाठी तिची सुखली काया
एका जनार्दनी पडू त्याच्या पाया
देवा लीन होवूनी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || ३ ||
बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी
कन्हैया लागला तुझा रे छंद मला
कन्हैया लागला
तुझा रे छंद मला
सांग ना बोल ना..
यमुनेच्या तीरी तू येशील का
चोरून भेट मला देशील का
सांग ना बोल ना..
कन्हैया लागला
तुझा रे छंद मला
मथुरेच्या बाजारी येशील का
चोरून दही दूध खाशील का
सांग ना बोल ना..
कन्हैया लागला
तुझा रे छंद मला
एका जनार्धनी गवळण राधा
राधा लागली कृष्णा चा नादा
सांग ना बोल ना..
कन्हैया लागला
तुझा रे छंद मला
कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे माझी घागर गेली फुटून
कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून हो हो ..
घागर गेली घागर गेली
घागर गेली फुटून घागर गेली फुटून
कान्हा माझ्याकडे पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून
पाचेची न्हानी गुलाबाचं पानी
न्हानित नाहते बसून हो हो ..
कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून…
कान्हा माझ्याकडे पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून…
भिंती आड चढूनी आला माझ्या जवळी
वाकुनी पाहतो दडून हो हो ..
कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून…
कान्हा माझ्याकडे पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून…
एका जनार्धानी प्रीतिची राधा
हर्षाने चालली जपून हो हो ..
कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून…
कान्हा माझ्याकडे पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून…
घागर गेली घागर गेली
घागर गेली फुटून घागर गेली फुटून
कान्हा माझ्याकडे पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून
सांग राधे कुणा संग हसली गं गवळण
सांग सांग सांग राधे सांग ना ग
सांग राधे कुणा संग हसली गं
तुझ्या वेणिची गाठ कशी सुटली गं
घागर घेउन पाणियाशी जाता
पाणियाशी जाता बाई गं यमुनेशी जाता
पाणियाशी गं यमुनेशी गं
अगं हसली….
सांग राधे कुणा संग हसली गं
तुझ्या वेणिची गाठ कशी सुटली गं
दही दूध घेउन बाजाराला जाता
बाजाराला जाता बाई गं मथुरेला जाता
बाजाराला गं मथुरेला गं
अगं हसली…
सांग राधे कुणा संग हसली गं
तुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग
एका जनार्धनी राधा गौळण
गौळण गेली कृष्णा ला शरण
नव्या युगाची नवरी नटली गं
तुझ्या वेणिची गाठ कशी सुटली गं
krshnachya gavalani तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील अशी अपेक्षा आहे. ही लिंक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा.