Navratra Katha, Navratri vrat 2023 | नवरात्र कथा,महिषासुरमर्दिनी स्त्रोत,नवरात्र व्रत

Navratra Katha Navratri vrat हिंदू धर्मातील प्रत्येक सणामागे काही ना काही कारण असते. आपल्या मराठी महिन्यात येणाऱ्या सणांचे काही ना काही महत्व हे पुराणाशी आणि विज्ञानाशी जोडलेले आहे. येत्या 5 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या काळात नवरात्र येणार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का नवरात्र का साजरी केेली जाते? या मागे ही एक पौराणिक कथा आहे. जी प्रत्येकाला माहीत असायला हवी. याशिवाय बाप्पाच्या गोष्टी वाचायला अजिबात विसरु नका. अनेक ठिकाणी या कथेचा उल्लेख आहे. पण आज ही कथा तुम्हाला वाचता येईल आणि इतरांनाही वाचून दाखवता येईल.

LORD SHRI RAM NAMES BOYS 25 + | मर्यादापुरुषोत्तम राम वरुन मुलांची नावे
50+ देवीवरुन मुलींची नावे | BABY GIRL HINDU GODDESS NAME

महिषासुर जन्म आणि वध (Navratra Katha)

Navratra Katha

पौराणिक कथेनुसार, रंभ नावाचा एक असुर होता. त्या असुराचे पाण्यात राहणाऱ्या एक म्हशीसोबत प्रेम झाले. त्या असुर आणि म्हशीला एक बाळ झाले त्याचे नाव होते महिषासुर. महिषासुर हा असुर आणि म्हैस या दोघांचे रुप घेऊ शकत होता. महिषासुराने आपल्या उपासनेने साक्षात ब्रम्हदेवाला प्रसन्न केले.त्याने ब्रम्हदेवाकडून वर मागितला की, ‘मला ना देव ना दानव कोणीही मारु शकणार नाही’ ब्रम्हदेवाने ‘तथास्तु’ म्हटले.
त्यानंतर वर प्राप्त झालेल्या दैत्यराज महिषासुराने सगळीकडे उत्पात करायला सुरुवात केली. तो कोणत्याही देवाला आवरेना. साक्षात ब्रम्हदेवांनीच त्याला वर दिल्यामुळे त्रिमूर्तींपैकी कोणालाही त्याचा वध करणे शक्य नव्हते. आता काय करावे असा प्रश्न पडला असताना माता दूर्गेची शक्ती जाणून घेत तिला या कार्यासाठी सृजन करावे असे ठरवले. (Navratra Katha)
त्यानुसार त्रिदेवांनी आपली शक्ती एकत्रित करुन माता पार्वतीला दिले. तिने दुर्गेचे रुप धारण केले. तिला तिन्ही देवांनी शस्त्रे दिली. त्यानंतर माता दुर्गा दैत्यराज महिषासुराचा वध करण्यासाठी निघाली. महिषासुर आणि दुर्गेमध्ये तब्बल 9 दिवस हे युद्ध चालले. दहाव्या दिवशी दुर्गेने त्या नराधम महिषासुराचा वध केला. त्याचे प्रतिक म्हणून 9 दिवस नवरात्रीचे दिवस म्हणून साजरे केले जातात. ‘विजयादशमी’ ही महिषासुराचा वधाचा दिवस म्हणून आनंदाचा दिवस साजरा केला जातो. (Navratra Katha )

विजयादशमीचा आनंद त्रिगुणित

विजयादशमीचा दिवस हा मोठ्या उत्साहात आपण साजरा करतो. नवरात्र कथा मधून हे महत्व आपल्याला लक्षात आले असेलच. पण विजयादशमीचे अनन्यसाधारण महत्व आहे. कारण या दिवशी 3 महत्वाच्या घटना या पुराणात घडलेल्या आहेत. महिषासुराचा वध हे आपण कथेच्या माध्यमातून तर वाचले आहेच. याशिवाय रामाने रावणाचा वध करुन ते अयोध्येला परतले होते. त्यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. या संदर्भात असेही सांगितले जाते की, रावणाचा वध करण्यापूर्वी त्यांनी माता चंडीची पूजा करुन अमरत्व प्राप्त केले होते. त्यामुळेच रावणावर विजय मिळवणे भगवान श्रीरामांना शक्य झाले होते. तिसरी शुभ घटना अशी की पांडवांचा अज्ञातवास संपवून त्यांनी शमीच्या झाडावरुन आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणाऱ्या कौरवांवर विजय मिळवला तोही याच दिवशी. म्हणून दसऱ्याच्या दिवशी शस्त्राची पूजा आणि शमीची पाने म्हणजेच आपट्याची पाने वाटली जातात.

