हिमाचल प्रदेशाला देवभूमी नावानेही ओळखले जाते आणि त्याचे कारणही तसंच आहे. या राज्यात अनेक देवी-देवतांना समर्पित मंदिरे आहेत आणि जी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. अनेक राज्यातून इथे मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी लोक येतात. हिमाचल प्रदेशातील एक असे मंदीर आहे जिथे अनेक वर्षांपर्यंत ऋषी मार्कंडेय यांनी तपस्या केली होती आणि या मंदिराला छतही नाहीये. हे मंदिर शिकारी देवी मंदिर या नावाने ओळखण्यात येते. शिकारी देवी मंदिराबाबात आपण आज अधिक माहिती घेऊया (Photo Credit – Instagram)
कुठे आहे शिकारी देवी मंदिर?
हिमाचल प्रदेशाच्या मंडी जिल्ह्यात शिकारी देवीचे मंदिर आहे. हे मंदीर जंजैहलीपासून साधारण 18 किलोमीटर दूर असून 2259 मीटर उंचीवर आहे. शिकारी देवीची मंडी ही सर्वात उंच मानली जाते आणि त्यामुळेच या मंडीला मुकुटदेखील म्हटलं जातं. या मंदिराचा रस्ता हा जंगलातून जातो. थंडीच्या दिवसात या मंदिराच्या आजूबाजूला संपूर्ण बर्फ पहायला मिळतो.
काय आहे मंदिराचे वैशिष्ट्य
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिलारा अजिबात छत नाहीये आणि यातील देवीची प्रतिमा ही निळ्या आकाशाखाली विराजमान आहे. हे मंदिर भक्तांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. याशिवाय या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे देवी शिकारीची प्रतिमा ही अजिबात कोणत्याही चार भिंतीमध्ये नसून उघड्यावर आहे.
Ramayana Story: अयोध्या नाही तर ‘या’ राज्याची राजकुमारी होती रामाची मोठी बहीण, वाचा पौराणिक कथा
पांडवांनी केली होती तपस्या
या मंदिराचा इतिहास हा महाभारताशी जोडला जातो असं गावकरी सांगतात. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार, अज्ञातवासाच्या वेळी या मंदिरात ऋषी मार्कंडेयांनी अनेक वर्ष तपस्या आणि जप केला होता. या मंदिरात देवी शिकारीची प्रतिमा स्थापित आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या मंदिरात शिकारी देवीची पूजा अर्चा केल्याने आणि दर्शन घेतल्याने इच्छा पूर्ण होतात आणि शुभफळ प्राप्त होते.
Akshaya Tritiya: अक्षय तृतीयेच्या दिवशी करा ‘या’ गोष्टींचे दान, कष्ट होतील दूर
मंदिरात कसे पोहचावे?
तुम्ही शिकारी देवीच्या मंदिरात जायचा विचार करत असाल तर मंदिरात जाण्यासाठी विमानमार्ग, ट्रेन आणि रस्ता हे तिन्ही मार्ग वापरता येतील
- या मंदिरापासून साधारण 118 किलोमीटर दूरपर्यंत कुल्लू विमानतळ आहे. तुम्ही इथे उतरून कॅब करून मंदिरात पोहचू शकता
- जोगिंदर नगरमध्ये नॅरो गेजलाईन असून हे मंदिरापासून 152 किमी दूर आहे. ट्रेनमधून इथे उतरून तुम्ही कॅब करून इथे जाऊ शकता
- याशिवाय चंदीगढ – मनाली राष्ट्रीय महामार्गदेखील जवळ आहे
टीप – या लेखात नमूद केलेले उपाय/फायदे/सल्ला आणि विधाने केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. Storyus.in या लेखातील वैशिष्ट्यांमध्ये लिहिलेल्या गोष्टींना समर्थन देत नाहीत. या लेखात असलेली माहिती विविध स्रोत/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/श्रद्धा/धार्मिक ग्रंथ/दंतकथा यातून गोळा केली आहे. वाचकांना विनंती आहे की त्यांनी लेखाला अंतिम सत्य किंवा दावा मानू नये आणि त्यांचा विवेक वापरावा. Storyus.in हे अंधश्रद्धेच्या विरोधात आहेत.