Marathi Aarti Pustak | मराठी आरती पुस्तिका 2023 | मराठी आरती संग्रह

Marathi Aarti Pustak | सणासुदीचे दिवस सुरु झाले की, आरती पुस्तिका शोधण्याची सगळ्यांचीच लगबग सुरु होते. आता पूर्वीसारख्या आरती पाठ असणे म्हणजे फारच आश्चर्याची गोष्ट झाली. कारण हल्ली फारच कमी जणांना आरती पाठ असतात. पण आपल्या हिंदू धर्मात गणेशोत्सव, नवरात्र किंवा कोणतीही पूजा असली की, देवाची आळवणी करण्यासाठी आरती करणे हे आलेच नाही का?अशावेळी तुम्हाला सगळ्या आरती अगदी न चुकता गाता याव्यात यासाठी आरतीचा अचूक असा संग्रह केला आहे. तो तुम्हाला नक्की कामी येईल. या शिवाय काकड आरती वाचायलाही विसरु नका

सुखकर्ता दु:खहर्ता ( Ganpati Aarti)

Marathi Aarti Pustak

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ताविघ्नाची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफळांची
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मन कामनापुरती
जय देव जय देव || १ ||

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुमकुम केशरा
हीरे जडीत मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || २ ||जय देव जय देव

लंबोदर पिंताबर फणिवरबंधना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे
सुरवरवंदना || ३ || जय देव जय देव
– समर्थ रामदासस्वामी

लवथवती विक्राळा (Shankar Aarti )

लवथवती विक्राळा

लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा
विषेकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा
लावण्य सुंदर मस्तकी वाळा
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा
जय देव जय देव जय शिवशंकरा
आरती ओवाळू भावार्थी ओवाळू
तूज कर्पुरगौरा जयदेव जयदेव || १ ||

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा
विभुतीचे उधळण शीतकंठ नीळा
ऐसा शंकर शोभे उम्हावेल्हाळा || २ || जय देव जय देव

देवी दैत्य सागर मंथन पै केले
त्या माजी अवचीत हलहल जे उठले
ते त्वा असुरपणे प्राशन केले
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले || ३ || जय देव जय देव

व्याघ्रांबर फणिवरधन सुंदर मदनारी
पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी
रघुकुलटिळक रामदासा अंतरी || 4 || जय देव जय देव
– समर्थ रामदास स्वामी

दुर्गेची आरती | देवीची आरती | Marathi Aarti pustak

दुर्गे दुर्गट भारी

दुर्गे दुर्गट भारी तुजवीण संसारी
अनाथे नाथे अंबे करुणाविस्तारी
वारी वारी जन्म मरणांते वारी
हारी पडलो आता संकट निवारी || १ ||
जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी
सुरवर ईश्वरवरदे तारकसंजिवनी जय देवी जय देवी || धृ.||

त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही
चारी श्रमले परंतु न बोलवे काही
साही विवाद करिता पडले प्रवाही
ते तू भक्तालागि पावसी लवलाही || २ || जय देवी जय देवी

प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा
क्लेशापासून सोडवी तोडी भवपाशा
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा
नरहरी तल्लीन झाला पद पंकजलेषा || ३ || जय देवी जय देवी
– नरहरी सोनार

युगे अठ्ठावीस (Vitthal Aarti)

Marathi Aarti Pustika

युगे अठ्ठावीस वीटेवरी उभा
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा || १ ||

जय देव जय देव जय श्री जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा
पावे जिवलगा
जय देव जय देव || धृ.||

तुलसी माला गळा कर ठेवुनि कटी
कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी
देव सुरवर नित्य येती भेटी
गरुड हनुमंत पुढे उभे राहती || २ ||
जय देव जय देव

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा
राई रखुमाबाई राणीया सकळा
ओवाळू आरत्या विठोबा सावळा || ३ ||
जय देव जय देव

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती
चंद्रभागेमध्ये स्नान ते करती
दिव्य पताका वैष्णव नाचती
पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती || ४ ||
जय देव जय देव

आषाढी कार्तिकी भक्तजन येती,साधुजन येती
चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती
दर्शन होळामात्रे तया होय मुक्ती
केसवासी नामदेव भावे ओवाळिती || ५ ||
जय देव जय देव
– संत नामदेव
चहा-कॉफीमध्ये दूध घालून पिणे हानिकारक

येई ओ विठ्ठले | Marathi Aarti Pustak

मराठी आरती पुस्तिका

येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहे || धृ. ||

आलिया गेलिया हाती धाडी निरोप
पंढरपूरी आहे माझा मायबाप || १ ||

पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला
गरुडांवरि बैसोनि माझा कैवारी आला || २ ||

विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा जीवेभावे ओवाळी || ३ ||
– संत नामदेव

आरती ज्ञानराजा

आरती ज्ञानराजा

आरती ज्ञानराजा, आरती ज्ञानराजा
महाकैवल्य तेजा, कैवल्य तेजा
सेविती साधुसंत, मन वेधला माझा
वेधला माझा आरती ज्ञानराजा || १ ||

लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी
अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी || २ ||
आरती ज्ञानराजा

कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी
नारद तुंबरही साम गायन करी || ३ ||
आरती ज्ञानराजा

प्रकट गृह्ये केले विश्व ब्रम्हाचि केले
राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले
आरती ज्ञानराजा || ४ ||

घालिन लोटांगण

घालिन लोटांगण

घालिन लोटांगण वंदिन चरण
डोळ्यानं पाहिनं रुप तुझे
प्रेमे आलिंगन आनंदि पूजन
भावे ओवाळिन म्हणे नामा

त्वमेव माता पिता त्वमेव
त्वमेव बंधु: सखा त्वमेव
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्व मम देवदेव

कायेन वाचा मनसेंद्रियेवा
बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा
करमि यद्यत सकलं परस्मै
नारायणायेती समर्पयामि

अच्युतं केशवं राम नारायणं
कृष्णदामोदरं वासुदेव भजे
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं
जानकीनायकं रामचंद्रं भजे

हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे ||

मोरया मोरया

मोरया मोरया मी बाळ तान्हे |तुझीच सेवा करु काय जाणे
अन्याय माझे कोट्यान कोटी | मोरेश्वरा बा तु घाल पोटी

सदा सर्वदा

सदा सर्वदा योग तुझा घडावा | तुझे कारणी देह माझा पडावा ||
उपेक्षु नको गुणवंता अनंता | रघुनायका मागणे हेची आता ||
जय जय रघुवीर समर्थ
ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे | त्या त्या ठिकाणी निजरुप तुझे||
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी | तेथे सदगुरु तुझे पाय दोन्ही ||
जय जय रघुवीर समर्थ ||

मराठी आरती पुस्तक (Marathi Aarti Pustak ) तुमच्या नक्कीच कामी येईल.









Leave a Comment