महिषासुर मर्दिनी स्त्रोत | नवरात्र कथा

Navratri Vrat | Navratra Katha

नवरात्रीच्या या 9 दिवसात तुमच्याकडून प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही महिषासुर मर्दिनी स्त्रोत नियमित वाचायला हवे. या स्त्रोतामध्ये एक विशिष्ट उर्जा आहे. जी तुम्हाला नक्कीच सकारात्मकता देईल.Navratra Katha वाचून झाली असेल तर हे स्त्रोतही नक्की वाचा शेअर करा.

अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते
गिरिवरविन्ध्यशिरोऽधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते |
भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते 

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ||1 ||

सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते
त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते
दनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते || 2 ||

अयि जगदम्ब मदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि हासरते
शिखरि शिरोमणि तुङ्गहिमलय शृङ्गनिजालय मध्यगते |
मधुमधुरे मधुकैटभगञ्जिनि कैटभभञ्जिनि रासरते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥3 ||

अयि शतखण्ड विखण्डितरुण्ड वितुण्डितशुण्द गजाधिपते
रिपुगजगण्ड विदारणचण्ड पराक्रमशुण्ड मृगाधिपते |
निजभुजदण्ड निपातितखण्ड विपातितमुण्ड भटाधिपते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते || 4 ||

अयि रणदुर्मद शत्रुवधोदित दुर्धरनिर्जर शक्तिभृते
चतुरविचार धुरीणमहाशिव दूतकृत प्रमथाधिपते |
दुरितदुरीह दुराशयदुर्मति दानवदुत कृतान्तमते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते || 5 ||

अयि शरणागत वैरिवधुवर वीरवराभय दायकरे
त्रिभुवनमस्तक शुलविरोधि शिरोऽधिकृतामल शुलकरे |
दुमिदुमितामर धुन्दुभिनादमहोमुखरीकृत दिङ्मकरे

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते || 6 ||

अयि निजहुङ्कृति मात्रनिराकृत धूम्रविलोचन धूम्रशते
समरविशोषित शोणितबीज समुद्भवशोणित बीजलते |
शिवशिवशुम्भ निशुम्भमहाहव तर्पितभूत पिशाचरते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते || 7 || 

धनुरनुषङ्ग रणक्षणसङ्ग परिस्फुरदङ्ग नटत्कटके
कनकपिशङ्ग पृषत्कनिषङ्ग रसद्भटशृङ्ग हताबटुके |
कृतचतुरङ्ग बलक्षितिरङ्ग घटद्बहुरङ्ग रटद्बटुके

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते || 8 ||

सुरललना ततथेयि तथेयि कृताभिनयोदर नृत्यरते
कृत कुकुथः कुकुथो गडदादिकताल कुतूहल गानरते |
धुधुकुट धुक्कुट धिंधिमित ध्वनि धीर मृदंग निनादरते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते || 9 ||

जय जय जप्य जयेजयशब्द परस्तुति तत्परविश्वनुते
झणझणझिञ्झिमि झिङ्कृत नूपुरशिञ्जितमोहित भूतपते |
नटित नटार्ध नटी नट नायक नाटितनाट्य सुगानरते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते || 10 ||

अयि सुमनःसुमनःसुमनः सुमनःसुमनोहरकान्तियुते
श्रितरजनी रजनीरजनी रजनीरजनी करवक्त्रवृते |
सुनयनविभ्रमर भ्रमरभ्रमर भ्रमरभ्रमराधिपते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते || 11 ||

सहितमहाहव मल्लमतल्लिक मल्लितरल्लक मल्लरते
विरचितवल्लिक पल्लिकमल्लिक झिल्लिकभिल्लिक वर्गवृते |
शितकृतफुल्ल समुल्लसितारुण तल्लजपल्लव सल्ललिते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते || 12 ||

अविरलगण्ड गलन्मदमेदुर मत्तमतङ्ग जराजपते
त्रिभुवनभुषण भूतकलानिधि रूपपयोनिधि राजसुते |
अयि सुदतीजन लालसमानस मोहन मन्मथराजसुते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते || 13 ||

कमलदलामल कोमलकान्ति कलाकलितामल भाललते
सकलविलास कलानिलयक्रम केलिचलत्कल हंसकुले |
अलिकुलसङ्कुल कुवलयमण्डल मौलिमिलद्बकुलालिकुले

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते || 14 ||

करमुरलीरव वीजितकूजित लज्जितकोकिल मञ्जुमते
मिलितपुलिन्द मनोहरगुञ्जित रञ्जितशैल निकुञ्जगते |
निजगणभूत महाशबरीगण सद्गुणसम्भृत केलितले

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते || 15 || 

कटितटपीत दुकूलविचित्र मयुखतिरस्कृत चन्द्ररुचे
प्रणतसुरासुर मौलिमणिस्फुर दंशुलसन्नख चन्द्ररुचे
जितकनकाचल मौलिमदोर्जित निर्भरकुञ्जर कुम्भकुचे

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते || 16 || 

विजितसहस्रकरैक सहस्रकरैक सहस्रकरैकनुते
कृतसुरतारक सङ्गरतारक सङ्गरतारक सूनुसुते |
सुरथसमाधि समानसमाधि समाधिसमाधि सुजातरते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते || 17 ||

पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योऽनुदिनं सुशिवे
अयि कमले कमलानिलये कमलानिलयः स कथं न भवेत् |
तव पदमेव परम्पदमित्यनुशीलयतो मम किं न शिवे

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते || 18 ||

कनकलसत्कलसिन्धुजलैरनुषिञ्चति तेगुणरङ्गभुवम्
भजति स किं न शचीकुचकुम्भतटीपरिरम्भसुखानुभवम् ।
तव चरणं शरणं करवाणि नतामरवाणि निवासि शिवम्

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते || 19 ||

तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं सकलं ननु कूलयते
किमु पुरुहूतपुरीन्दु मुखी सुमुखीभिरसौ विमुखीक्रियते ।
मम तु मतं शिवनामधने भवती कृपया किमुत क्रियते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते || 20 ||

अयि मयि दीन दयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे
अयि जगतो जननी कृपयासि यथासि तथानुमितासिरते ||
यदुचितमत्र भवत्युररीकुरुतादुरुतापमपाकुरुते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते || 21 ||

नवरात्र कथा, महिषासुरमर्दिनी स्त्रोत हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा.

Navratri Vrat | नवरात्री व्रत

नवरात्रीचे व्रत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. 9 दिवस देवीचा जागर करुन तिची आळवणी केली जाते. 9 दिवसात तिच्या 9 रुपांची पूजा केली जाते. आपआपल्या पद्धतीने अनेक जण हे व्रत करतात. तुम्हालाही हे व्रत करायचे असेल तर खालीलपैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही ते करु शकता.

  1. नवरात्रीचे व्रत 9 दिवस आचरले तर ते अधिक शुभ मानले जाते. पण जर असे शक्य नसेल तर तुम्ही पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आणि विजयादशमीच्या दिवशी हे व्रत केले तरी देखील चालू शकते. या दोन दिवशी तुम्ही उपवास केला तरी चालतो.
  2. नवरात्रीच्या 9 दिवसात जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नुसत्या फलाहाराचे व्रत देखील करु शकता. हे देखील अतिशय शुभ असे व्रत मानले जाते. याला केवळ शास्त्रीय नाही तर वैज्ञानिक देखील कारण आहे. एकल असा आहार केला तर त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते.
  3. हिंदू धर्मात ब्रम्ह मुर्हूताला खूप जास्त असे महत्व आहे. ब्रम्हमुर्हूताचे वातावरण हे अधिक शुद्ध असते. त्यावेळी उठून तुम्ही कामे पूर्ण करा. देवीची मनोभावे आराधना करा. सूर्य हा सगळ्यात महत्वाचा असा घटक आहे. त्याला अर्घ्य द्यायला विसरु नका. त्यानंतर तुम्ही थोडी झोप घेतली तरी चालू शकते. पण या 9 दिवसात तुम्ही हा एक बदल तुमच्यात नक्की करा.
  4. नवरात्रीच्या दिवसात आहार हा देखील तितकाच सात्विक असायला हवा. या काळात तामसिक,तळलेले पदार्थ टाळायला हवे. कारण असे पदार्थ आरोग्यासाठीही त्रासदायक ठरु शकतात.
  5. जर तुम्हाला व्रत आचरणे कठीण असेल तर या 9 दिवसात शुद्ध मनाने तुम्ही देवीची आराधना केली तरी देखील चालू शकते.

यंदा नवरात्रीचे महत्व जाणून देवीची पूजा करा तुम्हाला नक्कीच सकारात्मक वाटेल यात काहीही शंका नाही.

(वर दिलेली या वेगवेगळ्या पुस्तकातून वाचून मगच लिहिण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्तही अनेक कथा सांगितल्या जातात. पण महिषासुर वधाची कथा ही प्रमाण मानली जाते.)

Leave a Comment